scorecardresearch

Premium

राहुल गांधींनी स्वीकारला तीन राज्यांमधला पराभव, अपयशानंतर केलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले, “विचारांची…”

Rahul Gandhi Statement on Election Result : चारपैकी तीन राज्यांत भाजपाची यशस्वी वाटचाल सुरू आहे तर, तेलंगणामध्ये काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे. यावरून राहुल गांधी यांनी पोस्ट केली आहे.

Rahul Gandhi on Election Result 2023
तीन राज्यातील अपयशावर राहुल गांधी काय म्हणाले? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Election Results 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने मुसंडी मारली आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाच्या यशामुळे सत्तांतर होण्याची तर मध्य प्रदेशात भाजपा सत्ता कायम राखण्याचा अंदाज आहे. सध्याच्या मतमोजणीच्या कौलनुसार भाजपा या तिन्ही राज्यांत सत्ता स्थापन करू शकणार आहे. तर, तेलंगणात बीआरएसचा धोबीपछाड करत काँग्रेसने आघाडी घेतली आहे. राजकीय सध्यस्थितीवरून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

सायंकाळी ६.३० पर्यंतच्या आकडेवारीनुसार छत्तीसगडमध्ये भाजपा ३४ आणि काँग्रेस ३६, मध्य प्रदेशात भाजपा १६३ आणि काँग्रेस ६६, राजस्थानमध्ये भाजपा ११५ आणि काँग्रेस ६९ आणि तेलंगणात काँग्रेस ६४, बीआरएस ३९ आणि भाजपा ४ जागांवर आघाडीवर आहे. येत्या काळात हा निकालही स्पष्ट होणार आहे. म्हणजेच, चारपैकी तीन राज्यांत भाजपाची यशस्वी वाटचाल सुरू आहे तर, तेलंगणामध्ये काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे. यावरून राहुल गांधी यांनी पोस्ट केली आहे.

akhilesh_yadav_mallikarjun_kharge
बिहार, पंजाब, बंगालनंतर आता उत्तर प्रदेशमध्येही इंडिया आघाडीत खदखद? अखिलेश यादव यांची भूमिका काय?
Who is made indian constitution Ambedkar or Nehru
‘संविधान निर्मितीमध्ये आंबेडकरांपेक्षा नेहरुंचे श्रेय अधिक’, वाद उफाळल्यानंतर काँग्रेस नेत्याकडून पोस्ट डिलीट
MAMATA BANERJEE AND NITISH KUMAR
ममता बॅनर्जींच्या ‘एकला चलो रे’नंतर काँग्रेसचे नरमाईचे धोरण; इंडिया आघाडीत काय चाललंय?
Himanta Biswa Sarmas Most Corrupt In India Rahul Gandhi
“लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक करणार, कारण…”, हिंमता बिस्व सरमांचा इशारा

हेही वाचा >> तीन राज्यांत भाजपाचा विजय निश्चित; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

“मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा जनादेश आम्ही नम्रतेने स्वीकारत आहोत. विचारांची लढाई सुरूच राहील”, असं राहुल गांधींनी अपयश स्वीकारत म्हटलं आहे.

तर, “तेलंगणाच्या लोकांचे मनापासून आभार. लोकांचं तेलंगणा बनवण्याचा आमचा प्रयत्न असाच सुरू राहील. सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या मेहनत आणि समर्थनासाठी मनपूर्वक आभार”, असं राहुल गांधी म्हणाले.

मध्य प्रदेशच्या निकालानंतर कमलनाथ याची प्रतिक्रिया काय?

आम्ही या निवडणुकीच्या निकालावर विचार करू. आमच्यात काय कमतरता आहेत याचं आत्मपरिक्षण करू. आम्ही मतदारांना आमचं म्हणणं का समजून सांगू शकलो नाही, यावर चर्चा करू. उमेदवार जिंकलेला असो, अथवा पराभूत झालेला असो; सगळ्यांशी चर्चा करू. त्या चर्चेनंतर आम्ही या निकालाचा निष्कर्ष काढू.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rahul gandhi x post after failed in madhya pradesh chattisgad rajsthan election 2023 sgk

First published on: 03-12-2023 at 18:42 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×