मध्य प्रदेशमध्ये २०१८ दरम्यान दीड वर्षांचा अपवाद सोडला, तर २००३ पासून दोन दशके भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यापैकी तब्बल १६ वर्षे शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यामुळे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला सत्ता मिळणार की, जनमत विरोधात जाऊन काँग्रेस सत्तेवर येणार याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. अशातच सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या कलात भाजपा पुढे, तर काँग्रेस मागे दिसली. यानंतर मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते कमलनाथ सिंह यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

कमलनाथ सिंह म्हणाले, “मी निकालाचे सुरुवातीचे कल बघितलेले नाहीत. ११ वाजेपर्यंत मी कोणताही कल पाहणं गरजेचं नाही. मला मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय होईल याबाबत अगदी आत्मविश्वास आहे.”

हेही वाचा : Madhya Pradesh Election Result 2023 Live : मध्य प्रदेशात भाजपाची मुसंडी, काँग्रेस पिछाडीवर; कुणाला किती जागा? वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझा मध्य प्रदेशच्या मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. किती जागा येणार याचा अंदाज मी करत नाही. मी मतदारांच्या मताकडे लक्ष देतो,” असंही त्यांनी नमूद केलं.