News Flash

निवडणूक निकालावरून कार्यकर्त्यांमध्ये पैज; जिंकल्यास दुचाकी देण्याचा करारनामा

दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्क शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर लेखी करारनामा करून दुचाकीची पैज लावली आहे. हा करारनामा सध्या समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल झाला आहे.

उस्मानाबाद : कार्यकर्त्यांनी कोणता उमेदवार निवडणूक येणार यावर पैज लावली आहे. त्यासाठी स्टॅम्प पेपरवर लिखीत करारनामा करण्यात आला आहे.

पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजित सिंह पाटील आणि शिवसेनेचे ओम राजेनिंबाळकर या दोघांमध्ये कोण बाजी मारणार? यावरून कार्यकर्त्यांमध्ये आता पैजा लागू लागल्या आहेत. उस्मानाबाद शहरानजीक असलेल्या राघुचीवाडी या गावातील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्क शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर लेखी करारनामा करून दुचाकीची पैज लावली आहे. या दोघांनी केलेला करारनामा सध्या समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल झाला आहे.

उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीत पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. पहिल्या दिवसापासून एकमेकांविरोधात राळ उठविणारे कार्यकर्ते मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर देखील अद्याप शांत झालेले नाहीत. समाजमाध्यमावर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते तावातावाने आपण विजयी होणार, असे दावे-प्रतिदावे करीत आहेत. राघुचीवाडी येथील या दोन कार्यकर्त्यांनी करारनाम्यानुसार लावलेली दुचाकीची शर्यत त्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

रघुचीवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शंकर मोरे यांनी सेनेचे ओम राजेनिंबाळकर निवडून आल्यास आपल्या मालकीची नवी कोरी दुचाकी शिवसेनेचे बाजीराव करवर यांना देणार असल्याचे करारनाम्यानुसार लिहून दिले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते बाजीराव करवर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार राणा जगजित सिंह पाटील निवडून आल्यास आपल्या मालकीची दुचाकी मोरे यांच्या नावे करणार असल्याचे जाहीर केले आहे. या दोघांनी शनिवार, २० एप्रिल रोजी १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरीद्वारे करारनामा केला आहे. निवडणूक निकालानंतर २४ मे रोजी ही प्रक्रिया आपण पार पाडणार असल्याचे त्यांनी करारनाम्यात नमूद केले आहे. त्यामुळे या दोघांचा करारनामा सध्या समाज माध्यमात चांगलाच चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 7:49 pm

Web Title: supporters of candidate of loksabha election makes bait prize of two wheeler if candidate defeated
Next Stories
1 जाणत्या राजाला मिळालं बंद पडलेलं भाड्याचं इंजिन : फडणवीस
2 लाट नाही तरीही पंतप्रधान होणार मोदीच!; जळगावमधील व्यापाऱ्यांना विश्वास
3 जळगावमधील व्यापाऱ्यांचा कौल कोणाला ?., भाजपा वर्चस्व राखेल ?
Just Now!
X