इंजिनमधील कार्याचे परीक्षण कसे केले जाते? 
लोकेश कुलकर्णी, शहादा

यात मानवीय परीक्षण आणि संगणकीय परीक्षण असे दोन प्रकार पडतात. मानवीय परीक्षणांमध्ये गॅरेज मेकॅनिक इंजिनाची तपासणी करतो. त्यात पिस्टनकडून दिला जाणारा दाब, निर्वात, इग्निशन टायमिंग, पॉवर बॅलेन्स व इतर भागांची जुजबी तपासणी असते. पण त्यामध्ये काही प्रमाणात दोष राहतात म्हणून सध्या आधुनिक गॅरेजेसमध्ये संगणकीय तपासणी अथवा विश्लेषण करून घेणे योग्य ठरते. इंजिनाची तपासणी करताना संगणकीय प्रणालीचे टेस्ट प्रॉडक्ट इंजिनमधील भागांना जोडतात. त्यावरील सेन्सर्स इंजिनात झालेले बदल मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवतात आणि अचूक रीडिंग देतात. ज्यावरून दोषांचे विश्लेषण व निदा करणे सोपे जाते.

कारला ग्राऊंड क्लिअरन्स किती असावा, त्याचे प्रमाण कसे ठरवले जाते?
रवी जाधव, बुलडाणा
ग्राऊंड क्लिअरन्स म्हणजे कार चेसीसचे जमिनीपासूनचे अंतर. प्रत्येक कारसाठी हे अंतर वेगवेगळे असते. ते कारची इंजिन कपॅसिटी, तिचा सर्वोच्च वेग, त्वरण आदी बाबींवर अवलंबून असते. कारण कारचा वेग खूप असेल तर ग्राऊंड क्लिअरन्स कमी असतो. जर इंजिन कपॅसिटी कमी असेल तर मग क्लिअरन्स वाढतो. याचे मुख्य कारण म्हणजे कारला हायस्पीडवर असलेला धोका. ग्राऊंड क्लिअरन्स जास्त असेल तर गाडी वेगात असताना र्अजट ब्रेक दाबल्यास कार उलटी होऊ शकते. कमी कपॅसिटीच्या कारला हा धोका खूपच कमी असतो. म्हणून त्यांचा ग्राऊंड क्लिअरन्स जास्त असतो. तसेच व्हायब्रेशन कमी होण्यासाठी तसेच वाढण्यासाठी त्याची मदत होते.

या सदरासाठी तुमचे प्रश्न bmayurm@gmail.com वर पाठवा.