scorecardresearch

ATM Card: एटीएम कार्डवरील १६ अंकांचा अर्थ काय असतो? जाणून घ्या

ATM Card Numbers: एटीएमवरील १६ अंकांचा काय अर्थ असतो जाणून घ्या

ATM Card: एटीएम कार्डवरील १६ अंकांचा अर्थ काय असतो? जाणून घ्या
एटीएमवरील १६ अंकांचा अर्थ (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Meaning Of ATM Card Numbers: कुठेही बाहेर जाताना पैसे बरोबर ठेवण्याचे टेन्शन एटीएम कार्डने कमी केले आहे. एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. एटीएम कार्डवर बऱ्याच गोष्टी लिहलेल्या असतात, त्यापैकी १६ अंकी एटीएम क्रमांक अत्यंत महत्त्वाचा असतो. पण त्यातील १६ अंकांचा अर्थ काय असतो, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. या १६ अंकांचा काय अर्थ असतो जाणून घ्या.

एटीएम कार्डवर असणाऱ्या १६ अंकांचा अर्थ:

एटीएम कार्डवर जे १६ अंक असतात, त्यातील पहिल्या अंकांचा अर्थ ते कार्ड कोणत्या संस्थेने जारी केले आहे हे दर्शवते. याला मेजर इंडस्ट्री आयडेंटिफायर देखील म्हटले जाते. वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी वेगवेगळा क्रमांक असतो. त्यानंतर जे पाच अंक असतात ते इश्युअर नंबर असतात.

आणखी वाचा: नोटांवर लिहल्याने त्या निरूपयोगी होतात का? जाणून घ्या काय आहे RBI चा नियम

या सहा अंकांनंतर जे नऊ अंक असतात, ते एटीएम कार्ड असणाऱ्या व्यक्तीच्या बँक अकाउंटशी जोडलेले असतात. या अंकांमध्ये बँक अकाउंट नंबर लिहिलेला नसतो, तर यात असणारे अंक बँक अकाउंटशी जोडलेले असतात. उरलेला शेवटच्या अंकाला ‘चेक डिजिट’ म्हटले जाते. हा अंक एटीएम कार्डची वॅलिडीटी कधी संपणार आहे हे समजते.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 15:12 IST

संबंधित बातम्या