मध्यमवर्गीयांसाठी व्याजमुक्त किंवा कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने प्रत्यक्षात आणली ती बजाज समूहातील आघाडीच्या बजाज फायनान्सने, तर बजाज ऑटोने ‘हमारा बजाज’ या आपल्याशा वाटणाऱ्या दोन शब्दांनी भारतीयांसह, लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि उदयोन्मुख देशातील मध्यमवर्गीयांना परवडेल अशा किफायतशीर दुचाकींवर स्वार केले. बजाज समूह भागधारकांसाठी संपत्ती निर्मितीत देखील कायम अग्रेसर राहिला आहे. त्याच मालिकेत बजाज ऑटोने भागधारकांना नववर्षाची भेट म्हणून ‘शेअर बायबॅक’ची घोषणा केली आहे. भागधारकांना भरभरून देण्याची बजाज उद्योगघराण्याची आजवरची परंपरा पाहता ताज्या निर्णयाबाबत गुंतवणूकदारांनी उच्च आशा बाळगाव्यात काय?

बजाज समूहातील कंपन्यांची सध्याची कामगिरी कशी?

बजाज समूहाच्या भांडवली बाजारात सध्या चार कंपन्या सूचिबद्ध आहेत. यामध्ये बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स आणि बजाज होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट लि. या कंपन्यांचा समावेश आहे. समूहाचे बाजार भांडवल गेल्या दशकात वार्षिक ४५ टक्क्यांहून वाढून १०.३४ लाख कोटी रुपये झाले आहे. बजाज समूहातील कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स ही सर्वात मोठी मूल्य निर्माती कंपनी आहे, जिने गेल्या १० वर्षात वार्षिक ८० टक्क्यांहून अधिक परतावा दिला. भांडवली बाजारातील आघाडीच्या दहा कंपन्यांमध्ये तिचा समावेश असून तिचे बाजारभांडवल सध्या ४.७६ लाख कोटी रुपये आहे. त्यानंतर बजाज फिनसर्व्हने ४८ टक्के चक्रवाढ पद्धतीने वार्षिक वाढ नोंदवली. तिचे बाजारभांडवल २,७१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. (कंपन्यांचे बाजारभांडवल ४ जानेवारी २०२३ रोजीचे आहे.) बजाज ऑटो ही जगातील तिसरी सर्वात मोठी मोटरसायकल उत्पादक आहे. कंपनीच्या एकूण महसुलात निर्यातीचा वाटा आर्थिक वर्ष २०१० मधील २८ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०२१ मध्ये १.६ अब्ज डॉलरसह ४७ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षात जवळपास २० लाख दुचाकींची निर्यात कंपनीने जगातील ७० हून अधिक देशांमध्ये केली. सरलेल्या वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये बजाज ऑटोचा समभाग ५७.३ टक्क्यांनी वधारला असून त्याने ७,०५९ रुपये हा ५२ आठवड्यातील उच्चांक गाठला. चौथी कंपनी बजाज होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंटचे बाजारभांडवल सध्या ९१,३७१ कोटी रुपये असून ते १ लाख कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. कंपनीचा समभाग सध्या ८,२०० रुपयांवर व्यवहार करत आहे. कंपनीने सप्टेंबर अखेर तिमाही ११० रुपयांचा अंतरिम लाभांश देऊन गुंतवणूकदारांनी झोळी भरली आहे. दिवंगत राहुल बजाज यांचा शेवटचा कार्यकाळ त्यांच्या भागधारकांसाठी सर्वात फायदेशीर ठरला.

Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

हेही वाचा : विश्लेषण : हमासचा नेता सालेह अरोरीच्या हत्येमागे कोण? पश्चिम आशियात तणाव वाढणार?

बजाज ऑटोचे विलगीकरण कधी आणि कसे फायद्याचे ठरले?

वर्ष २००३ मध्ये वाहन उद्योगाची परिषद भरली असताना राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या विलगीकरणासंदर्भात विचार मांडला. मात्र या योजनेची घोषणा करण्यासाठी २००७ वर्ष उजाडावे लागले. बजाज समूहाने बजाज ऑटो लिमिटेडचे (बीएएल) तीन कंपन्यांमध्ये विभाजन केले. यामध्ये एक वाहन उद्योगासाठी बजाज ऑटो, दुसरी वित्त क्षेत्रातील बजाज फिनसर्व्ह आणि तिसरी गुंतवणूक कंपनी बजाज होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट लि. स्थापन करण्यात आली. समूहातील कंपन्यांचे मुलांमध्ये विभाजन करण्याचा हेतू नसून भागधारकांना समूहातील गुंतवणुकीचा फायदा मिळावा यासाठी विभाजनाचे पाऊल उचलल्याचे राहुल बजाज यांनी त्यावेळी स्पष्ट केले. राजीव बजाज यांच्याकडे बजाज ऑटो, तर संजीव बजाज यांच्याकडे बजाज फिनसर्व्हची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र बजाज होल्डिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे अध्यक्ष या नात्याने त्यावेळी राहुल बजाज यांनी समूहाचे अधिकार स्वतःकडे कायम ठेवत समूहाची धुरा समर्थपणे सांभाळली. बजाज ऑटोच्या सर्व भागधारकांना १:१ (एकास एक) या प्रमाणात दोन नवीन कंपन्यांचे समभाग त्यावेळी देण्यात आले. म्हणजेच भागधारकांकडील प्रत्येक बजाज ऑटोच्या एका समभागामागे त्यांना बजाज होल्डिंग्ज आणि बजाज फिनसर्व्हचा प्रत्येकी एक समभाग देण्यात आला.

