scorecardresearch

Premium

विश्लेषण : दिल्लीतील बलात्कारानंतर उबरच्या मुख्यालयात खळबळ का उडाली होती?

२०१४ मध्ये दिल्लीतील उबर कॅबमध्ये झालेल्या बलात्कारानंतर मोठी खळबळ उडाली होती

uber taxi service
उबेर (फोटो सौजन्य – PTI)

दिल्लीतील उबर कॅब सेवेमध्ये प्रवाशांना पॅनिक बटण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवी दिल्लीत उबर चालकाने एका महिला प्रवाशावर बलात्कार केल्यानंतर टॅक्सी आणि बस यासारख्या सर्व व्यावसायिक वाहनांमध्ये प्रवाशांसाठी ही सेवा अनिवार्य करण्यात आली होती. हे बटण थेट पोलिसांच्या पाळत ठेवण्याच्या यंत्रणेशी जोडलेले आहे. त्याच्या मदतीने प्रवासी स्मार्टफोनशिवाय पोलिसांना फक्त दाबून अलर्ट करू शकतात.

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या तपासणीत समोर आले आहे की, २०१४ मध्ये दिल्लीतील उबर कॅबमध्ये झालेल्या बलात्कारानंतर कंपनीच्या सॅन फ्रान्सिस्कोमधील कार्यालयात खळबळ होता. परंतु बलात्काराच्या घटनेला आठ वर्षे उलटून गेल्यानंतरही दिल्ली-एनसीआरमध्ये केवळ ११,००० उबर कॅबमध्ये पॅनिक बटण बसवण्यात आले आहे. त्यामुळे नियम बनवणे आणि त्यांचे पालन करणे यात मोठा फरक असल्याचे दिसून आले आहे.

What-is-the-Delhi-liquor-case-AAP-Leader-Sisodiya-and-Sanjay-Singh
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण काय आहे? ‘आप’ नेत्यांवर ईडीने कोणते आरोप केले आहेत?
Mohammad shehanawaz
पुण्यातून पळून गेलेल्या ISIS संशयित दहशतवाद्याला दिल्लीत अटक, पोलिसांची मोठी कारवाई
difference between furlough and parole
विश्लेषण: अरुण गवळीला फर्लो मंजूर… फर्लो आणि पॅरोलमध्ये काय फरक? ही सवलत म्हणजे कैद्यांचा हक्क असतो का?
man arrested for killing wife in lohegaon over over suspicion of her character
नायगावमध्ये तरुणीची हत्या

सहा वर्षांनंतरही पॅनिक बटण नाही

इंडियन एक्सप्रेसने दिल्लीत ५० उबर कॅब बुक केल्या, त्यापैकी ४८ कॅबमध्ये पॅनिक बटण नव्हते. यासह, देखरेख प्रणालीमध्ये विविध त्रुटी आढळल्या, ज्यामध्ये सॉफ्टवेअरची समस्या खूप मोठी आहे. त्यामुळे नोडल ट्रान्सपोर्ट एजन्सीला कॅबमधून रिअल टाईम अलर्ट पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात अडचणी येतात.

५० पैकी फक्त सात उबर कॅबमध्ये पॅनिक बटणे चालू करण्यात आली होती. या सातपैकी पाचमध्ये बटण दाबल्यावर २० मिनिटे थांबल्यानंतरही दिल्ली पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही.

४३ कॅबपैकी २९ कॅबमध्ये पॅनिक बटणे नव्हती. २९ पैकी १५ कारमधील चालकांनी सांगितले की, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने २०१६ मध्ये पॅनिक बटण वापरण्याची सूचना देऊनही, त्यांनी हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून फिटनेस प्रमाणपत्रांसह वाहने खरेदी केली आहेत. आणखी १४ जणांनी सांगितले की त्यांनी त्यांची गाडी २०१९ पूर्वी खरेदी केली होती आणि २०१९ नंतर सर्व कारमध्ये पॅनिक बटण अनिवार्य झाले आहे.

४३ कॅबमधील चार चालकांनी सांगितले की त्यांच्या स्वतःच्या मुलांनी त्यांच्या कारवरील पॅनिक बटणे तोडली आहेत. तर तिघांनी सांगितले की अनेक वेळा प्रवासी विनाकारण पॅनिक बटण दाबतात, ज्यामुळे ते बटण खराब होते. सात चालकांनी दुरुस्तीचे काम केल्यानंतर बटण काम करणे बंद केल्याचे सांगितले. पण या समस्या फक्त उबरमध्येच नाही.

दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्या सुमन नलवा यांनी सांगितले की, “आम्हाला आतापर्यंत उबर किंवा ओला सारख्या टॅक्सींकडून पॅनिक बटण अलर्ट मिळालेला नाही. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार परिवहन विभागाकडून हे काम करायचे होते. आम्ही हिम्मत प्लस सारखे आमचे स्वतःचे अॅप आणले आहे आणि आमच्या पीसीआर व्हॅनला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केले आहे, जे आपत्कालीन कॉलला त्वरित प्रतिसाद देते.”

