सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला विविध विषयांवरील चित्रपट वेबसीरिज पाहायला मिळतात. वादग्रस्त विषय, सत्यघटनांवर आधारित चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस पडत आहेत. बॉलिवूडचा प्रयोगशील अभिनेता अभय देओल आता एका वेबसीरिजच्या माध्यमातुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आजवर रोमँटिक भूमिकांमध्ये दिसलेला अभय देओल या वेबसीरिजमधून एक वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे, ती वेबसीरिज नेमकी काय आहे जाणून घेऊयात…

वेबसीरिज नेमकी कशावर आधारित?

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट

नेटफ्लिस या ओटीटी माध्यमावर दर्जेदार कंटेंट पाहायला मिळतो. अभय देओलची नवी वेबसिरीज एका सत्यघटनेवर आधारित आहे. दिल्लीच्या उपहार चित्रपटगृहातील अग्नितांडवावर ‘ट्रायल बाय फायर’ या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या वेबसीरिजमध्ये अभय देओल आणि राजश्री देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २मिनिटे ४ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये १९९७ साली घडलेली भीषण घटना आणि त्यानंतर पीडितांचा न्यायासाठी केलेला संघर्ष दाखवण्यात आला आहे. १३ जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

विश्लेषण : बॉलिवूडच नाही, हॉलिवुडमध्येही घराणेशाहीवरून वाद; ‘नेपो बेबी’ म्हणत स्टार कीड्स होतायत ट्रोल! वाचा नेमकं घडतंय काय?

ही मालिका नीलम आणि शेखर कृष्णमूर्ती यांच्या न्यायासाठीच्या संघर्षावर केंद्रित असल्याचे ट्रेलरवरून दिसून येते. या घटनेत दोघांनी आपली अपत्य गमावली आहेत. त्यानंतर त्यांनी तब्बल २४ वर्षे न्यायासाठी लढा दिला. यादरम्यान दोघांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले. न्यायासाठी किती अडचणी आल्या. हे या वेबसीरिजमध्ये दाखवले आहे. ‘ट्रायल बाय फायर’ नीलम आणि शेखर कृष्णमूर्ती यांच्या ‘ट्रायल बाय फायर: द ट्रॅजिक टेल ऑफ द उपहार फायर ट्रॅजेडी’ या प्रसिद्ध पुस्तकावर बेतलेली आहे.

ती घटना नेमकी काय होती?

१३ जून १९९७ रोजी दिल्लीतील ग्रीन पार्क परिसरातील उपहार चित्रपटगृहाला भीषण आग लागली होती. त्यावेळी चित्रपटगृहात शेकडो लोक सनी देओलचा बॉर्डर हा चित्रपट पाहत होते. या अपघातात ५९ जणांचा मृत्यू झाला असून १०० हुन अधिकजण जखमी झाले होते. याच घटनेत नीलम यांची १७ वर्षाची मुलगी उन्नती आणि १३ वर्षांचा मुलगा उज्ज्वल यांना गमावले होते. कायदेशीर प्रक्रिया बरीच वर्षी चालली आणि अखेर फेब्रुवारी २०२२ मध्ये उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि अन्सल बंधूंसह इतर आरोपींना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.