प्राचीन काळापासून भारत जगातील समृद्ध देशांपैकी एक देश असल्याचे बोलले गेले. ब्रिटिश आर्थिक इतिहासकार अँगस मॅडिसन यांनीदेखील आपल्या लिखाणात याबाबत उल्लेख केलेला आहे. भारताच्या प्राचीन वैभवाला ब्रिटिशांच्या वसाहतवादामुळे गालबोट लागले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मागच्या ७५ वर्षांत भारत हळूहळू आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून गतवैभव मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या आर्थिक प्रगतीचा धांडोळा घेणारा ‘इंडिया इन सर्च ऑफ ग्लोरी’ (India in Search of Glory) हा ग्रंथ डॉ. अशोक लाहिरी यांनी लिहिला आहे. या पुस्तकात लहिरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून त्या प्रश्नांची उत्तरे देत असताना भारतीय राजकीय अर्थव्यवस्थेचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे.

कोणत्या कारणांमुळे भारत मागे राहिला?

स्वांतत्र्यप्राप्तीनंतर भारत एक अमाप लोकसंख्या असलेला देश बनला. आर्थिक प्रगतीबाबत चीन आणि कोरिया सारख्या देशांच्या तुलनेत आपण फार काही करू शकलेलो नाहीत. हे देश आपल्यापुढे कसे गेले? आपण नेमके कुठे कमी पडलो? किंवा अधिक स्पष्टपणे बोलायचे झाल्यास विकासाचा वेग साधण्यात आपण अपयशी का ठरलो? असे प्रश्न अनेक भारतीयांना पडतात. भारताला योग्य नेतृत्व मिळाले नाही की आपण चुकीची आर्थिक धोरणे राबविली? आर्थिक विकासाला अधिक महत्त्व देण्याची गरज असताना भारताने लोकशाही बळकट करण्यासाठी अधिक प्राधान्य दिले का? किंवा मग जातीय संघर्षामुळे आपण मागे राहिलो. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न लाहिरी यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?
india chiana Meeting in Beijing on India China border dispute
भारत-चीन सीमावादावर बीजिंगमध्ये बैठक; परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती

लेखक डॉ. अशोक लाहिरी कोण आहेत?

या ग्रंथाचे लेखक अशोक लाहिरी हे भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार होते. त्याशिवाय त्यांनी १५ व्या वित्त आयोगाचेही काम पाहिलेले आहे. सध्या ते पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे आमदार आहेत. लेखक अशोक लाहिरी हे अर्थव्यवस्थेच्या त्यांच्या गाढ्या अभ्यासाविषयी ओळखले जातात. या ग्रंथात त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबतचा साद्यंत इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

लाहिरी यांनी काय निष्कर्ष काढला?

लाहिरी यांनी लिहिले की, लोकशाहीने राष्ट्र निर्माण करण्यासाठी चांगली मदत केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्या सात दशकांत सामाजिक-आर्थिक विकासाला बगल दिली गेली. भारताची लोकशाही जशी जशी परिपक्व होत जाईल, तसे लोकांचे उत्पन्न वाढत जाईल, दारिद्र्य कमी होईल, वाढते शिक्षण आणि शहरीकरणामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा आशावाद अशोक लाहिरी व्यक्त करतात.

विस्तृत ग्रंथसूची आणि तळटिपा यांच्यासह या ८०० पानांच्या ग्रंथात २९ प्रकरणे आहेत. भारताच्या राजकीय आणि धोरणात्मक निर्णयांच्या परिणामांची चर्चा करण्यासाठी लाहिरी यांनी स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. त्यात बहुतेक वेळा त्यांनी विविध सरकारांचा पाच वर्षांचा कार्यकाळ याप्रमाणे भागांची विभागणी केली आहे.

हा ग्रंथ अलीकडेच प्रकाशित झालेला असला तरी त्याचा शेवट पंतप्रधान मोदींच्या २०१९ पर्यंतच्या कार्यकाळाने केलेला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा कार्यकाळदेखील संपत आलेला आहे, तरीही याचा उल्लेख या ग्रंथात केलेला नाही, हे विशेष. या ग्रंथात अनेक बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे. जसे की, दरडोई उत्पन्नाच्या वाढीपासून ते गरिबी, महागाई आणि महसुलाचे संतूलन राखणे. वगैरे.
आणखी एक विशेष बाब म्हणजे, या ग्रंथात २०१७-१८ या वर्षांपासून देशात बेसुमार वाढलेल्या बेरोजगारीचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेचे विश्लेषण होत असताना बेरोजगारीसारखा मुद्दा सुटला हे आश्चर्यच म्हणावे लागेल.

पुस्तकाचे नाव – India in Search of Glory
लेखक – डॉ. अशोक लाहिरी
प्रकाशक – पेंग्विन
पृष्ठे – ७१२
किंमत – ८९१