अमेरिकेच्या ‘नासा’ने (NASA) ने पुन्हा एकदा चांद्र मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला Artemis असं नाव देण्यात आलं आहे. भविष्यात चंद्रावर मानवी वस्ती आणि त्याचा आधार घेत मंगळ ग्रहावर स्वारी असे नासाचे सर्वसाधारण नियोजन आहे. यासाठी चंद्रापर्यंत अंतराळवीरांना पोहचण्यासाठी आत्तापर्यंतचे जगातील सर्वात शक्तीशाली रॉकेट Space Launch System (SLS) तयार करण्यात आले आहे. पुढील काही दिवसात हवामान अनुकूल असल्यास हे रॉकेट उड्डाण करणार आहे. या पहिल्या उड्डाणात प्रत्यक्ष अंतराळवीर स्वार होणार नसले तरी यानिमित्ताने शक्तीशाली रॉकेटची चाचपणी केली जाणार आहे. एवढंच नाही तर चंद्राभोवती Orion नावाचे यान पाठवत ते पृथ्वीवर परत आणले जाणार आहे. यानिमित्ताने भविष्यात अंतराळवीरांची वाहतुक करणाऱ्या या Orionचीही चाचणी घेतली जाणार आहे.

शक्तीशाली रॉकेट SLS कसं आहे?

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

१९६९-७२ या कालावधीत नासाचे अंतराळवीर हे चंद्रावर जाऊन आले त्यासाठी Saturn 5 या शक्तीशाली रॉकेटचा वापर करण्यात आला होता. त्यापेक्षा SLS जरा लहान असले तरी अत्याधुनिक अशा इंजिनांमुळे thrust – पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात मिळणारा धक्का प्रचंड असणार आहे. यामुळे वजन वाहुन नेण्याची SLS ची क्षमता अचाट अशी बनली असून या रॉकेटच्या माध्यमातून पृथ्वीच्या कक्षेबाहेर तब्बल १०० टनापेक्षा जास्त वजन हे वाहुन नेले जाऊ शकते एवढं SLS हे शक्तीशाली आहे. या रॉकेटची उंची तब्बल ९८ मीटर असून इंथन भरल्यास या रॉकेट वजनच तब्बल २६०० टन भरेल एवढं SLS रॉकेट भव्य आहे. या रॉकेटच्या मुख्य भागाला दोन छोटी रॉकेट आहेत ज्याचा पुर्नवापर शक्य आहे.

भविष्यात थेट मंगळापर्यंत जाण्यासाठी अंतराळवीरांना वाहुन नेणाऱ्या यानाला मोठी गती मिळेल असे या गुणात्मक बदल हे रॉकेटमध्ये केले जाणार आहेत.

Artemis – SLS ची पहिली मोहिम कशी आहे?

जर हवामानअनुकूल राहिले आणि सर्व तांत्रिक प्रक्रिया सुरळीत पार पडली तरी २९ ऑगस्टला Space Launch System (SLS) हे रॉकेट पहिल्यांदा अवकाशात झेप घेईल. पृथ्वीचे वातावरण भेदत अवकाशात पोहचल्यावर या रॉकेटच्या अग्रस्थानी असलेले Orion नावाचे यान हे चंद्राच्या दिशेने रवाना होईल. चंद्राच्या पृष्ठभागापासून ६० किलोमीटर इतक्या जवळने चंद्राला एक प्रदक्षिणा घालत हे यान १० सप्टेंबरपर्यंत पृथ्वीवर परतणार आहे. यानिमित्ताने SLS ची कार्यक्षमता तपासली जाणार आहे. तर Orion यानातून प्रत्यक्ष अंतराळवीर जरी प्रवास करणार नसले तरी विविध संवेदकांच्या माध्यमातून या सर्व प्रवासाची नोंद घेतली जाणार आहे. यामुळे हा सर्व प्रवास किती सुरक्षित आहे हे तपासलं जाणार आहे. जर ही पहिली मोहिम यशस्वी झाली तर पुढच्या मोहिमेत अंतराळवीर हे चंद्राच्या पृष्ठभागापासून ६० किलोमीटर उंचीवरुन – एवढ्या जवळने प्रवास करतील. तर पुढच्या मोहिमेत २०२५ च्या सुमारास तीन अंतराळवीर हे प्रत्यंक्ष चंद्रावर उतरणार आहेत ज्यामध्ये पहिले पाऊल हे महिला अंतराळवीरेचे असेल.

यानिमित्ताने भविष्यात चंद्रावर वस्ती करण्याच्या दृष्टीने आणि मंगळ ग्रहासाठीच्या मोहिमेसाठी नासाने प्रयत्न सुरु रहाणार आहेत.

आधी चंद्रावर स्वारी कधी झाली होती?

नासाच्या ‘अपोलो’ मोहिमेअंतर्गत एकुण १२ अंतराळवीरांनी १९६९ ते १९७२ दरम्यान चंद्रावर मुक्त संचार केला होता. चंद्रावरील माती-दगड हे पृथ्वीवर आणण्यात आले होते. शीतुद्धाच्या काळात यानिमित्ताने अमेरिकेने चंद्राच्या शर्यतीत तेव्हाच्या सोव्हिएत रशियाला मागे टाकले होते. या मोहिमेसाठी अब्जावधी डॉलर्सचा खर्च आला होता.

आत्ताच्या Artemis मोहिमेत SLS रॉकेटच्या संशोधनासाठी २० अब्ज डॉलर्स खर्च झाले असून पहिल्या उड्डाणाचा खर्च हा दोन अब्ज डॉलर्सच्या घरात असल्याचं म्हंटलं जात आहे. Artemis ही आत्तापर्यंतची नासाची सर्वात महागडी अवकाश मोहिम समजली जात आहे.

Story img Loader