– अभय नरहर जोशी

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय देव शहाने २०२३ ची अमेरिकेतील ‘स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी’ ही राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची स्पर्धा नुकतीच जिंकली. या शब्दरचना ओळख स्पर्धेत भारतीय वंशाच्या मुलांनी वर्चस्व गाजवल्याचे आतापर्यंतची यादी पाहिल्यास लक्षात येते.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Marathi Actress Vishakha Subhedar wrote a special post for son abhinay subhedar birthday
अभिनेत्री विशाखा सुभेदारने लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली, “जे शिकायला परदेशी गेलायस…”
Mohammed Shami Accused of Age Fraud With Viral photos of Driving License Ahead Of Border Gavaskar Trophy IND vs AUS
Mohammed Shami Age Fraud: मोहम्मद शमीनं खरं वय लपवलं? फसवणूक केल्याचे जाहीर आरोप; BCCI कडे केली तपासाची मागणी!
Snake Bites Man Viral Video
जंगलात तब्बल ७ सापांशी खेळत होता तरुण, इतक्यात एकाने काढला फणा अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
ranveer singh share joy after being father
Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल

या स्पर्धेचे यंदाचे विजेते कोण?

अमेरिकेतील ‘स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी’ ही राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची स्पर्धा फ्लोरिडात आठवीत शिकणाऱ्या देव शहाने नुकतीच जिंकली. यंदाची ही ९५ वी स्पर्धा होती. शहाने अचूक ‘स्पेलिंग’ सांगत या स्पर्धेच्या विजेतेपदासाठीचे ५० हजार डॉलरचे पारितोषिक पटकावले. ही स्पर्धा मेरीलँड येथील ‘नॅशनल हार्बर’ येथे झाली. त्याला विजेतेपदासाठी ‘सॅमोफाइल’ या वालुकामय भागातील वनस्पतीसदृश सजीवाच्या नावाचे ‘स्पेलिंग’ विचारले गेले. हसतमुख देवने त्याचे अचूक उत्तर देताच एकच जल्लोष झाला. त्याने ५० हजार डॉलरचे रोख पारितोषिक, पदक व ‘स्क्रिप्स करंडक’ पटकावला. देवने तिसऱ्यांदा या स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने यापूर्वी २०१९ आणि २०२१ मध्ये भाग घेतला होता. देव स्वयंप्रेरित असून, त्याच्याकडे चिकाटी, परिपक्वता आणि दृढ संकल्प आहे, असे त्याचे प्रशिक्षक स्कॉट रेमर यांनी सांगितले. जगभरातून एक कोटी दहा लाख स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यातून उपउपांत्य आणि उपांत्य फेरीनंतर देवसह ११ जणांची अंतिम फेरीत निवड झाली. व्हर्जिनियातील अर्लिंग्टन येथील आठवीतील शार्लोट वॉल्शने दुसरा क्रमांक मिळवला. तिने २५ हजार डॉलरचे बक्षीस जिंकले. भारतीय वंशांच्याच श्रद्धा राचमरेड्डी आणि सूर्या कप्पू यांना तिसरा क्रमांक विभागून मिळाला. त्यांना प्रत्येकी १२ हजार ५०० डॉलरचे बक्षीस मिळाले.

भारतीय अमेरिकनांचे वर्चस्व किती?

‘नॅशनल स्पेलिंग बी’ ही राष्ट्रीय स्पर्धा १९२५ मध्ये सुरू झाली. नऊ वृत्तपत्रांनी एकत्र येत ही स्पर्धा सर्वप्रथम आयोजित केली. गेल्या दोन दशकांत भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेवर वर्चस्व गाजवले आहे. अमेरिकेत भारतीय वंशाचे नागरिक एकूण लोकसंख्येच्या अवघे एक टक्का असतानाही या स्पर्धेवर मात्र त्यांचे वर्चस्व आहे. १९८५ मध्ये ही स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय बालू नटराजन होते. योगायोगाने त्यांच्या मुलाने, आत्मन बालकृष्णनने २०१८ मध्ये स्पर्धेत भाग घेतला होता. रागेश्री रामचंद्रन १९८८ मध्ये हे विजेतेपद पटकावणारी दुसरी भारतीय वंशांची अमेरिकन ठरली. १९९९ पासून आतापर्यंत २६ भारतीय वंशाच्या अमेरिकन स्पर्धकांनी या स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. २०२० मध्ये करोना महासाथीमुळे ही स्पर्धा आयोजित केली नव्हती. २०१९ मध्ये या स्पर्धेतील आठ सहविजेत्यांपैकी सात भारतीय वंशांचे अमेरिकन होते. २०२१ मध्ये आफ्रिकन-अमेरिकन विद्यार्थिनी झैला अवांत गार्देने ही स्पर्धा जिंकून भारतीय-अमेरिकनांची १२ वर्षांची विजयी मालिका खंडित केली होती.

