अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. न्यूयॉर्कच्या एका न्यायाधीशाने शुक्रवारी एका फसवणूक प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निर्णय दिलाय. तसेच त्यांना ३५५ दशलक्ष डॉलर (२९०० कोटींहून अधिक) दंडही ठोठावला आहे. ट्रम्प यांनी सुमारे एक वर्ष बँका आणि इतरांची फसवणूक केली आणि खोट्या आर्थिक विवरणाद्वारे त्यांची संपत्ती वाढवली, असंही न्यायाधीश म्हणालेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा ते पुन्हा एकदा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आणि रिपब्लिकन पक्षाकडून ते प्रमुख दावेदार म्हणून समोर आले आहेत.

प्रकरण काय होते?

२०२२ मध्ये न्यूयॉर्कचे ऍटर्नी जनरल लेटिशिया जेम्स यांनी ट्रम्प, त्यांचे पुत्र आणि त्यांचे माजी सहाय्यक ऍलन वेसेलबर्ग यांच्याविरुद्ध दिवाणी खटला दाखल केला. खटल्यात त्यांनी कर बिल कमी करण्यासाठी तसेच कर्जाच्या अटींमध्ये सूट मिळवण्याबरोबरच ट्रम्प यांनी एकूण संपत्ती वाढवण्यासाठी मालमत्तेचे मूल्य कमी दाखवून इतर कर्ज देणाऱ्या कंपन्या आणि विमा कंपन्यांशी खोटे बोलून त्यांची फसवणूक केल्याचा त्यांनी त्यांच्यावर आरोप केला. सप्टेंबर २०२३ मध्ये न्यायमूर्ती एन्गोरॉन यांनी ट्रम्प आणि इतर आरोपींना फसवणूक केल्याबद्दल दोषी ठरवले आणि जेम्स यांनी लावलेल्या आरोपांची खात्री करण्यासाठी कोणत्याही ट्रायलची आवश्यकता नाही, असा निर्णय दिला.

rahul gandhi clarifies his stance on the controversy over the congress manifesto
जातगणनेच्या नावाने ‘देशभक्त’ भयग्रस्त; राहुल गांधी यांची टीका, संपत्तीच्या फेरवाटपाच्या आरोपांनाही उत्तर
BJP manifesto 2024 Sankalp Patra continuity amid change
भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?
Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?

ट्रम्प यांनी न्यूयॉर्कमधील इतर कायद्यांचे उल्लंघन केले आहे का? त्यांच्यावर किती दंड ठोठावला जावा आणि ट्रम्प यांना न्यूयॉर्कमध्ये व्यवसाय करण्यास प्रतिबंधित केले जावे की नाही हे ठरवण्यासाठी ऑक्टोबरपासून ट्रायल सुरू होती. जानेवारीमध्ये सुनावणी पूर्ण झाली आणि न्यायमूर्ती एन्गोरॉन यांनी शुक्रवारी निकाल दिला. याबरोबरच न्यायाधीशांनी ट्रम्प यांना न्यूयॉर्कमधील कोणत्याही कॉर्पोरेशनमध्ये अधिकारी किंवा संचालक बनण्यास ३ वर्षांसाठी बंदी घातली आहे. परंतु न्यायाधीश पूर्वीच्या एका निर्णयापासून मागे हटले आहेत. ज्यात ट्रम्प यांच्या कंपन्या विसर्जित करण्याचा आदेश होता. न्यूयॉर्कमध्ये चार्टर्ड किंवा नोंदणीकृत कोणत्याही बँकेने ट्रम्प आणि त्यांच्या अनेक व्यवसायांना आणि संस्थांना तीन वर्षांसाठी कर्ज देऊ नये, असा निर्णयही त्यांनी दिला. ट्रम्प यांच्या वकील अलिना हब्बा यांनी या निकालाला अन्यायकारक आणि वर्षभर चाललेल्या राजकीय षडयंत्राचा परिणाम म्हटले आहे. या निर्णयाविरोधात ट्रम्प अपील करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचाः काँग्रेसची बँक खाती प्राप्तिकर विभागाने गोठवली, आता ११५ कोटींचे काय होणार?

सुमारे दोन महिन्यांच्या खटल्यानंतर न्यायाधीश आर्थर एन्गोरॉन यांनी आपला निर्णय दिला. सुनावणीदरम्यान ट्रम्प म्हणाले की, ते कायदेशीर व्यवस्थेचे बळी आहेत. तर न्यायाधीशांनी असा निष्कर्ष काढला की, ट्रम्प आणि त्यांचे सहकारी त्यांच्या कृतींची जबाबदारी स्वीकारण्यात अयशस्वी ठरलेत.” न्यूयॉर्कचे ॲटर्नी जनरल लेटिशिया जेम्स यांनी ट्रम्प यांच्याविरोधात हा खटला दाखल केला आहे. त्या डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्या आहे. या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कौटुंबिक व्यवसायांवर मोठ्या रकमेचे कर्ज मिळविण्यासाठी बँकर्सना मूर्ख बनवल्याचा आरोप होता. गेल्या दशकात त्यांच्या निव्वळ संपत्तीत वार्षिक ३.६ अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढ झाल्याचाही आरोप आहे.

हेही वाचाः गुगलने लाँच केले नवे AI मॉडेल जेमिनी १.५; अनेक अवघड कामे होणार सोपी, भारतातही सेवा सुरू

ट्रम्प दंड भरतील का?

फोर्ब्स मॅगझिनच्या रिपोर्टनुसार, ट्रम्प यांची एकूण संपत्ती २.६ अब्ज डॉलर इतकी आहे. माजी राष्ट्राध्यक्षावर लावण्यात आलेला दंड त्यांच्या संपत्तीच्या १४ ते १७ टक्के इतका आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही न्यूयॉर्क येथील न्यायालयाने ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरवले असून, लेखिका ई जीन कॅरोल (E Jean Carroll) यांना ५ लाख डॉलरची (जवळपास ४१ कोटी) नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या ९ सदस्यीय समितीने ट्रम्प यांना लैंगिक शोषण आणि लेखिका कॅरोल यांची बदनामी केल्याबद्दल दोषी ठरवले. मात्र बलात्काराचा आरोप फेटाळून लावल्याने ट्रम्प यांना थोडासा दिलासा मिळाला. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या कायदेशीर फीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, कारण ते फेडरल आणि राज्य स्तरावर चार गुन्हेगारी खटले लढत आहेत. हे एकत्रित आर्थिक ओझे ट्रम्प यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रोख रकमेपेक्षा जास्त असू शकते,” असेही बीबीसीने अहवालात म्हटले आहे. ट्रम्प न्यूयॉर्कमध्ये नोंदणीकृत किंवा चार्टर्ड बँकांकडून कर्ज घेऊ शकत नसल्यामुळे त्यांना त्यांची काही मालमत्ता विकावी लागण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, ट्रुथ सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपमधील त्यांची हिस्सेदारी सुमारे ४ अब्ज डॉलरइतकी असल्याचा अंदाज आहे, असेही बीबीसीने सांगितले. ती ते विकूही शकतात, असंही आता बोललं जातंय.