पदवीचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रत्येकानं आपापल्या कॉलेजमध्ये जाऊन पदवीदान समारंभ पाहिला असेल. गोल्ड, सिल्व्हर किंवा पहिल्या नंबरात येणाऱ्यांनी स्टेजवर जाऊन आपलं पदवी प्रमाणपत्र घेतलंही असेल. पण जवळपास प्रत्येकानंच तो टिपिकल काळ्या रंगाचा कोट आणि चौकोनी आकाराची कॅप घालून पदवी प्रमाणपत्रासोबत फोटो काढून घेतला असेल. काहींनी त्याची फ्रेम करून घरातही लावली असेल. पण आता हा काळा डगला आणि वरची चौकोनी कॅप इतिहासजमा होण्याच्या मार्गाला लागली आहे. वसाहतवादाचं प्रतीक म्हणून या कोटला विरोध वाढत असून त्याअनुषंगाने पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांनी अंगवस्त्रम परिधान करावं, असा प्रस्ताव विचाराधीन आहे. दिल्ली विद्यापीठानं तर येत्या २५ फेब्रुवारीला होणाऱ्या समारंभात विद्यार्थ्यांना अंगवस्त्रम घ्यायला सांगितलं आहे!

ताजा कलम…

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
Surrogate Mother Case, First in nagpur, Approved, Surrogacy Act 2021, District Medical Board,
नवीन कायद्यानुसार नागपुरात पहिल्या ‘सरोगेट मदर’ प्रकरणास मंजुरी
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…
Pimpri, Instagram friendship, theft, Woman flees, man's phone, meetup,
मैत्रिणीने ‘इंस्टाग्राम’ वर मॅसेज करुन भेटायला बोलविले आणि….

येत्या २५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विद्यापीठाचा पदवीदान समारंभ पार पडणार आहे. विद्यापीठाच्या ९९व्या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना ‘ऐतिहासिक’ काळे कोट न घेता खांद्यावरून घेण्याचं अंगवस्त्रम वापरण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या पेहेराव समितीकडून यासंदर्भातला प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

खरंतर याआधीही मुंबई विद्यापीठानं अशा प्रकारचा एक निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील इतर काही महाविद्यालयांनीही अशा प्रकारे काळा कोट इतिहासजमा करून इतर पोशाख अंगीकारले होते. पण मुळात इतिहासजमा करण्यासाठी इतका कठीण जात असलेला हा ‘ऐतिहासिक’ काळा कोट अशा पदवीदान समारंभात घातलाच का जातो? याची सुरुवात नेमकी झाली कुठून?

पाश्चात्य प्रभाव?

सध्या जगभरातल्या अनेक शिक्षण संस्थांवर, त्यांच्या व्यवहार आणि शिक्षण पद्धतीवर जगप्रसिद्ध पाश्चात्य विद्यापीठांचा प्रभाव राहिला आहे. पदवीदान समारंभातील पोशाखावरही याचाच परिणाम झाला असावा, असं सांगितलं जातं. मात्र, काहींच्या मते पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेतील मुस्लीम तत्ववेत्त्यांपासून या पद्धतीची सुरुवात झाली. १०व्या शतकात स्थापन झालेल्या इजिप्तमधील मदरसा अल अजहरमध्ये सर्वप्रथम या कोटचा वापर करण्यात आल्याचं सांगितलं जातं. राईज ऑफ कॉलेजेस: इन्स्टिट्युशन्स ऑफ लर्निंग इन इस्लाम अँड दी वेस्ट या १९८१ साली जॉर्ज मगदिसी यांनी लिहिलेल्या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे.

विश्लेषण : पोलिसांसाठी ‘खबरी’ किती महत्त्वाचे? त्यांच्या ‘बक्षिसा’बाबत उच्च न्यायालयाचा निर्णय काय सांगतो?

युरोपियन विद्यापीठांची परंपरा

दरम्यान, विज्ञानविषयक प्रशिक्षणात जगभरात प्रसिद्ध असलेली मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एमआयटीच्या दाव्यानुसार काळा कोट परिधान करण्याची पद्धत १२व्या किंवा १३व्या शतकात सुरू झाली. या काळात युरोपमधील विद्यापीठे नुकतीच धार्मिक प्रभावातून मुक्त होऊ लागगली होती. त्या काळी एका सामान्य विद्यापीठ विद्यार्थ्याचा पोशाख हा एखाद्या क्लेरिकसारखा असायचा. युरोपातील मध्ययुगीन तत्ववेत्ते सामान्यपणे डोक्यावरील पूर्ण केस काढायचे. त्यावर हुडी किंवा स्कलकॅपसारखी कॅप घालायचे. आजच्या काळात आलेली चौकोनी कॅप ही फार नंतरच्या काळात वापरली जाऊ लागली.

