वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत अतिशय कमी प्रमाणात रेल्वेगाड्यांची संख्या यामुळे रेल्वे डब्यात कायमच गर्दी दिसून येते. यातच रेल्वेने शयनयान (स्लीपर क्लास) आणि साधारण (जनरल) डब्यांची संख्या कमी केली आहे. आता रेल्वेने साधारण तिकीटधारक प्रवाशांकडून दंडाची रक्कम घेऊन (एक्सेस फेअर तिकीट) त्यांना आरक्षित डब्यातून प्रवास करण्याची मुभा दिल्याने आरक्षित डब्यांतील गर्दीत वाढ झाली आहे. 

‘ईएफटी’ म्हणजे काय?

शयनयानचे (स्लीपर क्लास) तिकीट नसताना किंवा साधारण तिकीटधारकांना स्लीपर क्लासमधून (आरक्षित डब्यातून) प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त प्रवास भाडे (ईएफटी) घेऊन प्रवास करू दिला जातो. रेल्वेत दोन पद्धतीने ‘ईएफटी’चा उपयोग केला जातो. डब्यात जागा उपलब्ध असल्यास शुल्क आकारून प्रवास करण्याची मुभा दिली जाते. तसेच साधारण (करन्ट) श्रेणीचा तिकीटधारक आरक्षित डब्यात आढळल्यास त्याच्याकडून दंड वसूल करून पुढील प्रवास करू दिला जातो. 

Arbitrary rickshaw drivers, headache, thane city, Passengers, RTO
ठाण्यात रिक्षाचालकांच्या मनमानीचा प्रवाशांना फटका; नियमांनाही हरताळ
india likely to have 1000 more planes in next five year aviation minister murlidhar mohol
विमानांच्या ताफ्यात पाच वर्षांत हजाराने भर! केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांची माहिती
Only 35 percent of BEST fleet is self owned Mumbai
बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या केवळ ३५ टक्के गाड्या
tiger attack
शेवटी आईच ती…..बछड्यांना धोका दिसताच वाघीण माघारी फिरली अन्….व्हीडीओ एकदा बघाच…
tiger
Video: बछड्यांसह वाघीण निघाली ऐटीत….पण, भररस्त्यात असे काही घडले की चवताळून थेट पर्यटकांवर…
pravasi raja din, ST bus, passengers,
एसटी बस प्रवाशांच्या तक्रारी, समस्या ऐकल्या जाणार? काय आहे ‘प्रवासी राजा दिन’ उपक्रम जाणून घ्या…
Dombivli, traveler, robbed, Taloja-Khoni road,
डोंबिवली : तळोजा-खोणी रस्त्यावर प्रवाश्याला पोलीस सांगून दिवसाढवळ्या लुटले
Even during the rainy season rickshaw-taxi drivers continue to refuse fares
पावसाळ्यातही रिक्षा-टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारणे सुरूच

हेही वाचा >>> विश्लेषण : महागाईने बिघडवले थाळीचे गणित?

‘ईएफटी’चे नियम काय?

आरक्षण असूनही एखादा प्रवासी प्रवास करीत नसेल तर ते आसन (बर्थ) रिकामे राहते. त्यामुळे तिकीट तपासणीस गरजू प्रवाशाला ‘ईएफटी’ देऊन ते आसन संबंधित प्रवाशाला देऊ शकतो. परंतु अलीकडे रेल्वेत ‘ईएफटी’चा उपयोग महसूल वाढीसाठी केला जाऊ लागला आहे. नियमानुसार साधारण तिकीटधारक प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करीत असेल तर त्यांला दंड आकारून पुढील स्थानकावर आरक्षित डब्यातून बाहेर जाण्यास सांगायला हवे. परंतु, दंड घेऊन संबंधित प्रवाशाला आरक्षित डब्यातून प्रवास करण्याची मुभा दिली जाते. यामुळे आता आरक्षित तिकीट मिळाले नाही तरी प्रवासी आरक्षित डब्यात बसून दंड भरून प्रवास करू लागले. परिणामी आरक्षित डब्यातील प्रवाशांना गैरसोयींचा समाना करावा लागत आहे.

उपलब्ध डब्यांची सद्यःस्थिती काय ? 

भारतासारख्या खंडप्राय देशात सामान्य नागरिकांना लांब पल्ल्याचा प्रवासासाठी रेल्वे हे सर्वोत्तम आणि तुलनेने स्वस्त साधन आहे. त्यामुळेच शयनयान आणि सर्वसाधारण (जनरल) श्रेणीतील डब्यांमध्ये नेहमी गर्दी असते. देशात सध्या १३ हजार ‘मेल’ आणि ‘एक्स्प्रेस’ गाड्या धावतात. त्यात मध्य रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या एकूण गाड्यांची संख्या (‘मेल’ आणि ‘एक्स्प्रेस’) ७०० आहेत. या गाड्यांना एकूण सुमारे अडीच हजार डबे आहेत. यामध्ये एक हजार वातानुकूलित, ९०० शयनयान आणि ६०० सामान्य डब्यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> अमेरिकेत आशियाई वंशाच्या नागरिकांविरुद्ध द्वेष वाढत आहे का? सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

स्लीपर डबे कमी करण्याचे धोरण मारक?  

रेल्वेने वातानुकूलित डबे वाढवण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार शयनयान श्रेणीचे डबे टप्प्याटप्प्याने कमी करून वातानुकूलित डबे वाढवण्यात येत आहेत. साधारणत: सर्वच प्रवासी रेल्वेगाड्या २४ डब्यांच्या असतात. यामध्ये पूर्वी ११ शयनयान डबे असायचे. आता सर्व गाड्यांमध्ये शयनयान (स्लीपर) डब्यांची संख्या सहा किंवा सातवर आणण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना अनेकदा शयनयान डब्यांऐवजी जादा पैसे मोजून वातानुकूलित (एसी) डब्यांतून प्रवास करावा लागतो. शिवाय, शयनयान श्रेणीची प्रतीक्षायादी लांबत जाते आणि अनेकदा जादा भाड्यामुळे वातानुकूलित श्रेणीकडे प्रवासी पाठ फिरवत असल्याचेही चित्र दिसून येते.

प्रवासी संघटनांनी सुचवलेले उपाय कोणते? 

प्रवाशांच्या सोयी-सुविधांबाबत भारतीय रेल्वेकडून नियमितपणे सर्वेक्षण केले जाते. कोणत्या मार्गावर अधिक प्रवासी वाहतूक आहे, याबाबतची माहिती रेल्वेकडे उपलब्ध आहे. त्या मार्गावर अधिक गाड्या नियमित चालवणे आवश्यक आहे. एवढेच नव्हेतर मध्यमर्गीय लांबचा प्रवास शयनयानमधून (स्लीपर क्लास) करतो तर गरीब व्यक्ती किंवा ऐनवेळी प्रवास करणारे सामान्य (जनरल) डब्यातून प्रवास करीत असतात. त्यामुळे शयनयान डब्यांची संख्या पूर्वीप्रमाणे ११ करण्यात यावी. याशिवाय एकूण डब्यांची संख्या वाढवून २४ वरून २६ करायला हवी, अशी प्रवासी संघटनांची मागणी आहे.