उद्धव ठाकरेंनी सांगलीत चंद्रहार पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत त्यांनी सुरुवातीलाच मतदारांची माफी मागितली. भाजपाचं लचांड आम्ही गळ्यात बांधून घेतलं होतो कारण आम्हीच मूर्ख होतो असं भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच भाजपाचा बुरखा आता उतरला आहे असंही वक्तव्य केलं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“भाजपाचा बीभत्स, विकृत चेहरा जगासमोर आला आहे. आपला देश भाजपाने बदनाम केला आहे. निवडणूक म्हटल्यानंतर महत्वाकांक्षा आणि इच्छा असते. युती केल्यानंतर, आघाडी केल्यानंतर गमावलेल्या गोष्टी, जागा कमवायची कशी? हे बघत असतो. देश संकटात असताना सांगलीकर फुटणार आहेत का? लोकशाहीच्या बाजूने मतदान करणार की हुकूमशाहीच्या बाजूने मतदान करणार? ” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

इंग्रजांनी भारतात गद्दारांना बरोबर घेऊनच राज्य केलं आत्ताची स्थिती तशीच

“इंग्रज भारतात आले तेव्हा गद्दारांना बरोबर घेऊनच राज्य केलं होतं. आज तीच परिस्थिती देशात परत आली आहे. आम्ही रामटेक आणि कोल्हापूरच्या जागा दिल्या. कारण ही आघाडी आहे. आघाडीचा फायदा हा मित्रांना झाला पाहिजे. कोल्हापूरमध्ये मी गेलो होतो तेव्हा शाहू महाराज म्हणाले की शिवसैनिक कमाल आहेत. शिवसेनाच जागा लढवते आहे अनुषंगाने ते काम करत आहेत. त्यामुळे जिंकणारच. अशा शिवसैनिकांचा मला अभिमान आहे. चंद्रहार जिंकल्यानंतरही तेच सांगणार. शिवसैनिकांची मेहनत आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळेच. याला आघाडी म्हणतात. भाजपाने आमच्या बरोबर विश्वासघात केला नसता तर आम्ही राहिलो असतो त्यांच्या बरोबर. त्यावेळी सांगली कुणाकडे गेली असती? महाराष्ट्र माझ्या डोळ्यांसमोर लुटला जातो आहे ते पाप मी पाहू शकत नाही. त्यामुळे मी भाजपाबरोबरच्या युतीला लाथ मारुन त्यांच्यापासून बाहेर पडलो.”

हे पण वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींची टोलेबाजी, “उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा, शरद पवारांना या वयात कुटुंब सांभाळता आलं नाही”

पिक्चर अभी बाकी है हे मोदींचं वाक्य भीतीदायक

“सांगलीचे काही विषय आहेत जे केंद्राच्या अखत्यारीतले आहेत. इथल्या आत्ताच्या खासदारांना तु्म्ही लोकसभेत का पाठवलं असा प्रश्न तुम्हाला पडला आहे. आम्हाला वाटलं होतं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत तर प्रश्न चुटकीसरशी सुटतील. तसं काहीच झालं नाही. मोदी आत्ता महाराष्ट्रात फिरत आहेत आणि सांगत आहेत की दहा वर्षे हा ट्रेलर होता पिक्चर बाकी आहे. मोदींचं हे वाक्य भीतीदायक आहे. कारण महागाई वाढली, गॅस सिलिंडरची किंमत वाढली, शेतकऱ्यांचं पिक कर्ज वाढलं, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं नाही, निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपाच्या खात्यात हजारो कोटी रुपये आले. हा सगळा ट्रेलर होता तर मग पिक्चर कसा असेल?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी सांगलीत विचारला आहे.

हे पण वाचा- देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य “पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंची फोनवरुन चौकशी करायचे, कारण..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

..तर हुकूमशाहीचं भूत मानगुटीवर बसणार

सांगलीत जर मतांमध्ये विभागणी झाली आणि हुकूमशाहीचं भूत मानगुटीवर बसणार हे विसरु नका. घटना बदलायचे डोहाळे मोदी आणि भाजपाला लागले आहेत. भाजपा रोज खोटं बोलत असेल तर मी रोज खरं बोललो तर फरक काय पडतो आहे? माजी खासदारांनी सांगितलं की घटना बदलण्यासाठी ४०० पार जागा पाहिजे. महाराष्ट्राविषयीचा आकस यांच्या नसांमध्ये भिनला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली आहे. दलित कुटुंबातला माणूस इतका बुद्धीमान कसा काय? याचा यांना आकस आहे म्हणून यांना घटना बदलायची आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.