लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला एक धक्का देणारी बातमी आहे. कारण माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपाने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज असून वेगळी चूल मांडतील या चर्चा सुरु झाल्या होत्या. तसंच धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकतीच शरद पवारांचीही भेट घेतली होती. त्यामुळे आता मोहिते पाटील रणजीतसिंह निंबाळकरांविरोधात तुतारी फुंकणार हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी काय म्हटलं आहे?

मी भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची माझ्याकडे जबाबदारी आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडळ कार्यकारिणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटना रचना गठीत करुन कार्यान्वित करण्याचं कार्य केलं. तसंच शक्तीकेंद्र, सुपर वॉरीयर, बूथ रचनाही सक्रिय केल्या. वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करुन संघटना व बूथच्या माध्यममातून जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले.

Sunil Tatkare, advice, Hemant Godse,
संभ्रम करणारी विधाने टाळावीत, सुनील तटकरे यांचा हेमंत गोडसे यांना सल्ला
Sunil Kedar, Ajit Pawar,
अजित पवार यांना केदार यांचा टोला; म्हणाले, “विधानसभा निवडणुका येऊ द्या, बारामतीमध्ये…”
rahul gandhi
राहुल यांचे मोदींना चर्चेचे आव्हान
Rahul Gandhi Narendra Modi sharad pawar
“ज्यांना नकली म्हणायचं, त्यांच्यासमोरच हात पसरायचे”, मोदींनी शरद पावारांना दिलेल्या ऑफरवरून काँग्रेसचा टोला
Rohit Pawar VS Ajit Pawar
रोहित पवारांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, “निवडणुकीच्या दिवशी आई कुणाला आठवत असेल तर…”
Kolhapur, Modi, Congress,
कोल्हापूर : पराभवाच्या भीतीने मोदींचे काँग्रेसवर बेछूट आरोप; रमेश चेनिथला
What Narendra Modi Said?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप, “काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप”
Rohit Pawar vs Ravi Rana over amravati rally
“फक्त ३०० मिळाले? नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना पैसे दिले?”, रवी राणा म्हणाले, “हो पैसे वाटले…”

हे पण वाचा- १४ एप्रिलला शरद पवार गटात प्रवेश, १६ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार? धैर्यशील मोहिते म्हणाले…

आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो व आपणांस कळवू इच्छितो की मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती

आपला
धैर्यशील मोहिते पाटील

dhairyasheel mohite patil resignation
धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा आणि सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे.

असं राजीनामा पत्र धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना उद्देशून लिहिलं आहे. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राजीनामा देणं सूचक मानलं जातं आहे.

शरद पवारांनी भाकरी फिरवल्याची चर्चा

भाजपाने जेव्हा लोकसभेची महाराष्ट्राची पहिली यादी जाहीर केली त्यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. या उमेदवारीवरुन अकलूजच मोहिते पाटील नाराज झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या. तसंच धैर्यशील माने यांनी गुरुवारी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली आहे. शरद पवारांनी माढ्यात भाकरी फिरवली अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. १३ एप्रिलला धैर्यशील माने अकलूजमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील आणि शरद पवार त्यांना माढ्यातून उमेदवारी जाहीर करतील हे निश्चित मानलं जातं आहे.