लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून सर्व उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी (६ मे) मतदान होणार आहे, चौथ्या टप्प्यात १४ मे आणि पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात ज्या-ज्या ठिकाणी मतदान होणार आहे तिथल्या उमेदवारांनी पूर्ण ताकदीनिशी प्रचार सुरू केला आहे. अशातच महाविकास आघाडीचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांना प्रचारावेळी एक वाईट अनुभव आला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दाव केला आहे की, मुंबईच्या घाटकोपरमधील एका गुजरातीबहुल सोसायटीमधील काही गुजराती रहिवाशांनी त्यांना संजय दिना पाटील यांचा प्रचार करण्यापासून रोखलं आहे. संजय दिना पाटील हे केवळ मराठी उमेदवार आहेत म्हणून आम्हाला प्रचार करण्यापासून रोखलं अशी तक्रार शिवसैनिकांनी केली आहे. यावर ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवर भाष्य करताना राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आहे.

स्थानिक शिवसैनिकांनी सांगितलं की, घाटकोपरमधील एका गुजरातीबहुल सोसायटीत आम्हाला संजय दिना पाटील यांची प्रचारपत्रकं वाटण्यास विरोध करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून कार्यकर्ते आणि सोसायटीत राहणाऱ्या गुजराती रहिवाशांमधील वाद मिटवला. दरम्यान, शिवसैनिक म्हणाले, मराठी माणसाला या इमारतीत प्रचार करून देणार नाही, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. त्यावर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही येथे प्रचार करण्यासाठी कायदेशीर परवानगी घेतली आहे आणि संविधानाप्रमाणे आम्ही प्रचार करतोय. त्यानंतरही तिथल्या काही लोकांनी गुजराती आणि मराठी असा जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. तसेच प्रशासनाने या प्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती करतो

यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले, घाटकोपरमध्ये एक सोसायटी आहे, जिथे बहुसंख्य गुजराती लोक राहतात. त्यांनी शिवसैनिकांना तिथे येण्यापासून रोखलं… केवळ मराठी आहेत म्हणून त्यांनी शिवसैनिकांना तिथे प्रचार करण्यापासून रोखलं… यावर बु* शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गट) काय करतेय? हे गां* लोक आहेत. फडणवीस आणि शिवसेनेचा शिंदे गट ही एक गां* सेना आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने शिंदे आणि फडणवीस यांचं आव्हान स्वीकारलं आहे. आम्ही त्यांच्या विरोधात लढूच. मात्र आमची शिवसेना खरी असं म्हणणारे बु**, गां** लोक या प्रकरणावर काय बोलणार आहेत ते स्पष्ट झालं पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गिरगावात नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री?

LinkedIn या नोकरीशी संबंधित वेबसाईटवर व्हायरल झालेल्या एका नोकरीच्या जाहिरातीमुळे मराठी माणसांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ITCODE Infotech या कंपनीने ग्राफिक डिझायनर्सची जागा भरण्यासाठी केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली आहे. या जाहिरातीत म्हटलं आहे की, मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. जान्हवी सराना या नावाने लिंक्डइनवर ही जाहिरात करण्यात आली. या जाहिरातीत मुंबईत ग्राफिक्स डिझायनरसाठी जागा असल्याची माहिती देण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगावातील एका कार्यालयात ही नोकरी होती. तरीदेखील नोकरीच्या या जाहिरातीत मराठी लोकांनी अर्ज करू नये असं म्हटलं होतं.