Wayanad byelection result 2024: काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आपल्या पहिल्या निवडणुकीत विक्रमी विजय मिळवला आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांनी चार लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवत बंधू राहुल गांधींचा मताधिक्याचा विक्रम मोडला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी ३.६५ लाख मतांनी विजयी झाले होते. आता प्रियांका गांधी यांनी या आघाडीला मागे टाकत मोठी आघाडी मिळवलीय. वायनाड पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यांच्यातील मतांचा फरक लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले राहुल गांधी आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त होता. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी यांनी ट्विट करत वायनाडमधील जनतेचे आभार मानले आहेत.

राहुल गांधी यांनी वायनाडच्या जनतेचे आभार मानले

प्रियंका गांधी यांच्या विजयानंतर राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणतात, “वायनाडमधील माझ्या कुटुंबाने प्रियांकावर विश्वास ठेवल्यामुळे मला खूप अभिमान वाटतो. मला माहित आहे की ती धैर्य, करुणा आणि अतुल समर्पणाने आपल्या प्रिय वायनाडला प्रगती आणि समृद्धीच्या शिखरावर नेईल.”

पाहा राहुल गांधी ट्विट

प्रियंका गांधी यांनी वायनाडच्या जनतेचे आभार मानले

दरम्यान विजयानंतर प्रियांका गांधी यांनी वायनाडच्या जनतेचे आभार मानले आहेत. ‘वायनाडच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. काळाच्या ओघात हा विजय तुमचा विजय आहे, याची तुम्हाला जाणीव होईल आणि तुम्ही तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडलेली व्यक्ती तुमच्या आशा-स्वप्ने समजून घेईल आणि तुमच्यासाठी लढेल, याची मी खात्री करून देते. संसदेत तुमचा आवाज होण्यासाठी मी उत्सुक आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘मला हा सन्मान दिल्याबद्दल आणि त्याहीपेक्षा तुम्ही मला दिलेल्या अपार प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. यूडीएफमधील माझे सहकारी, संपूर्ण केरळमधील नेते, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि माझ्या कार्यालयातील सहकारी ज्यांनी या मोहिमेत प्रचंड मेहनत घेतली, आपल्या पाठिंब्यासाठी, दिवसाला १२ तासांचा (अन्न नाही, विश्रांती नाही) गाडीचा प्रवास सहन केला आणि त्या आदर्शांसाठी खऱ्या सैनिकांप्रमाणे लढा दिला, आपण सर्वजण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्यांचे खूप खूप आभार. तुम्ही मला जे प्रेम आणि धैर्य दिले आहे त्याबद्दल कोणतीही कृतज्ञता कधीही पुरेशी ठरणार नाही. आणि माझा भाऊ राहुल, तू त्या सर्वांमध्ये सर्वात धाडसी आहेस. मला मार्ग दाखवल्याबद्दल आणि मला नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद!