scorecardresearch

Premium

विश्लेषण : युक्रेनवर बॉम्बचा वर्षाव होत असतानाही नो फ्लाय झोनची झेलेन्स्कींची मागणी नाटोने का फेटाळली?

रशियन सैन्य आकाशातून बॉम्बचा वर्षाव करत आहे, ज्यामध्ये सामान्य लोक मारले जात आहेत, त्यामुळे नो फ्लाय झोन घोषित करणे आवश्यक आहे, असे झेलेन्स्की म्हणाले

Why NATO is not accepting the demand of Ukraine on the issue of No Fly Zone

युक्रेनवर उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र (नो-फ्लाय झोन) लागू करावे असे आवाहन त्या देशाचे अध्यक्ष वोल्दिमिर झेलेन्स्की यांनी परराष्ट्रांना केले आहे. अशा प्रकारे नो-फ्लाय झोन जाहीर करण्यामुळे परराष्ट्रांच्या सैन्याचा थेट संबंध येणार असल्याने रशिया व युक्रेन यांच्यातील संघर्ष चिघळण्याचा धोका वाढणार आहे. अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला शस्त्रांची कुमक पुरवली असली, तरी त्यांनी आपल्या फौजा पाठवलेल्या नाहीत.

ज्यामुळे कुठल्याही अनधिकृत विमानाला युक्रेनच्या हवाई क्षेत्रात उडण्यास प्रतिबंध होईल असे नो-फ्लाय झोन जाहीर करण्याची शक्यता नाटो देशांनी नाकारली आहे. कुठल्याही तिसऱ्या पक्षाने युक्रेनवर ‘नो-फ्लाय’ झोनची घोषणा केल्यास त्यांनी सशस्त्र संघर्षांत भाग घेतल्याचे रशिया मानेल, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शनिवारी म्हटले होते.

Viral Video Of Manchurian Making Upsets Internet
मंच्युरिअन खायला आवडतात का? मग एकदा हा व्हिडीओ बघाच! पुन्हा मंच्युरिअन खाण्यापूर्वी १०० वेळा कराल विचार
Slovakia
विश्लेषण : स्लोव्हाकियामध्ये पुतिनधार्जिण्या पक्षाचा विजय का गाजतोय? त्यातून युरोपीय महासंघाच्या विघटनाची चर्चा का?
Diplomat Stopped From Entering Gurdwara
खलिस्तान्यांनी ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारात प्रवेश करण्यापासून रोखलं, व्हिडीओ व्हायरल
Is Ukraines Counteroffensive Succeeding
विश्लेषण: रशिया-युक्रेन युद्ध कोणत्या वळणावर आहे? युक्रेनचा प्रतिहल्ला यशस्वी ठरतोय का?

नो फ्लाय झोन म्हणजे काय?

नो फ्लाय झोन हे क्षेत्र म्हणजे ज्यावर विमानांना उड्डाण करण्यास मनाई आहे. सहसा हे सुरक्षिततेच्या कारणास्तव केले जाते. नो फ्लाय झोन नसलेल्या भागात कोणतेही विमान उड्डाण करू शकत नाही.

उदाहणार्थ आग्रा येथील ताजमहालच्या वर फ्लाय झोन आहे. ताजमहालवरून कोणतेही विमान उडू शकत नाही. त्यावरून विमान उड्डाण केले तर ते पाडले जाते किंवा खाली उतरवले जाते.

अमेरिका, ब्रिटन आणि नाटो देशांनी युक्रेनला नो-फ्लाय झोन म्हणून घोषित करावे, अशी झेलेन्स्कीची इच्छा आहे. असे झाल्यास रशियन लढाऊ विमानेही युक्रेनवरून उडू शकत नाहीत आणि त्यांनी उड्डाण केले तर ते मारले जातील.

हवाई क्षेत्र बंद केल्यावर असेच घडते का?

तर असे होत नाही. हवाई क्षेत्र बंद करणे आणि नो फ्लाय झोन घोषित करणे यात मोठा फरक आहे. हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे व्यावसायिक उड्डाणे उडू शकत नाहीत. त्याचबरोबर नो-फ्लाय झोनमध्ये कोणतेही विमान उड्डाण करू शकत नाही.

झेलेन्स्की हे नो फ्लाय झोनची मागणी का करत आहेत?

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिका, ब्रिटन आणि नाटो देशांना संपूर्ण युक्रेन नो-फ्लाय झोन म्हणून घोषित करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिका, ब्रिटन आणि नाटो देशांनी युक्रेनला नो-फ्लाय झोन घोषित करावे, अशी झेलेन्स्कीची इच्छा होती. मात्र, त्यांची मागणी फेटाळण्यात आली आहे.

झेलेन्स्कीच्या आवाहनावर जर अमेरिका, ब्रिटन किंवा नाटो देशांनी युक्रेनला नो-फ्लाय झोन घोषित केले तर त्यांना त्यांची विमाने पुन्हा युक्रेनला पाठवावी लागतील. झेलेन्स्की यांनी असेही म्हटले आहे की, रशियन सैन्य आकाशातून बॉम्बचा वर्षाव करत आहे, ज्यामध्ये सामान्य लोक मारले जात आहेत. हे रोखण्यासाठी नो फ्लाय झोन घोषित करणे आवश्यक आहे.

नो-फ्लाय झोन घोषित केल्यास काय होईल?

युक्रेनला नो-फ्लाय झोन घोषित करणे म्हणजे रशियाशी थेट भिडणे होय. जर अमेरिका, ब्रिटन किंवा नाटो देशांनी युक्रेनला नो-फ्लाय झोन घोषित केले असते तर त्यांना युक्रेनच्या आकाशावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांची लढाऊ विमाने पाठवावी लागली असती.

लष्करी संघर्षात, नो फ्लाय झोन घोषित करणार्‍या देशाला किंवा संस्थेला तेथे लढाऊ विमाने पाठवावी लागतात आणि दुसर्‍या देशाचे विमान तेथे उडताना दिसले तर ते एकतर जबरदस्तीने उतरवले जाते किंवा मारले जाते.

अमेरिका-नाटोने युक्रेनची मागणी का फेटाळली?

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची मागणी फेटाळून लावत नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग म्हणाले की, जर आपण असे केले तर संपूर्ण युरोपमध्ये युद्धाचा धोका आहे.

ते म्हणाले की जर नो-फ्लाय झोन घोषित केला गेला तर आम्हाला तेथे रशियन विमाने पाडण्यासाठी आमची विमाने पाठवावी लागतील, ज्यामुळे संपूर्ण युरोपवर युद्धाचा धोका वाढेल. आम्हाला कोणताही संघर्ष नको आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained why nato is not accepting the demand of ukraine on the issue of no fly zone abn

First published on: 07-03-2022 at 17:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×