Is Gujarat Morbi Bridge Accident Act Of God: गुजरातच्या मोरबी शहरात रविवारी (३० ऑक्टोबर) च्या मच्छू नदीवरील पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १४० हुन अधिक जणांचा जागीच मृत्यू झाला. ‘झुलता पूल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी पर्यटकांनी एकाचवेळी मोठी गर्दी केल्याने ही दुर्घटना घडली. अनेकजण गुजरात पूल कोसळण्याच्या घटनेला ‘Act of God’ म्हणत आहेत, Act of God म्हणजे नेमकं काय आणि अशा प्रकरणांमध्ये विमा कंपनीकडून मदत मिळण्यात नेमके काय नियम आहेत याबाबत अनेकांना प्रश्न पडत आहेत. यापूर्वी Act of God वरून बॉलिवूडमध्येही ओ माय गॉड नावाचा अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा चित्रपट चांगलाच गाजला होता.

गुजरातच्या मोरबी येथील झुलत्या पुलाची दुर्घटना कशी घडली?

प्राप्त माहितीनुसार गुजरातच्या मोरबी पुलावर एकाच वेळी मोठ्या संख्येत गर्दी झाली होती तसेच काही तरुणांकडून पुलाच्या जाड दोरखंडाना पाय मारून खेळ सुरु होता. या गर्दीचा भार क्षमतेपेक्षा अधिक वाढल्याने पूल कोसळल्याचे अंदाज आहेत, तर सरकारी वकिलांनी पूलाच्या केबल जीर्ण झाल्या होत्या आणि नूतनीकरणावेळी त्या बदलण्यात आल्या नव्हत्या अशी माहिती दिली आहे. दुसरीकडे गुजरातमधील मोरबी पूलाच्या देखभालीची जबाबदारी असणाऱ्या ओरेवा कंपनीच्या व्यवस्थापकाने ही दुर्घटना तर देवाची इच्छा असल्याचं म्हटलं आहे.

Kitchen Jugaad make natural Jaggery from Sugar Cane juice
Kitchen Jugaad : घरच्या घरी बनवा उसाच्या रसापासून भेसळमूक्त गूळ, व्हिडीओ एकदा पाहाच
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा

ओरेवा कंपनीच्या व्यवस्थापक दीपक पारेख यांनी कोर्टात मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर “अशी दुर्दैवी घटना घडली ही तर देवाची इच्छा होती.” हा युक्तिवाद केला होता. मोरबी येथील झुलत्या पुलाच्या दुर्घटनेनंतर Act of God विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, नेमका काय आहे हा नियम जाणून घ्या..

ऍक्ट ऑफ गॉड म्हणजे काय?

ऍक्ट ऑफ गॉड हा एक वाक्प्रचार आहे जो विमा कंपन्यांद्वारे वापरला जातो. मानवाच्या नियंत्रणाबाहेर असणाऱ्या एखाद्या नैसर्गिक घटनेचे वर्णन करण्यासाठी. ऍक्ट ऑफ गॉड हे वाक्य वापरले जाते. जेव्हा एखाद्या घटनेचे किंवा नैसर्गिक आपत्तीचे वर्णन हे देवाची कृती म्हणून केले जाते, तर यासाठी कोणत्याही व्यक्तीला जबाबदार धरले जाऊ शकत नाही.

ऍक्ट ऑफ गॉडची संज्ञा पाहिल्यास, मानवी नियंत्रणाच्या बाहेर असणाऱ्या घटनेला दैवी कृती म्हणतात. उदाहरणार्थ चक्रीवादळ, भूकंप किंवा त्सुनामी. अशा प्रकारच्या दुर्घटनांमध्ये विमा कंपनी आपले दायित्व नाकारु शकते. अनेक देशांतील कायद्यांनुसार, जर एखाद्या दुर्घटनेत मानवी संस्था समाविष्ट नसेल तर कोणतीही घटना ही दैवी कृती मानली जाऊ शकते. दूरदृष्टी, योजना आणि खबरदारी बाळगूनही या घटना टाळता येणे शक्य नसते.

ऍक्ट ऑफ गॉडची संज्ञा ही विमा संस्थांद्वारे अनेक प्रकरणांमध्ये वापरली जाते. दुर्घटनेतील नुकसान भरून देण्याची जबाबदारी टाळायची असेल तर विमा कंपनीला रीतसर ती घटना दैवी कृती असल्याचे सिद्ध करावे लागते. काही देशांमध्ये ऍक्ट ऑफ गॉडला अजिबातच गृहीत धरले जात नाही.

दरम्यान, मोरबी पूल हा ‘झूलता पूल’ नावाने प्रसिद्ध आहे. ब्रिटीश काळात नदीवर हा पूल बांधण्यात आला होता. दुर्घटनेच्या चार दिवस आधीच दिवाळीच्या मुहूर्तावर गुजराती नववर्षाला या पुलाचे लोकार्पण केलेले आहे. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांचं विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे.