लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीत ९० कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. देशात यंदा सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क सविंदानाने दिला आहे. त्यामुळे मतदान करणं सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. पण त्याचबरोबर आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासून पाहणे देखील तुमचे कर्तव्य आहे. फक्त चार स्टेपद्वारे तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे का नाही हे तपासून पाहू शकतात.

  • सर्वप्रथम निवडणुक आयोगाच्या National Voters पोर्टलवर जा
  • डाव्या साईडला एक सर्चबार असेल.
  • त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, तो व्यवस्थित वाचा आणि पुढे जा
  • त्यामध्ये सर्व माहिती भरा आणि सबमिट बटनवर क्लिक करा
  • तुमचे मतदार यादीमतील सर्व माहिती येईल
  • डाव्याबाजूला आणखीवर क्लिक केल्यास मतदान ओळखपत्रावरील सर्व माहिती येईल

मतदार असलेल्या व मतदार नसलेल्या नागरिकांच्या माहितीसाठी व्हीव्हीआयपी हा एक कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार जे मतदार आहेत, त्यांना मतदार यादीतील आपल्या नावाची पडताळणी करून घेण्यासाठी १९५० ही टोल फ्री हेल्प लाइन सुरू करण्यात आली आहे. जे मतदार नाहीत, त्यांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून नमुना-६ फार्म डाऊनलोड करून तो पूर्ण भरून मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्र (बूथ) अधिकारी यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले.