संदीप कदम

मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) हंगामात ‘क्वालिफायर-२’मध्ये गुजरात टायटन्सकडून ६२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचे लीगमधून आव्हान संपुष्टात आले. त्यांच्या ‘प्ले-ऑफ’पर्यंतच्या वाटचालीत कोणत्या खेळाडूंनी चमक दाखवली, कोणत्या खेळाडूंमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला, याचा घेतलेला हा आढावा.

Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Hardik Pandya Mental Health Going Bad Due to IPL 2024 Booing Abuses In Stadium
“हार्दिक पंड्याचं मानसिक आरोग्य बिघडतंय, तो तणावाचा..”, IPL मधील शिवीगाळ, ट्रोलिंग पाहून माजी सलामीवीराची माहिती
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामातील मुंबईची कामगिरी कशी राहिली?

मुंबईची हंगामाची सुरुवात निराशाजनक राहिली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु व चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर मुंबईने दिल्ली कॅपिटल्सवर सहा गडी राखून मात करत हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला. त्यानंतर त्यांनी कोलकाता नाइट रायडर्सवर ५ गडी राखून व सनरायजर्स हैदराबादवर १४ धावांनी विजय नोंदवला. त्यानंतर त्यांना पंजाब किंग्ज व गुजरात टायटन्स संघांनी नमवले. यानंतर त्यांनी राजस्थान रॉयल्सवर ६ गडी, तर पंजाब किंग्जवरही सहा गडी राखून विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्जकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतरच्या सामन्यात मुंबईने बंगळूरुवर सहा गडी राखून विजय नोंदवला. तर, आगामी लढतीत गुजरातवर २७ धावांनी मात केली. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्यांनी ५ धावांनी हार पत्करली. यानंतर मुंबईने सनरायजर्स हैदराबादवर ८ गडी राखून मोठा विजय नोंदवला. ‘एलिमिनेटर’मध्ये त्यांनी लखनऊवर ८१ धावांनी विजय साकारत ‘क्वालिफायर-२’मध्ये धडक मारली. तेथे मात्र, गुजरातकडून पराभूत व्हावे लागले.

मुंबईकडून कोणत्या फलंदाजांनी चमक दाखवली आणि कोणी निराशा केली?

मुंबईच्या संघाचे ‘प्ले-ऑफ’मध्ये पोहोचण्याचे सर्वाधिक श्रेय हे त्यांच्या फलंदाजांना जाते. त्यांनी अनेक सामन्यांत यशस्वीपणे २०० हून अधिक धावांचा पाठलाग करताना निर्णायक भूमिका पार पाडली. मुंबईकडून सर्वाधिक योगदान दिले, ते म्हणजे आपल्या फलंदाजी शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवने. त्याने १६ सामन्यांत मुंबईकडून सर्वाधिक ४३.२१च्या सरासरीने ६०५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर सूर्यकुमारने ‘आयपीएल’ने मध्ये आपली छाप पाडली. त्याने १२ मे रोजी गुजरातविरुद्ध झालेल्या सामन्यात नाबाद १०३ धावांची खेळी केली. तसेच, त्याने काही निर्णायक अर्धशतकी खेळीही केल्या. इशान किशनने ४५४ धावा केल्या. त्यानेही सलामीला येत आक्रमक फलंदाजी करताना संघाला चांगली सुरुवात करून केली.

विश्लेषण : स्पॅनिश फुटबॉलमध्ये वर्णद्वेष का ठरतोय कळीचा मुद्दा? व्हिनिशियसप्रकरणी काय प्रतिक्रिया उमटल्या?

ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन ग्रीनने मुंबईसाठी योगदान दिले. त्याने या हंगामात ४५२ धावा केल्या. त्याने अखेरच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध नाबाद १०० धावांची खेळी केली. तिलक वर्मानेही मुंबईसाठी ३४३ धावा केल्या. त्याला अन्य युवा फलंदाज नेहल वढेराचीही (२४१ धावा) साथ मिळाली. कर्णधार रोहित शर्मा या हंगामात म्हणावा तसा लयीत दिसला नाही. रोहितने ३३२ धावांचे योगदान दिले. तरीही, त्याला आपला प्रभाव पाडता आला नाही. त्याला अवघ्या दोन अर्धशतकी खेळी करता आल्या. तसेच, टिम डेव्हिडने निर्णायक क्षणी आक्रमक फटकेबाजी करताना संघाला विजय मिळवून दिले.