अन्य यशस्वी भारतीय अमेरिकन कोण?

याआधीच्या भारतीय वंशाच्या अमेरिकन विजेत्यांमध्ये नूपुर लाला (१९९९), प्रत्युष बुद्धिगा (२००२), साई गुंटुरी (२००३), अनुराग कश्यप (२००५), समीर मिश्रा (२००८), काव्या शिवाशंकर (२००९), अनामिका वीरामणी (२०१०), सुकन्या रॉय (२०११), स्निग्धा नंदीपती (२०१२), अरविंद महांकाली (२०१३), श्रीराम जे. हाथवर आणि अन्सून सुजो (२०१४), वान्या शिवशंकर आणि गोकुळ वेंकटचलम (२०१५), जयराम हाथवर आणि निहार सैरेड्डी जंगा (२०१६), अनन्या विनय (२०१७), कार्तिक नेम्मानी (२०१८) आणि ऋषिक गंधश्री, साकेथ सुंदर, श्रुतिका पाध्य, सोहम सुखटणकर, अभिजय कोडाली आणि रोहन राजा (२०१९), हरिनी लोगान (२०२२) आणि यंदाचा म्हणजे २०२३ चा विजेता देव शहा यांचा समावेश आहे. या स्पर्धेतील उपविजेत्यांमध्येही बऱ्याच भारतीय-अमेरिकनांचा समावेश आहे.

या यशाचे गमक काय?

ॲमहर्स्ट महाविद्यालयातील समाजशास्त्र आणि अमेरिकन अभ्यासविषयांच्या आंतरविद्या शाखेचे प्रा. पवन धिंग्रा यांनी सांगितले की, ‘‘हे यश या कुटुंबीयांच्या दृढ संकल्पातून आणि बांधिलकीमुळे मिळालेले आहे. या स्पर्धेसाठी आपल्या मुलांची तयारी करण्यासाठी आपला वेळ आणि पैसा खर्च करण्याची त्यांची तयारी असते. ही मुले फक्त ‘स्पेलिंग’मध्येच नव्हे तर भूगोल, गणित, इतर शैक्षणिक स्पर्धांमध्येही अग्रेसर असतात.’’ अमेरिकेत भारतीयांची संख्या, सामाजिक प्रभाव तुलनेने कमी असला तरी या शैक्षणिक यशामुळे त्याची भरपाई होऊन आपल्या मुलांना नामांकित विद्यापीठांत प्रवेश मिळू शकेल, असे अनेक पालकांना वाटते.

हेही वाचा : विश्लेषण: मुंबईला यंदाही ‘आयपीएल’ अजिंक्यपदाची हुलकावणी, रोहितच्या अपयशाचा फटका?

या यशाचे श्रेय कुणाला?

‘बीलाईन : व्हॉट स्पेलिंग बीज रिव्हिल अबाऊट जनरेशन झेडस् न्यू पाथ टू सक्सेस’ या पुस्तकाच्या लेखिका शालिनी शंकर यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले की, ‘‘भारतीय वंशाच्या अमेरिकन पालकांनी आपल्या मुलांना सर्व स्तरांवरील शैक्षणिक यश मिळावे म्हणून पूरक असे छंद मुलांसाठी शोधले. त्यांच्यासाठी ‘स्पेलिंग’ हा अभ्यासेतर उपक्रम ठरला. पहिले विजेते बालू नटराजन यांच्या कुटुंबात जशी या विषयाची परंपरा निर्माण झाली, तशी बहुसंख्य भारतीय वंशांच्या अमेरिकनांमध्ये ही परंपरा निर्माण झाली. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या मते, या स्पर्धेतील भारतीय-अमेरिकनांच्या झळाळत्या प्रभावी कामगिरीचे श्रेय हे उच्चशिक्षित पालकांची चिकाटी, कठोर परिश्रमालाच जाते.

abhay.joshi@expressindia.com