भारती क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. अपघातात ऋषभ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात इतका भीषण होता की, दुर्घटनेनंतर त्याच्या अलिशान कारला आग लागल्याने ती पूर्णपणे जळाली आहे.

या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये रस्ता पूर्ण मोकळा दिसत आहे आणि त्याचवेळी पंतची कार अत्यंत वेगाने येते व दुभाजक तोडून पलीकडे जाते. यानंतर त्याची कार काही क्षणात पेट घेते, असे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते यावरून हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येते. या अपघानंतर ऋषभ गंभीर जखमी अवस्थेत कसाबसा कारमधून बाहेर पडला होता, त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
misbehavior at toll booth where can you complaint how to deal with toll employees nhai fastag helpline
टोल नाक्यावरील कर्मचारी तुमच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागले तर काय कराल? वाचा सविस्तर
husband, forceful sexual relationship, wife, mother in law, took picture, incident, case registered , panvel, khandeshwar, crime news, police, marathi news,
पनवेल : ‘त्या’ विकृत सासू विरोधात सूनेने केली अखेर फौजदारी तक्रार

कारला भीषण अपघात आणि क्षणातच आग –

एवढा भीषण अपघात नेमका कसा काय घडला याबाबत सध्या अंदाज लावणे घाईचे होईल, मात्र तरीही प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि दुर्घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार अपघात घडला तेव्हा रस्त्यावर धुके होते. शिवाय ऋषभ हा कारमध्ये एकटाच होता, त्यामुळे त्याला थकव्यामुळे डुलकी लागली असाण्याचीही शक्यता आहे. हेदेखील कारण असू शकते. कारण, अशा परिस्थितीत बहुंताश वेळा कार चालकाला डुलकी लागल्याने, अपघात घडतात. सरासरी पाच पैकी एका कार अपघातामध्ये कारचा अपघात झाल्यानंतर कार पेटल्याचे आढळून येते. साधरणपणे अपघातात एका पेक्षा अधिक वाहनांचा समावेश असल्यास वाहनाला आग लागल्याचे दिसते. परंतु, या अपघातामध्ये पंतची कार एका दुभाजकावर आदळून कारचा चुराडा होऊ, आग लागल्याचे दिसून आले आहे.

अपघातानंतर कारला आग का लागू शकते ? –

वाहनाच्या अपघातानंतर पेट्रोल किंवा डिझेल टाकीमधून गळती होऊन आग लागण्याची शक्यता असते. जर अपघात भीषण असेल तर इंधन टाकी फुटण्याचीही दाट शक्यता असते. वाहनातील इंधन अतिशय ज्वलनशील असल्याने अपघातदरम्यान कारमधील धातूंचे घर्षण होऊन, गळती झालेल्या इंधनामुळे आग पेट घेते. याशिवाय, इंजिन ऑइल, ब्रेक ऑईल किंवा अन्य ज्वलनशील घटक घर्षणातून निर्माण झालेल्या ठिणगीच्या संपर्कात आल्याने आग लागण्याचीही दाट शक्यता असते.

हेही वाचा – Rishabh Pant Accident : भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात; देहरादूनमधील रुग्णालयात उपचार सुरू

कारला आग लागण्याचे आणखी कारण म्हणजे कारणधील इलेक्ट्रिकल यंत्रणा. बरेचदा अनेकजण कार विकत घेतल्यानंतर आपल्याला हवी तशी कारमध्ये इलेक्ट्रिक यंत्रणा बसवून घेतात. जेव्हा कारला अपघात होतो तेव्हा या इलेक्ट्रिकल यंत्रणेची वायरिंगही जळण्याची आणि त्यातून निघालेली ठिणगी कारला आग लागण्यास कारणीभूत ठरू शकते. अशावेळी कारच्या प्लगमध्येही स्पार्क होऊन अपघातनंतर झालेल्या इंधन गळतीमुळे आग लागू शकते. याशिवाय काही विशिष्ट कंपनीच्या एअरबॅग्जचा स्फोट होऊनही आग लागल्याच्या घटनाही समोर आलेल्या आहेत. मात्र हे अत्यंत क्विचतच घडल्याचेही समोर आले आहे.

आग लागण्याचे प्रकार –

वाहनाला अपघात झाल्यानतंर इंधन टाकीतून गळती होऊन लागलेली आग ही साधारणपणे वाहनाच्या खाली लागते आणि नंतर ती इंधन गळतीमुळे सर्वत्र पसरते. याशिवाय, इलेक्ट्रिक उपकरणांमुळे लागलेली आग ही वाहनाच्या आतमध्ये सुरू होते आणि नंतर ती वाहनाच्या बाहेर पसरते.
कारमध्ये जेव्हा आग लागते तेव्हा सर्वात अगोदर कारचे इलेक्ट्रिकल यूनिट जाम होते. यामुळे पॉवर विंडो, सीट बेल्ट आणि सेंट्रल लॉकिंग सिस्टम ठप्प होते. यामुळे कारमध्ये तुम्ही अडकण्याची दाट शक्यता असते.