Full Form of CC and BCC in Emails : ईमेल हे इंटरनेटवर संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. ईमेलच्या माध्यमातून जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात संवाद साधता येतो. ईमेलमुळे जग जवळ आले आहे. ईमेल हे फक्त वैयक्तिक आयुष्यासाठीच नाही, तर व्यावसायिक संवाद साधण्यासाठीही अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपल्यापैकी दररोज ईमेल वापर करतात. तुम्हाला आजवर ईमेलमध्ये अनेक बदल किंवा अपडेट दिसले असतील; पण काही फीचर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे CC आणि BCC. अनेकदा समोरच्या व्यक्तीला मेल करताना आपण CC आणि BCC वापर करतो; पण तुम्हाला CC आणि BCCचा फुल फॉर्म आणि त्यांचे महत्त्व माहितीये का? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. (what is the full form of cc and bcc using in email read importance and its uses)
पूर्वी जेव्हा आपण टाइपरायटर वापरायचो तेव्हा टाईप करत असलेल्या कागदाच्या खाली एक अतिरिक्त कागद ठेवायचो. त्या कागदाच्या तुकड्याला ‘कार्बन पेपर’ असे म्हणत. तुम्ही वरच्या कागदावर टाईप केलेल्या मजकुराची छाप कार्बन पेपरवर दिसत असे. ती तुमच्या मुख्य कागदपत्राची कार्बन कॉपी असे.
आता टाईपरायटर दिसेनासे झाले आहेत. आपण संवादासाठी विशेषत: ई-मेल वापरतो . ईमेल करताना तुम्हाला तुम्हाला सीसी आणि बीसीसी हे दोन महत्त्वाचे घटक दिसतात.
फुल फॉर्म आणि त्याचे महत्त्व
सीसी(CC) – सीसी म्हणजे कार्बन कॉपी (Carbon Copy). जेव्हा तुम्ही एकाच वेळी एकापेक्षा जास्त युजर्सना ईमेल पाठवता, तेव्हा सीसीचा वापर केला जातो.
बीसीसी (BCC) – बीसीसी म्हणजे ब्लाईंड कार्बन कॉपी (Blind Carbon Copy). जर तुम्ही एखाद्या सहकाऱ्याला ईमेल करत असाल आणि तुमचा संवाद हा तुमच्या बॉसला दिसावा म्हणून तुम्ही तुमच्या बॉसला बीसीसीमध्ये ठेवू शकता. पण, तुमच्या सहकाऱ्याला तुमच्या बॉसचा मेल आयडी दिसणार नाही. हा ईमेल फक्त त्यांनाच पाठवला आहे, असे त्यांना वाटेल.
जर तुम्हाला ईमेलमध्ये “undisclosed-recipients”असलेले ईमेल पाठवायचे असल्यास तुम्ही BCC पर्याय निवडू शकता. त्यामुळे इतर युजर्सचे ईमेल आयडी लपवले जातात.