घरचं जेवण खाऊन कंटाळा आल्यावर बरेचसे लोक फास्ट फूडकडे वळतात. गेल्या काही वर्षांमध्ये शहरांप्रमाणे ग्रामीण भागांमध्येही फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. कमी किंमतीमध्ये चटपटीत पदार्थ खाऊन पोट भरणे हे खवय्यांचे प्रमुख ध्येय असते. काहीजण किंमतीमुळे, तर काही चवीमुळे मोठ्या हॉटेल्सपेक्षा छोट्या स्टॉल्स/ दुकानांवर फास्ट फूड खाणे पसंत करतात. पाणीपुरी हा फास्ट फूड संस्कृतीमधील महत्त्वपूर्ण पदार्थ आहे. मुंबईमध्ये पाणीपुरी म्हणून प्रसिद्ध असलेला हा पदार्थ पुचका, गोलगप्पे अशा काही नावांनी भारतभर मोठ्या चवीने खाल्ला जातो. पाणीपुरी खाण्यासाठी लोक स्टॉल्सवर गर्दी करतात. पाणीपुरीच्या स्टॉल्सवर लाल रंगाचा कपडा पाहायला मिळतो. हा कपडा एका विशिष्ट कारणासाठी विक्रेते लावत असतात.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
लाल रंग काहीसा भडक रंग आहे. तो लांबच्या अंतरावरुनही पाहता येतो. या रंगाची वस्तू पटकन आपल्या लक्षात येते. यामुळे लोाकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पाणीपुरी विक्रेते त्यांच्या स्टॉलवर लाल कपड्याचा वापर करत असतात. या गोष्टीला वैज्ञानिक बाजू देखील आहे. भौतिकशास्त्रानुसार, सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यातून रंगांची निर्मिती होते. सूर्यप्रकाशातून तयार होणाऱ्या सात रंगांमध्ये लाल रंगाचाही समावेश होतो. या रंगाची तरंगलांबी (wavelength) सर्वात जास्त आणि आवृत्ती (Frequency) सर्वात कमी असते. यामुळे हा रंग अधिक उजळ आणि चमकदार दिसतो. या कारणामुळे स्टॉल्सवर लाल रंगाचा मोठा कपडा ठेवला जातो. काही विक्रेते लाल रंगाचे कपडे देखील घालत असतात.
आणखी वाचा – पत्त्यांमधील बदामच्या राजाला मिश्या का नसतात? इतर राजांपेक्षा तो वेगळा असतो, कारण…
पाणीपुरी स्टॉल्स व्यतिरिक्त अन्य ठिकाणीही या कपड्याचा वापर केला जातो. या गोष्टीला एक ऐतिहासिक छटा देखील आहे. मुघल साम्राज्यामध्ये हुमायूंच्या काळात स्वयंपाक घरांमध्ये एक नियम होता. या नियमानुसार, आचारी तयार केलेले जेवण लाल रंगाच्या कपड्याने झाकत असत. उत्तर भारतामध्ये ही प्रथा आजही सुरु आहे. आजही तेथे राहणारे बरेचसे लोक त्यांचे जेवण लाल रंगाच्या कपड्याने झाकून ठेवतात.