शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. तब्बल ४ वर्षांनी शाहरुख खान मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे त्याचे चाहतेदेखील आता उत्सुक आहेत. २०२३ वर्षाची सुरवात दमदार होणार अशी चर्चा आहे. २०२२ वर्ष हे बॉलिवूडसाठी फारसे समाधानकारक नव्हते, अनेक मोठ्या कलाकारांचे बिग बजेट चित्रपट चालले नाहीत. या मुद्यावरच प्रसिद्ध चित्रपट तज्ज्ञ तरुण आदर्श यांनी काही मुद्दे मांडले आहेत. ते आपण जाणून घेऊयात. तरण आदर्श यांनी बॉलिवूड हंगामाला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. ज्यात त्यांनी २०२२ वर्षात बॉलिवूड चित्रपटांना अपयशाला का सामोरे जावे लागले सविस्तर भाष्य केलं आहे.

कन्टेन्ट :

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

मुलाखतीच्या सुरवातीलाच त्यांनी मुद्दा मांडला आहे तो म्हणजे कन्टेन्ट म्हणजे चित्रपटाची कथा, आज भारतीय प्रेक्षकांची मानसिकता बदलत चालली आहे. करोना महामारीनंतर बॉलिवूडला त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. कारण महामारीमध्ये चित्रपटगृह बंद होती. लोक घरात असल्याने त्यांना ओटीटी प्लॅटफॉर्म हे एकमेव माध्यम मनोरंजनासाठी होते. त्यामुळे या माध्यमावर त्यांना जगभरातील कन्टेन्ट पाहायला मिळाला. तसेच अनेक चित्रपट महामारीनंतर आल्याने तो पर्यंत प्रेक्षकांची आवड बदलल्याने त्यांनी बॉलिवूडकडे पाठ फिरवली. तसेच कन्टेन्ट हास सर्वात मोठा भाग बॉलिवूड चित्रपटांमध्ये कमी दिसला.

विश्लेषण: मुंबई पोलीस-अंडरवर्ल्डच्या संघर्षावर बेतलीये ‘मुंबई माफिया’; डी कंपनीला जेरबंद करणारे अधिकारी आहेत कुठे?

दाक्षिणात्य चित्रपटांचा प्रभाव :

दाक्षिणात्य चित्रपट पाहणारा वर्ग खूप मोठा आहे. मागच्या वर्षी आलेले पुष्पा, केजीएफ, जर्सी असे चित्रपट लोकांनी पाहिले. अल्लू अर्जुन, यश अशा स्टार्सचे चाहते आज मोठ्या प्रमाणावर आहेत. लोकांनी पहिले की बॉलिवूड चित्रपटांमध्ये काहीतरी कमतरता आहे. तसेच दाक्षिणात्य चित्रपटांनी कधीच आपला मूळ गाभा सोडला नाही त्यामुळे ते चित्रपट हिट होत गेले.

बजेट :

एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे, आज बॉलिवूडमध्ये चित्रपटाच्या बजेटमधील ६० ते ७०% वाटा हा चित्रपटातील मुख्य अभिनेत्याला मिळतो. कन्टेन्टवर लक्ष दिले जात नाही, प्रसिद्ध अभिनेत्याला घेऊन हे लोक चित्रपट बनवत नाहीत तर एक प्रपोजल बनवतात. इतक्या इतक्या रॅकेट सॅटेलाईट हक्क विकायचे इतक्या रकमेवर ओटीटीला विकायचा, स्टुडिओकडून रक्कम मिळाली तर आणखीन चांगलीच गोष्ट आहे. तसेच बजेटमध्ये दुसरी बाजू म्हणजे तिकीट विक्रीची आज सामान्य व्यक्ती चित्रपट पाहायला आली ते ही कुटुंबाबरोबर तर त्यांना ते महाग पडते, सामान्य माणूस आज विचार करतो की कोणता चित्रपट हा ओटीटीवर पाहावा आणि कोणता चित्रपट हा चित्रपटगृहात जाऊन पाहावा.

पहिल्या दिवशीची कमाई :

पूर्वी चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईवर अंदाज यायचा चित्रपट चालणार की नाही ते, मात्र २०२२ मध्ये मोठ्या मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांना पहिल्या दिवशी फारशी कमाई करता आली नाही. ‘विक्रम वेधा’, ‘शमशेरा’ असो किंवा नुकताच प्रदर्शित झालेला ‘सर्कस’ असो, असे चित्रपट जेव्हा पडतात तेव्हा चित्रपटसृष्टीला एक मोठा धक्का लागतो.

विश्लेषण: अंजलीचा मृतदेह १२ किमी फरपटत नेणाऱ्या आरोपींना काय शिक्षा होणार? कायद्यात काय आहे तरतूद?

चित्रपटाची सुरवात निराशा :

आजकाल कोणत्या ही चित्रपटाचा पहिले ट्रेलर प्रदर्शित होतो, हा ट्रेलरच खूप काही सांगून जातो, तो जर उत्कंठावर्धक असेल तर नक्कीच चित्रपट यशस्वी ठरेल मात्र जर प्रेक्षकांना ट्रेलर आवडला नाही तर सरळ ते चित्रपट नाकारतात.

नावीन्य :

आज प्रेक्षकांची मानसिकता बदलत चालली आहे. आज प्रेक्षकांना काहीतरी नवं हवं आहे. प्रेक्षकांची आवड बदलत चालली आहे. त्याच त्याचा कथांना ते आता कंटाळले आहेत.

ट्रोलिंग :

गेल्या वर्षीच्या ‘लाल सिंग च’ चित्रपटापासून ते आता ‘पठाण’ चित्रपटांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ट्रोलिंग हा एक प्रकारचा राक्षस आहे असं समजूयात, कारण हे कधीही न संपणारे आहे. सोशल मीडिया या माध्यमाचे फायदे तोटे दोन्ही आहेत, पण याला काही पर्याय नाही.

बड्या स्टार्सची क्रेझ कमी होणार का?

खान मंडळी असो किंवा अक्षय कुमार हे अभिनेते गेली अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. नव्व्दच्या दशकात त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरवात केली आहे, आज जरी त्यांचे चित्रपट चालत नसतील तरी त्यांची क्रेझ कमी होणार नाही.

तरण आदर्श यांनी मुलाखतीत विस्तृतपणे २०२२ वर्षातील बॉलिवूडच्या चित्रपटातील चुका सांगितल्या आहेत, मात्र त्यांना आशा आहे की २०२३ वर्षात बॉलीवूडला चांगले जाणार आहे. तरण आदर्श हे गेली अनेकवर्ष चित्रपट समीक्षक आणि ट्रेड अनॅलिस्ट म्हणून काम करत आहेत.