नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रोज नवनवीन चित्रपट, वेबसीरिज, डॉक्युमेंट्री प्रदर्शित होत असतात. जगभरातील कंटेंट आपल्याला या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतो. सध्या एका माहितीपटाची जोरदार चर्चा आहे तो डॉक्युमेंट्री म्हणजे मर्डर इन कोर्टरूम. एका बलात्कारी गुन्हेगाराच्या दुष्कृत्याचा पर्दाफाश यात दाखवला गेला आहे. भारतातील सिरियल किलर्सच्या कृत्यांवर प्रकाश टाकणारी ‘इंडियन प्रेडटोर’ या वेबसीरिजचा तिसरा भाग म्हणजे ही डॉक्युमेंट्री आहे. महाराष्ट्रातील कुख्यात गुन्हेगार अक्कू यादव याची गोष्ट आपल्याला बघायला मिळणर आहे. नागपूरमधील कस्तुरबा नगरच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या अक्कू यादवसाठी चोरी, खून या खूप किरकोळ गोष्टी होत्या. त्याच्यावर ४० महिलांवर बलात्कार करून त्यांचा वर्षंभर छळ केल्याचा आरोप होता. उमेश कुलकर्णीनी यांचे दिग्दर्शन केले आहे.

कोण होता अक्कू यादव

Jitendra Awhad
“ठाण्यात ‘वरून’ हा शब्द सुरू झालाय, तो कुठून येतो? हे…”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

ऐंशी नव्व्दच्या दशकात गुन्हेगारी क्षेत्र केवळ मुंबईतच नव्हे तर देशातील अनेक शहरांमध्ये वाढत होते. राज्याच्या उपराजधानीत अक्कू यादव उर्फ भरत कालीचरण यादव याने धुमाकूळ घातला होता. त्याचे कुटुंब दूध विक्री व्यवसायात होते. किरकोळ गुन्ह्यानंतर यादव १९९१ पासून सामूहिक बलात्कार, खून, सशस्त्र दरोडा, घरफोडी, गुन्हेगारी धमकी आणि खंडणीयांसारख्या गंभीर गुन्हेगारीगुन्ह्यांमध्ये सामील झाला. १९९९ साली महाराष्ट्र प्रतिबंधात्मक अटक कायद्यान्वये (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटीज ऑफ स्लमल्डर्स, बुटलेगर्स, ड्रग ऑफेन्डर्स अँड डेंजरस पर्सन ऍक्ट, १९८१) अंतर्गत एका वर्षासाठी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र २००० साली त्याच्या अटकेचा आदेश रद्द करण्यात आला होता. २००४ साली मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत नागपूर शहर आणि ग्रामीण भागात त्याला प्रवेश करण्यास बंदी घातली होती मात्र त्याने हे नियम धुडकावून लावले होते.

विश्लेषण: कोळसा खाणीतून ६४ जणांना वाचवणाऱ्या ‘रीअल लाईफ हिरो’वर अक्षय कुमार काढतोय चित्रपट, काय आहे खरी घटना?

आणि घडली ती घटना….

अक्कू यादवच्या विरोधात महिलांचा उद्रेक व्हायला ही घटना कारणीभूत ठरली. हाफ द स्काय या पुस्तकात या घटनेबद्दल माहिती दिली आहे. अक्कुने एका तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तो उषा नारायणे यांच्या शेजारी राहणाऱ्या रत्ना डुंगरी यांच्याकडे पैसे मागायला आला. रत्ना यांच्या घरी सुरु असलेली गडबड उषा यांनी ऐकली. उषा त्यावेळी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होत्या. त्या वस्तीमधील फार कमी महिला शिक्षित होत्या. त्यांनी रत्ना यांना म्हंटले की अक्कू विरोधात पोलिसात तक्रार दाखल करा. अक्कूला जेव्हा याबद्दल कळले तेव्हा त्याने संतापून ४० गुंडाना घेऊन तो उषा यांच्या घरी गेला. उषा यांनी दरवाजा उघडला नाही म्हणून त्यांना धमकावू लागला. उषा यांनी घरचा वापरता सिलिंडरची नळी दरवाज्याच्या फटीतून सोडत इथून जा नाहीतर मी सिलेंडर पेटवेन असे त्याला सुनावले. असं म्हणतात अक्कूच्या विरोधात उठवलेला हा पहिला आवाज होता.

भर कोर्टात घडला तो प्रसंग

१३ ऑगस्ट रोजी अक्कूला जामीन मिळणार अशी चर्चा होती. ही बातमी महिलांच्या वस्तीपर्यंत पोहचली. महिलांनी थेट न्यायालय गाठलं मात्र जाता जाता घरातून मिरचीची पूड घेऊन गेल्या. कोर्टात त्याला दाखल करण्यासाठी येत असताना त्याच्याबरोबर दोन पोलीस होते. त्याची सुनावणी होत असताना अचानक या महिलांनी कोर्टात प्रवेश केला. त्या महिलांनी स्वतःचा चेहेरा झाकला होता, संपूर्ण कोर्टरूममध्ये तिखटाची पावडर उधळून त्यांनी अक्कू यादववर हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनाचा अहवाल जेव्हा मागवण्यात आला तेव्हा त्याच्या शरीरावर ७५ वार करण्यात आले होते. महिलांचा राग इतका अनावर होता की त्यांनी अक्कूचे लिंग कापून टाकले होते. हाफ ऑफ द स्काय पुस्तकात याचा उल्लेख करण्यात आला आहे. जवळपास २०० महिला यात सामील झाल्या होत्या. या हत्याकांडात २०० महिला सहभागी झाल्या होत्या.

विश्लेषण: विदर्भात व्याघ्रप्रकल्पांतील वाहने का ठरू लागलीत असुरक्षित?

महिलांना अटक :

अक्कू यादव प्रकरणी पोलिसांनी ५ महिलांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यावेळी इतर महिलांनीदेखील आम्हाला अटक करा अशी मागणी केली होती. या प्रकरणाची चर्चा केवळ देशानतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली होती. २००४ सालापासून सुरु झालेला हा खटला २०१४ साली संपला. या खटल्यातून २१ महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सीएचआरआयच्या अहवालात असे म्हटले आहे की एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ओळख पटवण्यास नकार दिला होता. पोलिसांनी, रेकॉर्डवर स्टेटमेंट देण्यास नकार दिला. तसेच त्यांनी एफआयआर, पोस्टमार्टम रिपोर्टसह संबंधित कोणतीही कागदपत्रे उघड करण्यास नकार दिला. यादवच्या प्रतिस्पर्धी टोळीतील एकनाथ चव्हाण याने यादवला मारण्यासाठी महिलांना कव्हर म्हणून वापरलं, असं पोलिसांना वाटत होतं. तसेच पोलिसांना असा विश्वास होता की त्याच वस्तीतील प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांना वाचवण्यासाठी महिला न्यायालयातही हजर होत्या. त्यापैकी काही या महिलांचे नातेवाईक देखील होते.

सीएचआरआयच्या अहवालानुसार यादवला मृत्यूपूर्वी १४ वेळा अटक करण्यात आली होती. लेखक आणि स्वतंत्र पत्रकार जयदीप हर्डीकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, “मी हे न्यायव्यवस्थेचे अपयश म्हणून पाहीन. गुन्हेगार काय आकार घेतो या विषयावर अनेक अभ्यास केले गेले. जर कोणी त्याच्याविरुद्धच्या तक्रारींकडे लक्ष दिले असते तर कदाचित हे टाळता आले असते.”