आजकाल यूट्युब तरुण मंडळींसाठी प्रसिद्धीचा एक प्लॅटफॉर्म बनला आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत कोणाला यूट्युबचे वेड नाही, असे म्हणता येणार नाही. अनेकांचे यूट्युबच्या माध्यमातून मनोरंजन होते; तर काही जण या माध्यमाचा उपयोग कमाईसाठी करतात. इन्फ्लुएन्सर, ब्लॉगर व्हिडीओ पोस्ट करतात आणि सामान्य नागरिकांची मने जिंकतात. यूट्युबर बनणे आणि प्रसिद्धी मिळवणे हे आजकालच्या तरुण मंडळींचे जणू स्वप्नच आहे. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का? यूट्युबवर सगळ्यात पहिला व्हिडीओ कोणी आणि कधी पोस्ट केला असेल? तर आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.

२००५ साली यूट्युबला पोस्ट केला गेला पहिला व्हिडीओ :

why Horlicks remove healthy label
हॉर्लिक्स आता आरोग्यदायी पेय नाही; हिंदुस्तान युनिलिव्हरला हा निर्णय का घ्यावा लागला?
pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
A girl told the incident of how she got Rs 2 back while buying a ticket in a metro station
तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स

स्टीव्ह चेन, चाड हर्ले व जावेद करीम यांनी २००५ मध्ये यूट्युबची सुरुवात केली होती. तसेच या प्लॅटफॉर्मवर पहिला व्हिडीओ २४ एप्रिल २००५ साली रात्री ८.२७ ला अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ जावेद करीम यांनी यूट्युबला अपलोड केला होता. जावेद करीम हे यूट्युबचे सह-संस्थापक होते. तसेच हा व्हिडीओ प्राणिसंग्रहालयात शूट केला गेला होता. ‘मी अ‍ॅट द झू’ असे या व्हिडीओचे शीर्षक आहे. तसेच जावेद करीम व्हिडीओत हत्तीचे वर्णन करताना दिसत आहेत आणि हा फक्त १९ सेकंदांचा व्हिडीओ आहे.

हेही वाचा…महिलांची अशी WWE तुम्ही कधी पाहिली नसेल! सीटसाठी एकमेकींचे केस ओढत चक्क पट्ट्याने मारले; पाहा Video

व्हिडीओ नक्की बघा :

यूट्युबच्या पहिल्या व्हिडीओला २९१ कोटींहून अधिक व्ह्युज :

यूट्युब चॅनेलचं नाव जावेद @jawed असे आहे. यूट्युबसंबंधीच्या या व्हिडीओला आतापर्यंत २९१ कोटीहून अधिक व्ह्युज; तर १४ लाख लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. तसेच ४.०९ कोटी लोकांनी या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा केले आहे. तसेच सगळ्यात अनोखी गोष्ट म्हणजे या चॅनेलवर दुसरा कोणताही व्हिडीओ तुम्हाला दिसणार नाही. त्याने फक्त हा एकच व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यानंतर कोणताही व्हिडीओ अपलोड केला गेलेला नाही.

१४ फेब्रुवारी २००५ मध्ये यूट्युब लाँच करण्यात आले होते. स्टीव्ह चेन, चाड हर्ले व जावेद करीम या तिघांनी नंतर यूट्युब गुगलला १६५ कोटींना विकले. आज संपूर्ण जगात हा प्लॅटफॉर्म लोकांची पहिली पसंती ठरत आहे. यूट्युबवर स्त्रिया रेसिपी बघतात, मुलांना मजेशीर गोष्टी दाखवतात, तरुण मंडळी आवडती गाणी किंवा चित्रपट बघतात. तसेच अन्य महत्त्वाच्या गोष्टी यूट्युबवर सर्च केल्या जातात आदी विविध गोष्टींसाठी यूट्युबचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे