Which Country Welcomes 2023 First & Last: नवीन वर्षाच्या स्वागताला आता अवघे काहीच तास शिल्लक आहेत पण ते झालं आपल्याकडे हो. न्यूझीलंडमध्ये तर आपल्याहून आधीच नवीन वर्षाचं स्वागत झालं सुद्धा. बहुधा आता तिकडे मी मागच्या वर्षी झोपलो होतो यावर्षी उठलो हे जोक मारून सुद्धा झाले असतील. पण असं का? नवीन वर्ष वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या वेळी सुरु होण्याचं कारण म्हणजे टाइम झोन. पृथ्वीच्या भ्रमण कक्षेत येणाऱ्या प्रत्येक देशाच्या स्थानावरून त्या देशातील नवीन वर्षाची वेळ ठरत असते. सोप्या भाषेत सांगायचं तर, ज्याप्रमाणे आपल्याकडे दिवस असताना दुसऱ्या खंडात रात्र किंवा दुपार असते त्यानुसारच काही देशांमध्ये सर्वात आधी व सर्वात उशिरा नववर्ष सुद्धा सुरु होतं.
2023 चे सर्वप्रथम कोणत्या देशाने स्वागत केले?
ओशनिया खंड ज्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी आणि पापुआ न्यू गिनी यासारखे बेटांचे देश आहेत येथे नवीन वर्षाचे प्रथम स्वागत केले जाते. किरिबाटी मधील किरितीमाती बेट हे नवीन वर्ष साजरे करणारे पहिले ठिकाण आहे. येथे 1 जानेवारी सुरु होते तेव्हा भारतात 31 डिसेंबरच्या दुपारी 3:30 वाजले होते. टोंगा, सामोआ आणि किरिबाटी यांनी प्रथम नवीन वर्षाचे स्वागत केले, त्यानंतर न्यूझीलंडमध्ये 31 डिसेंबर रोजी दुपारी 3:45 वाजता नववर्षाचे स्वागत होते.
कोणत्या देशात 2023 सर्वात उशिरा सुरु होणार?
हॉलँड आणि बेकर या निर्जन बेटांवर सर्वात शेवटी नवीन वर्ष सुरु होते. युनायटेड स्टेट्सजवळ असलेल्या या बेटावर जेव्हा नवीन वर्ष सुरु होते तेव्हा भारतात अगोदरच 1 जानेवारीच्या संध्याकाळचे 5:30 वाजलेले असतात.
हे ही वाचा<< २०२३ एप्रिल पर्यंत ‘या’ ३ राशींना बक्कळ धनलाभाची संधी; शनिदेव व गुरु एकत्र देऊ शकतात प्रचंड श्रीमंती
दरम्यान भारतासह आजूबाजूच्या देशांमध्ये मात्र काही मिनिटांच्या फरकाने नवीन वर्ष साजरे होते. तुम्हाला सर्वांना येत्या नववर्षाच्या अगोदरच खूप खूप शुभेच्छा !