काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजय मिळवला असला तरी मुख्यमंत्री कोण होणार यावर अजून निर्णय झालेला नाही. त्यातच आता मुस्लीम आमदाराला उपमुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी समोर आल्यामुळे काँग्रेस आणि भाजपामध्ये सोशल मीडियावर जुंपली आहे. कर्नाटक ‘वक्फ बोर्डा’चे अध्यक्ष शफी सादी यांनी मुस्लीम नेत्याला उपमुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी केल्यानंतर या वादाची सुरुवात झाली. शफी सादी यांना भाजपाचा पाठिंबा असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी शफी सादी यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ज्यामध्ये ते उपमुख्यमंत्रीपद आणि पाच कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी करीत आहेत.

“आम्ही (मुस्लीम उमेदवारांसाठी) ३० जागा मागितल्या होत्या. पण आम्हाला फक्त १५ जागा मिळाल्या. त्यातल्या ९ ठिकाणी मुस्लीम उमेदवार जिंकून आले आहेत. तसेच ६७ ते ७२ मतदारसंघात मुस्लीम मतदारांमुळे काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय शक्य झाला आहे. आमच्या समाजाने काँग्रेसला खूप काही दिले आहे. आता त्या बदल्यात आम्हाला परत देण्याची वेळ आली आहे. आम्हाला मुस्लीम उपमुख्यमंत्री आणि पाच कॅबिनेट मंत्री हवे आहेत. मंत्र्यांना चांगले खाते मिळायला हवे. जसे की, गृह, अर्थ आणि शिक्षण. ही मागणी पूर्ण करून काँग्रेसने मुस्लीमांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी,” अशी मागणी करणारा शफी सादी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपाच्या अमित मालवीय यांनीदेखील हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

Sangli, Congress palm symbol, Congress,
सांगलीत सलग दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे हाताचा पंजा चिन्ह गायब
PM Narendra Modi On Congress
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक टोला; म्हणाले, “बारशाला गेला आणि बाराव्याला…”
congress leadership in delhi advised maharashtra leaders to follow alliance rule
आघाडी धर्माचे पालन करा! पक्षनेतृत्वाचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला
narendra modi
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा ठसा! पंतप्रधान मोदींचा आरोप; काँग्रसचे प्रत्युत्तर

अमित मालवीय यांनी हा व्हिडीओ ट्वीट करीत असताना सोबत म्हटले, “काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेची किंमत मोजावी लागतेय. असे दिसतेय की, काँग्रेसवर आता जबाबदाऱ्यांचे ओझे झाले आहे. त्यांना वाटले की ते जिंकणारच नाहीत. पण दुर्दैवाने त्यांचा विजय झाला. त्यांच्या योजना फसल्या आहेत.”

सदर व्हिडीओमध्ये शफी सादी असेही म्हणाले, “आजवर कर्नाटकाला एकदाही मुस्लीम मुख्यमंत्री मिळालेला नाही आणि आम्ही तशी मागणीही करीत नाही.” दरम्यान, अमित मालयीय यांच्या ट्विटरला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे नेते पवन खेरा म्हणाले, “मला माहितीये खोटे पसरवणे तुमची गरज आहे. पण हे जरा जास्त झाले. शफी सादी यांना भाजपाचा पाठिंबा.”

काँग्रेसचे प्रवक्ते गुरदीप सिंह सप्पल यांनीदेखील ट्विटरवरून यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीला उत्तर देताना ते म्हणाले, तुमची वृत्तवाहिनी लोकांना सांगेल का? ही व्यक्ती भाजपाशी संबंधित आहे. जेव्हा भाजपा तिकीट वाटत होती, तेव्हा त्यांनी एकाही मुस्लीम व्यक्तीला तिकीट का नाही दिले? हे सांगण्याचे धाडस या व्यक्तीमध्ये झाले नाही.

भाजपाचे आणखी एक प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी सांगितले की, मुस्लीम गट त्यांच्या मागण्या मांडून कर्नाटकाला नासविण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे कर्नाटक हे राजस्थानप्रमाणेच अस्थिर, भ्रष्ट प्रशासनाचे राज्य बनेल, यात कोणतीही शंका नाही.

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष श्रीनिवास बिव्ही यांनी देखील अमित मालवीय यांच्या ट्विटचा समाचार घेतला आहे. “Malware” असे कॅप्शन लिहून ते म्हणाले की, शब्द तुमचे आहेत आणि संस्कार भाजपाचे.

दरम्यान, काँग्रेस आमदारांनी काल (रविवारी) मुख्यमंत्री नेमण्याचे सर्वाधिकार पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिले आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच आहे. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या बातमीनुसार, मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसने आमदारांचे मतदान घेतले होते, ज्यात सिद्धरामय्या यांना ८० आमदारांनी पाठिंबा देऊ केला आहे. याचा अर्थ मुख्यमंत्री बनण्याच्या शर्यतीमध्ये सिद्धरामय्या सध्या शिवकुमार यांच्या पुढे आहेत.

शफी सादी भाजपाशी संबंधित?

शफी सादी यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये ‘वक्फ बोर्डा’चे अध्यक्ष बनविण्यात आले होते. त्या वेळी आलेल्या बातम्यांनुसार असे दर्शविण्यात आले होते की, भाजपा समर्थक शफी सादी यांना ‘वक्फ बोर्डा’चे अध्यक्ष बनविण्यात येत आहे. काँग्रेस बहुमताने जिंकून येताच शफी सादी यांनी उपमुख्यमंत्रीपद, पाच कॅबिनेट पदे मागितली आहेत. पण हेच सादी मुस्लीम आरक्षण रद्द केल्यानंतर चिडीचूप होते, असाही त्यांच्यावर आरोप होत आहे. हिजाब प्रकरण तापले असतानाही शफी सादी यांनी मौन बाळगले होते. ‘हलाल मांस’वरून दंगली भडकल्या असतानाही त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नव्हती, असाही आरोप त्यांच्यावर होत आहे.

Live Updates