ओमायक्रॉनमुळे भारतात जवळपास करोनाची तिसरी लाट आली आहे. देशात गुरुवारी ९० हजारांहून अधिक नव्या करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, लसीकरण झालेल्यांनाही करोनाची लागण होत असल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे. मात्र सरकारतर्फे लसीकरण, करोना नियमांचे योग्य पालन हेच करोनाला दूर ठेवण्याचा मुख्य उपाय असल्याचे म्हटले आहे. करोना नियमांमध्ये हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे याचे पालन करणे महत्त्वाचे आहे. सरकारतर्फे वारंवार लोकांना मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करुन दंडही आकारण्यात येत आहे.

मात्र आता आरोग्य तज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कापडाचे मास्क हे ओमायक्रॉन संसर्ग टाळू शकत नाही. देशात करोनापासून बचाव करण्यासाठी अनेक जण कापडी मास्क घालून फिरतात. लहान विषाणू बाहेर पडण्यापासून आणि इतरांना संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी डॉक्टर एका लेयरचा कापडी मास्क टाळून कमीतकमी दोन किंवा तीनलेयर मास्क निवडण्याचे आवाहन करत आहेत. नवीन प्रकारच्या करोना व्हेरिएंटपासून संरक्षण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी सर्जिकल मास्कसह सिंगल-लेयर कापडी मास्क टाळून अधिक प्रभावी मास्क घालण्याची शिफारस केली आहे.

आरोग्य तज्ञांनी म्हटले आहे की सिंगल-लेयर मास्क, जे विषाणू वाहून नेणाऱ्या मोठ्या भागांना रोखण्यासाठी प्रभावी आहेत, ते ओमायक्रॉनच्या बाबतीत काम करु शकत नाहीत, असे दिसून आले आहे. स्पाइक प्रोटीनवरील उत्परिवर्तनामुळे ओमायक्रॉन प्रकार अत्यंत वेगाने पसरतो.

सीडीसी काय म्हणते?

अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) द्वारे जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दोन वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व लोक ज्यांना पूर्णपणे लसीकरण केले गेले नाही त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आवश्यक आहे.

“कापडाच्या मास्कखाली डिस्पोजेबल मास्क घाला, ज्यामध्ये अनेक थर असतील.नदुसऱ्या मास्कने चेहऱ्याच्या बाजू आणि दाढीचा आतील भाग झाकला पाहिजे. पुन्हा वापरता येण्याजोगे मास्क अस्वच्छ होतात त्यामुळे दिवसातून एकदा तरी धुवावेत,” असे सीडीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. तुमच्याकडे डिस्पोजेबल फेस मास्क असल्यास, तो घातल्यानंतर फेकून द्या, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

N९५ मास्क मदत करतात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

N९५ मास्क उपयुक्त ठरू शकतात कारण त्यांच्याकडे तंतूंचे जाळे दाट आहे. यामुळे हवेत सोडण्यात येणारे मोठे थेंब आणि एरोसोल रोखण्यात ते अत्यंत कार्यक्षम असतात. N९५ मास्क हवेतील ९५ टक्के कणांना फिल्टर करतो आणि योग्यरित्या फिट केल्यावर तोंड आणि नाक घट्ट बंद करतो. त्याच्या घट्ट बंद केल्यामुळे, कापडाच्या मास्कपेक्षा श्वास घेणे अधिक कठीण होऊ शकते. मात्र, आरोग्य तज्ञांनी असेही म्हटले आहे की जर तुमच्या चेहऱ्यावर विशिष्ट प्रकारचे केस असतील किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल तर N९५ मास्क घालू नका.