सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव हे नाव प्रेक्षकांसाठी काही नवं नाही. आपल्या अस्खलित विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव हे गेल्या दोन दशकात जवळपास सर्वश्रुत झाले. पण गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. देशभरातील आणि विदेशातील त्यांचे चाहते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत. मात्र, आज जरी ते रुग्णालयात मृत्यूशी संघर्ष करत असले तरी जीवनातील संघर्ष त्यांच्यासाठी काही नवा नाही!

“तू तुझ्या तब्येतीवर…” प्रसिद्ध अभिनेत्याने राजू श्रीवास्तवला दिला होता मोलाचा सल्ला

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
hardik pandya
मुंबई इंडियन्सच्या ‘हार्दिक’पर्वाला सुरुवात! सलामीच्या लढतीत आज गुजरात टायटन्सशी गाठ
IIIT Pune
आयआयआयटी पुणेमध्ये प्रवेशाच्या जागांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ, डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत उद्या पहिला पदवी प्रदान समारंभ

नेमकं काय घडलं होतं?

राजू श्रीवास्तव हे व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक खाली पडले. यानंतर त्यांना प्रशिक्षकाने तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी करण्यात आली आहे.

कोण आहेत राजू श्रीवास्तव

राजू श्रीवास्तव, ज्यांना गजोधर आणि राजू भैया म्हणूनही ओळखले जाते, ते एक भारतीय विनोदी कलाकार, अभिनेता आणि राजकारणी आहेत. २५ डिसेंबर १९६३ रोजी उत्तर प्रदेशातील कानपुर शहरात त्यांचा जन्म झाला. राजू यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव कवी असल्याने त्यांना बलाई काका म्हणत.

राजू सुरवातीपासून नक्कल फार उत्तम करत असल्याने त्यांना विनोदवीरच व्हायचे होते. १९८२ च्या आसपास त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. बॉलिवूडमध्ये नाव कमवण्यासाठी त्यांनी कानपूरहुन थेट मुंबई गाठली. ऐंशीच्या दशकात एकीकडे हिरोच्या बरोबरीने एक विनोदवीर नट लागत असे. जॉनी लिवर देखील याच काळात नावारूपास आले.

जॉनी लिवर यांनी देखील खडतर प्रवास करून बॉलीवूडमध्ये आपले नाव कमावले. राजू यांनी सुरवातीच्या काळात मनोरंजन क्षेत्रात काम मिळत नव्हते, तेव्हा काही काळ रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह केला होता. राजूंचा पहिला चित्रपट म्हणजे एन चंद्रा यांचा तेजाब, त्यातील बऱ्यापैकी कलाकार हे नवखे होते. चित्रपट सुपरहिट ठरला.

पुढे मैने प्यार किया, बाजीगर, आये आठवा खदानी रुपया, बिग ब्रदर, मै प्रेम कि दिवानी हू बॉम्बे टू गोवा यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले. मात्र राजू यांची खरी ओळख म्हणजे स्टँडअप कॉमेडियन. सुरवातीच्या काळात विनोदी कार्यक्रमांचे त्यांना अवघे ५० रुपये मिळत. ‘टी टाईम मनोरंजन’ या टीव्हीवरील कार्यक्रमातून त्यांनी विनोदी जगात पाऊल ठेवले.

राजू यांना सर्वात मोठे यश मिळाले ते द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये, जिथे ते उपविजेते होते. ‘गजोधर भैया’ हे त्यांचे प्रचलित पात्र जे आजही अनेकांच्या लक्षात आहेत. याव्यक्तिरिक्त त्यांनी अमिताभ बच्चन, लालू प्रसाद यादव, राम देव बाबा यांच्या नकला करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच त्यांनी शक्तीमान, बिग बॉस, कॉमेडी का महा मुकाबला, कॉमेडी सर्कस, कॉमेडी नाईट्स विथ कपिल इत्यादी टीव्ही मालिकांमध्ये काम केले.

ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर कॉमेडियन राजू श्रीवास्तवची तब्येत खालावली, मोदींकडून मदतीचा हात

राजकारणात प्रवेश :

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांना कानपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र ११ मार्च २०१४ रोजी त्यांनी तिकीट परत केले आणि सांगितले की, ‘त्यांना पक्षाच्या स्थानिक घटकांकडून पुरेसा पाठिंबा मिळाला नाही’. त्यानंतर १९ मार्च २०१४ रोजी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

बॉलिवूडमधून त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या, मात्र राजू यांनी कायमच स्टँडअप कॉमेडीला प्राधान्य दिले. सध्याच्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आपल्या प्रेक्षकांना कायमच हसवणारे आणि आपल्या विनोदी स्वभावामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.