नलवा म्हणाल्या की, पोलिसांना त्यांचे सॉफ्टवेअर वाहतूक विभागाच्या देखरेख यंत्रणेसह एकत्रित करण्यासाठी सुमारे २० दिवस ​​लागतील आणि या उपक्रमावर काम करणार्‍या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सीडीएसी) शी बोलणी सुरू आहेत.

उबरने व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक नियम तोडले

उबर ही जगातील सर्वात मोठी टॅक्सी सेवा प्रदाता आहे. एका दशकात, उबरने भारतासह ७२ देशांमध्ये आपला व्यवसाय पसरवला आहे आणि ४४ अब्ज डॉलरची कंपनी बनली आहे. मात्र आता उबरने इतक्या कमी कालावधीत आपला व्यवसाय कसा वाढवला, हे समोर आले आहे. एका अहवालानुसार, उबरने जगभरातील बाजारपेठांमध्ये आपला व्यवसाय वेगाने वाढवण्यासाठी अनेक अनैतिक मार्गांचा वापर केला, असे रविवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटले आहे.

इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट्स, शोध पत्रकारांच्या संघटनेने उबेरच्या अंतर्गत फायली, ईमेल, पावत्या आणि इतर कागदपत्रे शोधून काढली आहेत. उबेरने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी कायदे तोडले, चालकांविरुद्धच्या हिंसेचा वापर करत स्वतःचा फायदा करुन घेतला आणि सरकारांशी हातमिळवणी केली हे उघड झाले आहे. उबेरशी संबंधित अहवाल आणि दस्तऐवज प्रथम ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियनला मिळाली. त्यानंतर याबाबत अहवाल तयार करण्यात आला आहे

उबेरने व्यवसाय कसा वाढवला?

अहवालानुसार, उबेरने कामगार आणि टॅक्सी कायदे शिथिल करण्यासाठी राजकीय व्यक्तींची हातमिळवणी केली. नियामक आणि कायदेशीर तपासणीला आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला. सार्वजनिक सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांनी त्यांच्या चालकांविरुद्ध झालेल्या हिंसाचाराच्या घटनांचा वापर केला.

अहवालानुसार, २००९ मध्ये स्थापन झालेल्या उबरने टॅक्सी नियमांना बगल देत राइड-शेअरिंग अॅप्सद्वारे परवडणारी वाहतूक देऊ केली. उबेरने जवळपास ३० देशांमध्ये स्वत:ची स्थापना करण्यासाठी एक विलक्षण धोरण स्वीकारले. कंपनीसाठी लॉबिंग करणाऱ्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या माजी सहाय्यकांसह अनेक ज्येष्ठ राजकारणी होते. कागदपत्रांनुसार, त्यांनी सरकारी दबाव आणला, कामगार आणि टॅक्सी कायदे बदलले आणि चालकांची तपासणी करण्याचे नियम शिथिल केले.

तपासाला बगल देण्यासाठी ‘स्टेल्थ’ तंत्रज्ञानाचा वापर

सरकारी तपासात अडथळा आणण्यासाठी उबरने ‘स्टेल्थ’ तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे तपासात आढळून आले. उदाहरणार्थ, कंपनीने ‘किल स्विच’ वापरला, ज्यामुळे उबेर सर्व्हरपर्यंत पोहोचणे कमी झाले. किमान सहा देशांमध्ये छापे मारताना पुरावे मिळवण्यापासून अधिकाऱ्यांना रोखण्यात आले.

उबरचा व्यवसाय भारतात कसा वाढला?

उबरची सेवा भारतात २०१३ साली सुरु करण्यात आली. भारत ही उबरसाठी सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. कंपनीचे सुमारे सहा लाख चालक आज १०० हून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहेत. ऑगस्ट २०१४ मध्ये, उबरचे तत्कालीन आशिया प्रमुख अॅलन पेन यांनी भारतातील त्यांच्या रणनीतीबद्दल एक ईमेल पाठवला होता. त्यात त्यांनी लिहिले की, “आम्ही भारतात यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण केले आहे. इथल्या जवळपास सर्वच शहरांमध्ये काही ना काही समस्या आहेत, पण या सगळ्यात उबरचा व्यवसाय वाढतच जाईल.”

उबरने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी भारतातील जीएसटी आणि प्राप्तिकर विभाग तसेच ग्राहक मंच, भारतीय रिझर्व्ह बँक आणि सेवा कर विभाग यांच्याशी हातमिळवणी केली असल्याचे अहवाल सांगतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained why the uproar at uber headquarters after the rape in delhi abn

First published on: 11-07-2022 at 15:50 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×