कालांतराने वसाहतवादासोबत हा काळा डगला आणि चौकोनी कॅपही अमेरिकेत आली. न्यूयॉर्कमधल्या कोलंबिया विद्यापीठाच्या दाव्यानुसार, लांब काळे कोट आणि कॅपमुळे थंडीपासूनही संरक्षण व्हायचं. बऱ्याच काळापर्यंत कोलंबिया विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी दिवसाचा बहुतेक कालावधी हा काळा कोट आणि कॅप घालूनच फिरायचे. इतर सामान्य नागरिकांपासून विद्यार्थी वेगळे दिसावेत, म्हणून हा डगल्यांचा अट्टाहास केला जायचा!

फक्त काळा कोट नव्हे, त्यातही श्रेणीनुसार बदल!

हळूहळू काळ्या डगल्यातही बदल होऊ लागले. एखादा विद्यार्थी घेत असलेल्या शिक्षणाच्या आधारावर त्याच्या कोटवरील नक्षीकाम बदलत असे. उदाहरणार्थ, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोटसाठी एखादा विशिष्ट रंग किंवा नक्षीकाम, कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा रंग.

विश्लेषण: अयोध्येत आले १४० दशलक्ष वर्ष जुने शाळीग्राम; राम-जानकीच्या मूर्तींसाठी याच शिला का निवडल्या?

टोप्या का उडवल्या जातात?

आपण अनेकदा अशा पदवीदान समारंभाचे फोटो किंवा व्हिडीओ पाहिले असता समारंभ झाल्यानंतर डोक्यावरच्या काळ्या टोप्या उडवण्याची प्रथा दिसून येते. यामागे एक वेगळी धार्मिक प्रथा असल्याचा दावा नॅशनल जिओग्राफिकच्या लेखात आढळून येतो. पूर्वीच्या काळी प्रार्थनेची वेळ सोडता दिवसाचा इतर वेळ डोक्यावर टोपी परिधान केली जात असे. पण १९१२मध्ये अमेरिकन नेव्हल अकॅडेमीमधून उत्तर्ण झालेल्या परीक्षार्थींनी पदवीदान समारंभानंतर त्यांच्या कॅप आनंदाने हवेत भिरकावल्या. कारण त्यानंतर त्यांना नव्या ऑफिसर्स कॅप देण्यात आल्या होत्या. तिथूनच ही पद्धत सुरू झाल्याचा दावा या लेखात करण्यात आला आहे.

मग काळ्या डगल्यावर आक्षेप का?

काहीशे वर्षांची परंपरा असलेल्या या कोटवर आता आक्षेप घेतला जाऊ लागला आहे. २०१०मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी आयआयटी भोपाळच्या पदवीदान समारंभात भाषण करताना हा मुद्दा उपस्थित केला होता. “अत्यंत राक्षसी अशा वसाहतवादाच्या काळातील ही प्रथा आपण अजूनही का पाळतो, याचं कारण मला अद्याप समजू शकलेलं नाही. आपण साध्या पोशाखामध्ये पदवीदान समारंभ का करू शकत नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. असं करताना त्यांनी तेव्हा घातलेला काळा गाऊनही काढून ठेवला होता.

विश्लेषण: गौतम अदाणींचा पाय आणखी खोलात; S&P Dow Jones च्या यादीतून ‘अदाणी’ची गच्छन्ती! नेमकं घडतंय काय?

२०१५मध्ये यूजीसी अर्थात युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनकडून विद्यापीठांना हातमागावर विणलेले अंगवस्त्रम अर्थात लांब उपरणे वापरण्यास प्रोत्साहन देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. “असं केल्यामुळे एक भारतीय असण्याचा अभिमान तर वाटेलच, पण गरम वातावरणात हे अंगवस्त्रम परिधान करणं सोयीचंही ठरेल”, असं यूजीसीनं नमूद केलं.

२०१७मध्येही सध्याच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ फॉरेन ट्रेडच्या पदवीदान समारंभातही हाच मुद्दा उपस्थित केला होता. “पुढील वेळी तुम्ही तुमच्यातच एक स्पर्धा भरवा की तुम्ही तुमची पदवी कोणत्या पोशाखात घऊ इच्छिता. हा माझा साधा सल्ला आहे. मी स्वत: आज काळा गाऊन परिधान केलेला नाही. पण असं करून मला या प्रथेचा अपमान वगैरे करायचा नाही”,असं त्या म्हणाल्या.