महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडतो आहे. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जिथे लागलं आहे त्या बारामती मतदार संघातही मतदान पार पडतं आहे. काटेवाडी या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर येऊन अजित पवार यांनी त्यांच्या आई आशाताई पवार यांच्यासह येत मतदान केलं. तसंच अजित पवारांसह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारही होत्या. आईबरोबर येत मतदान करणं याकडे अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक आहे अशी चर्चा आता होते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांनी आईसह येत केलं मतदान

अजित पवार हे जेव्हा मतदानाला आले तेव्हा त्यांची आई आशाताई अनंतराव पवार या त्यांच्याबरोबर आल्या होत्या. या दोघांनीही मतदान केल्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा अजितदादांनी आपली आई आपल्या बरोबर आल्याचा उल्लेख आवर्जून केला. “आमच्या घरात सर्वात ज्येष्ठ आशाताई अनंतराव पवार आहेत. आज माझी आई माझ्याबरोबर आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. त्यांनी हे वक्तव्य करुन एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे. एकीकडे माझी आई घराण्यात सर्वात ज्येष्ठ असल्याचे अधोरेखित करुन शरद पवार यांना टोला लगावला. तर दुसरीकडे माझी आई मतदानाला माझ्याबरोबर आल्याचे सांगत ती माझ्याच बाजूने असल्याचा संदेशही अजितदादांनी दिला. त्यामुळे या गोष्टीची चर्चा रंगली आहे.

मतदानानंतर अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले, “प्रचाराच्या रणधुमाळीत माझ्यावर वेगवेगळ्या आरोपाचा धुरळा उडवला आहे . मी त्या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही. मी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूकीत ही निवडणूक प्रचार केला. या मतदारसंघात आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितले की, ही भावकीची गावकीची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी तसेच पुढील पाच वर्षाचा विकास हे डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करा” असे मी शेवटपर्यंत सांगितले आहे असं अजित पवार म्हणाले. अजित पवार सातत्याने शरद पवारांच्या वयावरुन सातत्याने टीका करत आहेत. आज बारामतीत मतदान केल्यानंतर अजित पवारांनी मतदान केल्यानंतर पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधला.

रोहित पवारांच्या आरोपावर अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांच्यावर काहीतरी परिणाम…”

महाराष्ट्र आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होतंय. ११ मतदारसंघात मतदान पार पडतयं.. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी अजित पवारांसह कुटुंबासोबत आपला मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार, मुलगा पार्थ पवार काटेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baramati lok sabha maharashtra third phase election voting ajit pawar come for voting with his mother ashatai pawar scj