आयपीएल २०२२ च्या लिलावात मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरला आठ कोटी रुपयांना विकत घेतले. पण दुखापतीमुळे जोफ्रा कदाचित या मोसमात खेळू शकणार नाही. मात्र, असे असतानाही मुंबईने त्याला विकत घेतले आहे. आयपीएल २०२२ मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी आयपीएल सर्वात यशस्वी ठरलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने आर्चरला विकत घेतले आहे. तसेच ट्रेंट बोल्टलाही राजस्थान रॉयल्सने आठ कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये, डावखुरा वेगवान गोलंदाज ही एक अमूल्य संपत्ती आहे आणि दोन दिवसांच्या लिलावाने हे स्पष्ट केले आहे.

मुंबई इंडियन्सने दुखापतग्रस्त जोफ्रा आर्चरला आठ कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याने भुवया उंचावल्या आहेत.  कारण इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएल २०२२ मध्ये खेळण्याची शक्यता नाही.

जखमी जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्सन का विकत घेतले?

जोफ्रा आर्चर लिलावामध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. जवळपास एका वर्षापासून, आर्चरने कोणताही क्रिकेट सामना खेळलेला नाही आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रियेतून तो बरा होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. २६ वर्षीय जोफ्रा आर्चरने लिलावात २ कोटी रुपयांच्या बेस प्राईजवर सूचीबद्ध केले होते आणि बोली युद्धानंतर आठ कोटी रुपयांमध्ये मुंबईने त्याला संघात घेतले.

जोफ्रा आर्चर गेल्या वर्षीही आयपीएलमध्ये खेळला नव्हता. आर्चर दुखापतीमुळे बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आर्चरच्या उजव्या कोपराची गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर तो खेळामध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र आर्चर दुखापतीमुळे २०२२ च्या मोसमात खेळू शकला नाही तसेच त्याच्या बदलीला परवानगी दिली जाणार नाही. मुंबईच्या संघासाठी, स्पष्टपणे ही भविष्यासाठी गुंतवणूक आहे, जी चॅम्पियन संघ कधीकधी करतात.

डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांसाठी संघ आग्रही का असतात?

सध्या क्रिकेट विश्वामध्ये दर्जेदार डावखुरे वेगवान गोलंदाज नाहीत आणि १० संघांच्या मोठ्या लिलावात मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे. पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त आहे आणि १० संघांमुळे आव्हाने आहेत. त्यामुळे लिलावाची स्पर्धा खूपच वेगळी आहे, असे पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी पत्रकारांना सांगितले.

खलील अहमद अडीच वर्षांपूर्वी भारताकडून शेवटचा खेळला होता. त्याचा टी२० इकॉनॉमी रेट आठ आहे, पण बोलीनंतर, दिल्ली कॅपिटल्सने त्याला ५.२५ कोटींमध्ये खरेदी केले आहे. जयदेव उनाडकटने गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये सहा सामन्यांत चार विकेट घेतल्या होत्या. भारतासाठी त्याचा शेवटचा सामना २०१८ मध्ये होता. मुंबई इंडियन्सने त्याला १.३ कोटी रुपयांना संघात घेतले आहे. तसेच चेतन साकारियाला दिल्लीने त्याच्या जुन्या संघात परत आणत ४.२ कोटींमध्ये खरेदी केले आहे.

डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांना त्यांच्याकडून मिळणार्‍या निकालामुळे वेगळे केले जाते. नवीन चेंडूने गोलंदाजी करताना, ते फलंदाजांना त्यांचे हात खोलण्यास प्रवृत्त करतात कारण चेंडू उजव्या हातापासून दूर जातो. त्यामुळे डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांचा सामना करणे अधिक कठीण बनते. जुना चेंडू जेव्हा विकेटच्या आसपास येतो तेव्हा ते पिचिंगनंतर चेंडू सरळ टाकू शकतात. तसेच, शॉर्ट फॉरमॅटमध्ये, वेगवान गोलंदाज स्लॉग ओव्हर्समध्ये वाइड यॉर्कर्स वापरतात. त्या दृष्टिकोनातून, डाव्या हाताच्या गोलंदाजाला विकेटवर गोलंदाजी करताना फायदा आहे.

स्पिनर्सच्या मूल्यात घट झाली आहे का?

टी२० क्रिकेटमध्ये, मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्याच्या क्षमतेमुळे स्पिनर नेहमीच सर्वाधिक मागणी असलेले खेळाडू असतात. लेगस्पिनर्सचा संघाला मोठा फायदा होत असतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने वानिंदू हसरंगाला १०.७५ कोटी, राजस्थान रॉयल्सने युझवेंद्र चहलला ६.५ कोटींमध्ये, पंजाबने राहुल चहरसाठी ५.२५ कोटी आणि गुजरात टायटन्सने अष्टपैलू राहुल तेवतियासाठी ९ कोटी रुपये खर्च केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्लेषकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या संघांसाठी आता आणखी काही रहस्ये शिल्लक नाहीत. या आयपीएलमध्ये योग्य मूल्य मिळवणारा वरुण चक्रवर्ती हा एकमेव भारतीय स्पिनर होता, ज्याला केकेआरने आठ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. वरुणच्या रहस्यमय फिरकीने केकेआरसाठी काम केले आहे.