विश्लेषण : जसप्रित बुमराह भारतीय संघासाठी महत्त्वाचा का आहे? आकडेवारीच देईल प्रश्नाचे उत्तर, वाचा सविस्तर | jasprit bumrah ruled out of t20 world cup know why he is most important for indian cricket team | Loksatta

विश्लेषण : जसप्रित बुमरा भारतीय संघासाठी महत्त्वाचा का आहे? आकडेवारीच देईल प्रश्नाचे उत्तर, वाचा सविस्तर

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सध्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे.

विश्लेषण : जसप्रित बुमरा भारतीय संघासाठी महत्त्वाचा का आहे? आकडेवारीच देईल प्रश्नाचे उत्तर, वाचा सविस्तर
जसप्रित बुमराह (फोटो- इन्स्टाग्राम, जसप्रित बुमराह अकाऊंट)

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सध्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. याच कारणामुळे त्याला आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. पाठीच्या दुखण्यातून पूर्णपणे बरा न झाल्यामुळे तो या स्पर्धेच्या बाहेर असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी तशी माहिती दिलेली आहे. दरम्यान, बुमरा हा जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे भारतीय क्रिकेट संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. बुमरा संघात नसल्यामुळे भारतीय संघ यावेळी टी-२० विश्वचषक जिंकणार का? असा प्रश्न विचारला जातोय. याच पार्श्वभूमीवर बुमरा संघात असल्यानंतर टीम इंडियाने कशी कामगिरी केलेली आहे आणि तो संघात नसल्यावर भारतीय संघ तसेच इतर गोलंदाजांनी कसा खेळ केलेला आहे, यावर एक नजर टाकुया.

हेही वाचा >>> विश्लेषण : मेसी, रोनाल्डोचे विक्रम मोडणारा, फुटबॉल विश्वात सर्वाधिक चर्चेत असलेला हालँड कोण आहे?

जसप्रित बुमरा हा सामन्याच्या कोणत्याही टप्प्यात चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. पॉवरप्ले, मिडल ओव्हर, तसेच डेथ ओव्हरमध्ये त्याने उत्तम गोलंदाजी करत विरोधी संघातील फलंदाजांना जेरीस आणलेले आहे. तसे आकडेही समोर आहेत. इतर गोलंदाजांच्या तुलनेत बुमराचा इकोनॉमी रेट चांगला आहे.

भारतीय गोलंदाजांचा इकोनॉमी रेट

गोलंदाजपॉवरप्ले इकोनॉमी रेटमिडल ओव्हर इकोनॉमी रेटडेथ ओव्हर इकोनॉमी रेट
जसप्रित बुमरा५.५७५.८८.१५
भुवनेश्वर कुमार५.८१७.२११०.०३
अर्शदीप सिंग६.६५८.७५१८
आवेश खान७.७५८.६६८.५३
मोहोम्मद शामी११.४२९.६२
दीपक चहर८.३८९.०७११.०४
हर्षल पटेल८.०२८.०२११.०७

हेही वाचा >>> विश्लेषण : प्रभासच्या बिगबजेट ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदीची मागणी, राजकीय वर्तुळातून गंभीर आक्षेप; नेमकं वादाचं कारण काय?

बुमरा संघात असणे ही भारतासाठी जमेची बाजू असते. मात्र बुमरा संघात असतो तेव्हा भारताचे इतर गोलंदाजही चांगली कामगिरी करताना दिसतात. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीतून ते स्पष्ट होते. बुमरा संघात असताना तसेच तो संघात नसताना इतर गोलंदाजांच्या इकोनॉमी रेटमध्ये बराच फरक दिसून येतो.

बुमराह संघात असताना आणि नसताना इतर गोलंदाजांची कामगिरी

गोलंदाज(इकोनॉमी रेट) बुमरा संघात असताना(इकोनॉमी रेट) बुमरा संघात नसताना
आर. अश्विन६.१२६.८१
कुलदीप यादव६.७७७.०३
भुवनेश्वर कुमार६.८५७.२५
रविंद्र जडेजा६.८७७.०४
युझवेंद्र चहल७.९६८.२३
हार्दिक पांड्या८.२८८.३७
शार्दुल ठाकूर८.९५९.२७

हेही वाचा >>> विश्लेषण: ट्विटर खरेदी करण्याची मस्क यांची पुन्हा ऑफर, ट्विटरची भूमिका काय? व्यवहारात न्यायालयीन अडचण काय?

भारतीय संघाला जसप्रित बुमराचा फायदाच झालेला आहे. तो संघात असताना भारताला अनेक सामन्यात विजय प्राप्त करता आलेला आहे. बुमरा जेव्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये असतो तेव्हा भारताने ७६ टक्के सामने जिंकलेले आहे. तर तो जेव्हा प्लेइंग ११ मध्ये नसतो तेव्हा भारताने ६८ टक्के सामने जिंकलेले आहेत. तो संघात असताना भारताने १२ टक्के सामने गमावलेले आहेत. तर तो संघात नसताना भारताने ३३ टक्के सामने गमावलेले आहेत.

बुमराह संघात असताना भारतीय संघाची कामगिरी

लढतीतील परिणामबुमरा संंघात असतानाबुमरा संघात नसताना
विजय७६ टक्के६८ टक्के
पराभव१२ टक्के३३ टक्के
अनिर्णित१२ चक्केआकडेवारी उपलब्ध नाही.

हेही वाचा >>> विश्लेषण: रशिया, चीनपेक्षा उत्तर कोरियापासून अणुयुद्धाचा जास्त धोका आहे? किम जोंग उन यांच्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा परिणाम किती?

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी बुमरा भारतीय संघात नसल्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमी निराश झाले आहेत. बुमराची जागा भरून काढणाऱ्या खेळाडूचा बीसीसीआयकडून शोध घेतला जातोय. मात्र बुमरा संघात नसल्यामुळे दुसऱ्या नव्या दमाच्या गोलंदाजांना स्वत:ला सिद्ध करण्याची ही नामी संधी असेल. अर्शदीप सिंग, हर्षल पटेल या गोलंदाजांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे या टी-२० विश्वचषकातही हे गोलंदाज चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण : प्रभासच्या बिगबजेट ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदीची मागणी, राजकीय वर्तुळातून गंभीर आक्षेप; नेमकं वादाचं कारण काय?

संबंधित बातम्या

विश्लेषण: भर उन्हाळ्यातही बिहारमधील लाखो कुटुंबांची तहान भागणार; ‘हर घर गंगाजल’ योजना नेमकी आहे तरी काय?
विश्लेषण: कापसाला गेल्‍या वर्षीइतके दर मिळतील का?
विश्लेषण : धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर अदानी समुहाकडे; प्रदीर्घकाळ प्रलंबित राहण्यामागचं नेमकं कारण काय?
विश्लेषण : भूकंप दरवर्षी का होतात? त्यामागचं वैज्ञानिक कारण काय?
विश्लेषण: विविध रोगनिवारणासाठी पेरू का मानला जातो उपयुक्त? त्याचे फायदे कोणते?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“मी हतबल नसून बांगड्याही भरल्या नाही, आधी…”, राज्यपालांवरून उदयनराजेंचा इशारा
पत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा; २६ वर्षांनंतर NDTV ची साथ सोडली
पुणे: ‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू – नौदलप्रमुख
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेल्या टीकेवर मंगलप्रभात लोढांनी दिलं उत्तर, म्हणाले…
“एकनाथ शिंदेंना कुणी बंदी ठेवलं होतं?” अजित पवारांचा मंगलप्रभात लोढांना थेट सवाल!