नागपूरच्या उमरेड भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बाईक चालवून प्रचार केला. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कंबर कसली आहे. विदर्भातला पारा ४२ अंशांवर पोहचला आहे तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाईक चालवत राजू पारवेंचा प्रचार केला ही बाब चर्चेत आली आहे.

उमरेडमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी

राजू पारवेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्याने उमरेडमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. राजू पारवेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोड शो करत आहेत. विदर्भात शेवटच्या टप्प्यातला प्रचार सुरु आहे. त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदेंनी हा रोड शो केला.

हे पण वाचा- रश्मी बर्वे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे शिवसेनेपुढे आव्हान; रामटेक लोकसभा मतदारसंघाचे चित्र

भर उन्हात एकनाथ शिंदे टपरीवर प्यायले चहा

विदर्भात आज संध्याकाळी ५ वाजता पहिल्या टप्प्यातल्या रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा प्रचार संपणार आहे. सगळ्याच उमेदवारांनी शेवटच्या दिवशी प्रचारात सगळी ताकद पणाला लावल्याचं दिसून येतं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी असलेल्या भर उन्हात टपरीवर चहाही प्यायले आहेत. त्यासंदर्भातला व्हिडीओही चर्चेत आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री दोन दिवस नागपूरमध्ये

निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री नागपुरात दोन दिवस तळ ठोकून आहेत . रामटेक मधील शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी नरखेड आणि सावनेर येथे विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडणार आहे. आज प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमरेडच्या मारवाडी राम मंदिरात दर्शन घेतलं.