महायुतीच्या कोकणातील जागा वाट पाहत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघाचा सस्पेन्स कायम आहे. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असलेले ठाणे येथील रवींद्र फाटक व डॉ.विनय नातू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर राजेश बेंडल यांच्या नावावरती अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
गुहागर मतदारसंघातून भाजपाचे माजी आमदार विनय नातू यांनी गेले वर्षभर तयारी सुरू केली होती. अशातच गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीची मागणी पालकमंत्री उदय सामंत व पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र नातू यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय ही उमेदवारी जाहीर करणे शिवसेनेलाही परवडणार नाही याची जाणीव असल्याने या जागेचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला होता. गुहागर शहर विकास आघाडीचा केलेला प्रयोग गुहागर विधानसभेत डॉ. विनय नातू तोच प्रयोग पुन्हा एकदा करण्याची शक्यता नगरपंचायत निवडणुकीत नातूंचा हा फॉर्म्युला विधानसभा निवडणुकीत वापरला जाण्याची शक्यता आहे.
विनय नातू यांची खास भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय ठाण्यातील रवींद्र फाटक दोन दिवसांपूर्वी गुरुवारी गुहागर दौऱ्यावरती आले होते.यावेळी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी रवींद्र फाटक यांच्याबरोबर शिवसेनेचे गुहागर तालुक्यातील काही पदाधिकारी होते. गुहागर तालुक्यातील मार्गताम्हाने येथील नातू यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी ही भेट घेतली आहे. यावेळी नातू यांच्याबरोबर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी झालेल्या बैठकीत रवींद्र फाटक यांनी नातू यांना सहकार्य करण्याची विनंती केली असून आपण एकमेकांना सहकार्य करून ही जागा निवडून आणू अशा स्वरूपाची चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येत गुहागर नगरपंचायत निवडणुकीत सहा वर्षांपूर्वी केलेली गुहागर शहर विकास आघाडी व त्यावेळी मिळवलेल्या १६ जागांवरती यश व त्यावेळेला माजी आमदार विनय नातू यांच्या सहकार्यानेच राजेश बेंडल हे नगराध्यक्ष झाले होते. आता शहर विकास आघाडीचा तोच फॉर्म्युला माजी आमदार विनय नातू हे या विधानसभा निवडणुकीत वापरण्याची शक्यता अधिक आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आम्ही गुहागरचा उमेदवार हा विमानातून घेऊन येऊ असं सांगत या गुहागर विधानसभा मतदारसंघात सस्पेन्स अधिकच वाढवला होता. याच मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांचे नाव यापूर्वी समोर आलं होतं मात्र आता हे नाव मागे पडले आहे. त्यामुळे आता पालकमंत्री उदय सामंत दौऱ्यावर असून ते आता पुन्हा येताना राजेश बेंडल यांना विमानातून घेऊन येतील अशी चर्चा आहे.