मुंबईचे गोलंदाज यंदाच्या हंगामात म्हणावा तसा प्रभाव का पाडू शकले नाहीत?

यंदाच्या हंगामात मुंबईच्या गोलंदाजांना दमदार गोलंदाजी करता आली नाही. त्यातच अनुभवी गोलंदाजांची कमतरता आणि असलेले गोलंदाज जायबंदी झाल्याने त्याचा फटका संघाला बसला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा व झाय रिचर्डसन यांनी दुखापतीमुळे हंगाम सुरू होण्याआधीच माघार घेतली. त्यामुळे मुंबईचा संघ अडचणीत सापडला. दरम्यान, जोफ्रा आर्चर मुंबईकडून काही सामने खेळला. मात्र, पुन्हा त्याला दुखापत झाल्याने तो मायदेशी परतला. या तीन गोलंदाजांच्या अनुपस्थितीत अनुभवी फिरकीपटू पीयूष चावलाने मुंबईला तारले. त्याने मुंबईसाठी या हंगामात २२ बळी मिळवताना निर्णायक भूमिका पार पाडली. यानंतर युवा आकाश मढवालने १४ बळी मिळवले. जेसन बेहेरनडॉर्फने इतकेच बळी मिळवताना आपले योगदान दिले. हे तीन गोलंदाज सोडल्यास मुंबईच्या इतर गोलंदाजांना छाप पाडता आली नाही. संधी मिळालेल्या अर्जुन तेंडुलकर, क्रिस जॉर्डन, कुमार कार्तिकेय व रायली मेरेडिथ यांना गोलंदाजीत चुणूक दाखवता आली नाही.

आगामी हंगामात मुंबईला कोणत्या बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे?

मुंबईचा संघ युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जातो. या हंगामातही तिलक वर्मा व नेहल वढेरासारख्या खेळाडूंनी आपले योगदान देत संघाला विजय मिळवून दिले. अनुभवी गोलंदाजांच्या अनुपस्थितीत मढवालसारख्या खेळाडूने चुणूक दाखवली; पण अनुभवी खेळाडू नसल्याचा फटकाही संघाला बसला. इतर संघांकडे अनुभवी गोलंदाज असताना मुंबईला मात्र, अशा गोलंदाजांची कमतरता जाणवली. मुंबईच्या कामगिरीची समीक्षा करण्यात येईल, असे मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी सांगितले.

विश्लेषण : मँचेस्टर सिटीने इंग्लिश फुटबॉलवर कशा प्रकारे वर्चस्व प्रस्थापित केले? प्रशिक्षक ग्वार्डियोला, हालँड यांची भूमिका किती महत्त्वाची?

“अनेक गोष्टींबाबत चर्चा करावी लागेल, मात्र घाईने काही करणे चुकीचे ठरेल. तसेच, तंदुरुस्तीबाबत काही खेळाडूंच्या भविष्याबाबतही आम्हाला माहिती मिळेल. आमच्याकडे गोलंदाजीत दोन आघाडीचे खेळाडू नव्हते. आम्ही त्यांची भरपाई करण्याचा प्रयत्न केला. ते लवकर तंदुरुस्त होतील अशी अपेक्षा आहे. मात्र, ते नसल्यास आम्हाला पर्याय शोधावे लागतील. बुमरा व आर्चर हे दोन्ही आघाडीचे गोलंदाज आहेत. ते नसल्याने आमचे गोलंदाजी आक्रमण कमकुवत होणे अपेक्षित होते. मी कोणालाही यासाठी दोष देत नाही. खेळात दुखापतींचा सामना सर्वांना करावा लागतो”, असे बाऊचर म्हणाले. त्यातच फलंदाजीमध्ये मध्यक्रमात मुंबईला अनुभवी फलंदाजाची आवश्यकता आहे.