हेही वाचा : विश्लेषण : हाजीमलंग की श्रीमलंगगड…? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याविषयी जाहीर बोलण्याची गरज का भासली?

बजाज ऑटोकडून गुंतवणूकदारांना नववर्षाची भेट काय?

आघाडीची दुचाकी कंपनी असलेल्या बजाज ऑटोने भागधारकांना वर्षारंभाची भेट देताना, समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) करण्याची योजना आखत असल्याचे बुधवारी स्पष्ट केले. कंपनीच्या संचालक मंडळाच्या पुढच्या आठवड्यात म्हणजेच सोमवारी, ८ जानेवारीच्या नियोजित बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला घेतला जाणार आहे. सरलेल्या २०२३ मध्ये बजाज ऑटोचा समभाग ८८ टक्क्यांनी वधारला असून निफ्टीमध्ये सर्वाधिक चांगली कामगिरी करणारा हा दुसरा समभाग आहे. बजाज ऑटोने याआधी जून २०२२ मध्ये २,५०० कोटी रुपयांची समभाग पुनर्खरेदी केली होती. त्यावेळी प्रति समभाग ४,६०० रुपये किमतीला ही खरेदी करण्यात आली होती. समभाग पुनर्खरेदी हा भागधारकांना त्यांनी गुंतवलेले भांडवल परत करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. “ज्या ज्यावेळी कंपनीच्या ताळेबंदात रोखीचे प्रमाण १५,००० कोटींच्या पुढे जाते तेव्हा आम्ही गुंतवणूकदारांना त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करतो. आर्थिक वर्ष २०२३-२४ अखेर कंपनीकडे २०,००० कोटी रुपयांचा राखीव निधी उपलब्ध असेल,” असे बजाज ऑटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बजाज म्हणाले. बजाज ऑटोने नवीन तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांच्या व्यवसायाची पुनर्रचना केली. बजाज ऑटोने अलीकडेच डिसेंबर २०२३ मध्ये एकूण विक्रीत १६ टक्क्यांनी वाढ नोंदवून ३.२६ लाख वाहनांची विक्री केली. तर या कालावधीत २.८३ लाख दुचाकींची विक्री केली. जी गेल्या वर्षी याच कालावधीत २.४७ लाख राहिली होती.

बजाज ऑटोची पुढील वाटचाल कशी असेल?

बजाज ऑटोने प्रसिद्ध ‘चेतक’ला इलेक्ट्रिक अवतारात पुन्हा बाजारात आणले. जी विद्युत दुचाकींच्या क्षेत्रात पुन्हा चांगली कामगिरी करत बजाज ऑटोची या क्षेत्रातील सत्ता टिकवून ठेवण्यास मदतकारक ठरेल. शिवाय कंपनीने विद्युत तीन चाकीदेखील (इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर) बाजारात आणली असून सरलेल्या वर्षात ५.८१ तीन चाकी वाहनांची विक्री केली. पुण्यातील चेतक टेक्नॉलॉजी प्रकल्पामध्ये विद्युत तीन चाकी वाहनाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांसाठी कंपनीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

हेही वाचा : मोफत कायदेशीर मदतीसंदर्भात भारतीय कायदा काय सांगतो? ही मदत कुणाला मिळते? कशी?

बजाज समूह भागधारकांसाठी संपत्ती निर्माता कशी?

दिवंगत राहुल बजाज यांनी भागधारकांवर भरभरून प्रेम केले. समूहाचे विलगीकरण मुलांसाठी नसून त्याचा भागधारकांना फायदा व्हावा यासाठी असल्याचे राहुल बजाज यांनी स्पष्ट केले होते. विलगीकरणाच्या आधी बजाज ऑटोने दर दोन-चार वर्षांनी एकास एक, दोनास एक अशा प्रकारे बक्षिस समभागांचे वाटप केल्याचा इतिहास आहे. याचबरोबर लाभांशाच्या माध्यमातून देखील त्यांनी भागधारकांची झोळी भरली आहे. विलगीकरणानंतर म्हणजे वर्ष २०१० मध्ये बजाज ऑटोने एकास एक बक्षीस समभाग दिला. तर राहुल बजाज यांचे निधन झाल्यानंतर बजाज फिनसर्व्हने एकास एक समभागाचे वाटप केले आणि समभागाची विभागणीदेखील केली. २०१६ ला बजाज फायनान्सनेसुद्धा एकास एक बक्षीस समभाग दिला. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी बक्षीस समभाग आणि लाभांश वाटप करून राहुल बजाज यांनी गुंतवणूकदारांना कंपनीचे खरे भागीदार बनवले.

gaurav.muthe@expressindia.com