उत्तर मध्य मुंबईच्या भाजपाच्या खासदार पूनम महाजन आणि ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली. पूनम महाजन यांच्याऐवजी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम तर मनोज कोटक यांच्याजागी आमदार मिहीर कोटेचा यांना तिकीट देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर तिसऱ्यांदा निवडणूक लढवू शकतात, तर पूनम महाजन यांनी काय पाप केले होते? असा प्रश्न भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना लोकसत्ता लोकसंवाद या कार्यक्रमात विचारण्यात आला. यावर उत्तर देत असताना विनोद तावडे यांनी २०१९ साली त्यांचेच तिकीट कसे कापण्यात आले होते, याचे उदाहरण दिले.

विनोद तावडे म्हणाले, प्रत्येक नेत्याविषयी पक्षाची काहीतरी योजना असते. मलाही २०१९ ला तिकीट नाकारण्यात आले होते. पण मी आज पक्षात एका पदावर काम करत आहे. त्याचप्रमाणे पूनम किंवा मनोज यांच्याबद्दलही पक्षाचे काहीतरी नियोजन असू शकते. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्री न करता पुढे काय करायचे? याची योजना आधीच तयार केलेली असते. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे ७० वर्षांच्या आहेत. पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री करायचे की नवीन कुणाला तरी संधी द्यायची? हा प्रश्न असतो. शिवराज चौहान १८ वर्ष मुख्यमंत्री होते, त्यामुळे नवीन माणूस आणलाच पाहीजे.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनाही राज्यसभेत आणून त्यांचा उपयोग करून घेतला जाणार होता. पूनम आणि इतर नेत्यांबद्दल पक्ष काहीतरी विचार करणार असेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिष शेलारांनी लोकसभा लढविण्यास नकार का दिला?

उज्ज्वल निकम किंवा नवनीत राणा यांना भाजपाने उमेदवारी जाहिर केल्यानंतर त्यांचा भाजपात पक्षप्रवेश झाला. पक्षात नसतानाही उमेदवारी देण्याची नामुष्की का ओढवली? याबाबतही विनोद तावडे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, भाजपाच्या मूळ नेत्यांनी निवडणूक लढविण्यासाठी नकार दिला. वांद्रे पश्चिम विधानसभेचे आमदार आशिष शेलार यांनी लोकसभा लढविण्यास नकार दिला. राज्यात आणखी पाच वर्ष काम करण्याची संधी मिळावी, अशी सबब त्यांनी पुढे केली असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.