लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी शेवटचा एक दिवस राहिल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अनेक राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत गौप्यस्फोट केले आहेत. आता शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठं विधान केलं आहे. या लोकसभा निवडणुकीत आम्हाला (महायुतीला) महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी अप्रत्यक्ष मदत केल्याचा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे. तसेच ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते आमच्याबरोबर येतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

शंभूराज देसाई काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शो वरून विरोधकांनी टीका केली होती. यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकच मुंबईत रोड शो झाला असं नाही. देशात अनेक मोठ्या शहरांमध्ये असे रोड शो झाले आहेत. यावरून ज्यांना टीका करायची ते करतात. पण पंतप्रधानांची सुरक्षा महत्वाची असते. त्यांच्या सुरक्षेच्या कारणावरून काही उपाय योजना कराव्या लागल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या रोड शोला लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे”, असं शंभूराज देसाई म्हणाले.

amit shah
“राम मंदिरानंतर आता माता सीतेचे भव्य मंदिर उभारणार”; अमित शाह यांचे आश्वासन; म्हणाले, “जे लोक रामापासून दूर जातात…”
Uddhav Thackeray Rally
उद्धव ठाकरेंची डोंबिवलीत भर पावसात सभा, म्हणाले; “४ जून देशात डी-मोदीनेशन…”
Narendra Modi
“…तर मला फाशी द्या”, अदाणी-अंबानी मुद्द्यावरून मोदींचं थेट आव्हान; म्हणाले, “संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा…”
What Narendra Modi Said?
नरेंद्र मोदींचा टोला, “बोफोर्सचं पाप धुण्यासाठी राफेलचा मुद्दा काढला गेला, काँग्रेसच्या काही लोकांना मानसिक आजार..”
Uddhav thackerayee
“….म्हणून मला किंमत आहे”, उद्धव ठाकरेंचं विधान चर्चेत; म्हणाले, “नुसत्या उद्धवला…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
ajit pawar sharad pawar
अजित पवार नॉट रिचेबल, शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले; “त्यांना..”

हेही वाचा : “राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होण्याची शक्यता”, प्रकाश आंबेडकरांचा दावा; वेळही सांगितली, “शिवशक्ती-भीमशक्तीबाबत म्हणाले…”

उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे यांची आज ठाण्यात सभा होत आहे. यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी याआधीदेखील सभा घेतल्या आहेत. त्यांच्या सभेला २०० ते ३०० लोकं असायचे. आता निवडणुका आहेत, त्यामुळे ज्यांना यायचं, सभा घ्यायच्या आहेत त्यांना घेऊ द्या. ते येतील नेहमीप्रमाणे टोमणे मारतील. काही सकारात्मक बोलणार नाहीत. लोकांना आता ते अंगवळणी पडलं आहे. लोक त्यांना प्रतिसाद देत नाहीत. त्यांच्या सभेचा आमच्यावर कुठेही परिणाम होणार नाही”, असंही शंभूराज देसाई म्हणाले.

महाविकास आघाडीच्या अनेक लोकांनी मदत केली

आज भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटरवर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, “आमचा अनुभव असा आहे की, मी सात ते आठ लोकसभा मतदारसंघात जाऊन आलो. अनेक लोकांनी आम्हाला अप्रत्यक्ष मदत केली. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या काही लोकांनी आम्हाला उघड उघड मदत न करता आतून मदत केली. त्यांनी आम्हाला सांगितलं की, आम्हाला तुमचे विचार मान्य आहेत. त्यामुळे आम्हाला तुम्हाला (महायुतीला) मदत करायची आहे. अनेक लोकांनी आम्हाला (महायुतीला) अप्रत्यक्ष सहकार्य केलं.आज आम्ही त्यांचं नाव घेत नाहीत, मात्र निकाल लागल्यानंतर महायुतीमध्ये येणाऱ्यांचा लोंढा वाढलेला पाहायला मिळेल”, असा मोठा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे.