’सर मला विदाऊट गीअरची (अ‍ॅटोमॅटिक) पेट्रोल महत्त्वाचे म्हणजे सी.एन.जी. असणे गरजेचे रोजचे रनिंग ६०/९० कि.मी. होते. हॅचबॅक व ५ लाखांच्या बजेटमध्ये कार सुचवा. माझ्याकडे झायलो, होंडा सीटी आहे; परंतु आता पुणे शहरात रहदारीत गाडी चालवणे म्हणजे खूप त्रास होतो. त्यासाठी अ‍ॅटोमॅटिक कार घ्यायची आहे.
– सोमनाथ घोनम
’सीएनजी आणि ऑटोगीअर अशा एकत्रित कार अजून तरी बाजारात आलेली नाही. तरी मी तुम्हाला असे सुचवेन की, तुम्ही सेलेरिओ एलएक्सआय एजीएस ही गाडी घ्यावी आणि दोन वर्षांनी ती सीएनजी करावी. तिचे पेट्रोलवरील मायलेज १८.५ किमी प्रतिलिटर एवढे आहे. त्यामुळे सीएनजी लगेच नाही केले तरी चालेल.
’माझी उंची ५ फूट आठ इंच एवढी असून माझे नवीन कार घ्यावयाचे बजेट रु. ४,००,०००/- ते ४,५०,०००/- एवढे असून माझे महिन्याचे १५० कि.मी. एवढे ड्रायव्हिंग आहे. कृपया मी कोणती पेट्रोल कार घेऊ याबाबत मार्गदर्शन व्हावे, ही विनंती.

– आनंद वाघमारे
’तुमची उंची पाहता आणि बजेट लक्षात घेता तुमच्यासाठी डॅटसन गो, वॅगन-आर, मारुती ईको या गाडय़ा जास्त सोयीस्कर ठरतील. या गाडय़ा अतिशय उत्तम आहेत.
’मला टाटा अरिया या एसयूव्हीचे टॉप मॉडेल घ्यायचे आहे. परंतु ही गाडी जास्त रस्त्यावर दिसत नाही. म्हणजे तिचा जास्त सेल झालेला दिसत नाही. काय करावे, कृपया सुचवावे.
– तेजस देवरे
’टाटाचे अरिया मॉडेल खरं तर खूप प्रशस्त होते परंतु तिचा मेन्टेनन्स आणि टाटाने बनवलेले इंजिन हे दोघेही फार काही चांगले नाही. त्यामुळे ही गाडी रस्त्यावर जास्त प्रमाणात दिसत नाही. तुम्ही पर्याय म्हणून निस्सान इवालिया, एक्सयूव्ही500 किंवा इनोव्हा यापकी एका गाडीचा विचार करावा.
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.