जगभरात कुठल्याही देशात कोणत्याही प्रकारचं वाहन (३० किमीपेक्षा जास्त वेगाने धावणारं वाहन) चालवण्यासाठी चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता असते. चालक परवान्याशिवाय वाहन चालवताना एखादी व्यक्ती आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. काही देशांमध्ये अशा गुन्ह्यांप्रकरणी तुरुंगवासाच्या शिक्षेचीदेखील तरतूद आहे. भारतातही ड्रायव्हिंग लायसन्स हा एक महत्त्वाचा दस्तावेज (डॉक्यूमेंट) आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये गरजेचं आहे. दरवर्षी हजारो भारतीय नागरिक नोकरी, व्यवसाय अथवा शिक्षणासाठी परदेशात जातात. परदेशात जाऊन वाहन खरेदी केल्यास ते वाहन चालवण्यासाठी त्या देशातल्या ड्रायव्हिंग लायसन्सची गरज भासते. परंतु, जगभरात असे काही देश आहेत ज्यांनी भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सलादेखील मान्यता दिली आहे. म्हणजेच भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास तुम्ही त्या देशांत मुक्तपणे वाहन चालवू शकता.

Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
Conflict between Iran and Israel Avoid traveling between both countries India advice to citizens
इराण- इस्रायलमध्ये तणाव: दोन्ही देशांतील प्रवास टाळा; भारताचा नागरिकांना सल्ला
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युनायटेड किंगडम, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका आणि स्वीडनमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स वैध आहे. यापैकी कुठल्याही देशात तुम्ही नोकरी, शिक्षण अथवा पर्यटक म्हणून गेलात तर तिथे तुम्ही वाहन चालवू शकता. परंतु, त्यासाठी तुमचं भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स हे प्रादेशिक भाषेऐवजी इंग्रजी भाषेत असायला हवं. तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स हिंदीसह इतर कुठल्याही प्रादेशिक भाषेत असेल तर ते परदेशात अवैध ठरेल.

हे ही वाचा >> छत्रपती शिवरायांना ‘महाराज’ म्हणण्यापूर्वी नेमकं काय म्हटलं जायचं? ठाऊक आहे का?

त्याचबरोबर परदेशांमध्ये वाहन चालवण्यासाठी त्या-त्या देशांमध्ये काही इतर कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. जसे की, अमेरिकेत तुम्हाला आपल्या लायसन्सची एक प्रत द्यावी लागते आणि I-94 हा फॉर्म व्हेरिफाय करावा लागतो. तसेच काही देशांमध्ये परमिट घ्यावं लागतं. त्यानंतरच तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह त्या देशात वाहन चालवू शकता.