हरियाणात विधानसभा निवडणुकीनंतर आज मतमोजणी होत आहे. या मतमोजणीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. हरियाणात आपने इंडिया आघाडीबरोबर न जागा स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना अद्याप खातेही उघडता आलेले नाही. दरम्यान, निकालाबाबत आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही आपच्या या पराभवाबाबत भाष्य केलं आहे. दिल्लीत पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

“आजच्या निकालातून आपण सगळ्यांनी घडा घेतला पाहिजे. कोणतीही निवडणूक हलक्यात घेऊ नये. तसेच कोणीही अतिआत्मविश्वास बाळगू नये, हे या निकालातून शिकण्यासारखं आहे”, असं अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच “प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक जागा ही आव्हानात्मक असते. त्यासाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला कठोर परिश्रम घ्यावे लागतील”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपने स्वतंत्रपणे लढवली होती निवडणूक

दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. काँग्रेसबरोबर जागावाटपाबाबत झालेल्या मतभेदानंतर त्यांनी ९० पैकी ८९ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, या निवडणुकीत आम पक्षाला खातेही उघडता आलेले नाही.