इतिहास, संस्कृती, कला , पर्यटन, व्यापार अशा अनेक क्षेत्रांमुळे कोल्हापूरची ओळख सर्वदूर आहे. कोल्हापूरचा आणखी एक लौकिक म्हणजे क्रीडा क्षेत्र. कुस्ती, फुटबॉलची पंढरी असणाऱ्या करवीर नगरीत तिरंदाजीचा खेळ बहरला, जलतरणात लौकिक प्राप्त झाला. आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे नेमबाजही याच नगरीतले. स्वप्निल कुसळेच्या ऑलिम्पिक पदकाच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. कोल्हापूरची तुलना क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या पंजाब, हरियाणा या आघाडीच्या राज्यांच्या कामगिरीशी करता येऊ शकेल.

 कोल्हापुरात कोणते खेळ रुजले?

काही खेळ आणि राज्ये यांचे अतूट बंध पाहायला मिळतो. पंजाब आणि हॉकी, हरियाणा आणि कुस्ती, उत्तर प्रदेश आणि कबड्डी, पश्चिम बंगाल आणि फुटबॉल, केरळ आणि अॅथलेटिक्स, आंध्र प्रदेश व तेलंगणा आणि बॅडमिंटन, तामिळनाडू आणि टेनिस, ओडिशा व झारखंड आणि धनुर्विद्या, अशा वेगवेगळ्या राज्यांची आपली म्हणून एका खेळाची दृढ ओळख निर्माण केली आहे. कोल्हापूरसारख्या सात लाख लोकसंख्येच्या शहराने एकाच वेळी अनेक खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणारे खेळाडू निर्माण केले. आता तर नेमबाज स्वप्निल कुसळे याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातल्याने कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेचा डंका देशभर वाजतो आहे. 

india performance at paris olympics 2024
‘कांस्या’ची लंगोटी!
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Lokstta editorial Simon Biles Simon Biles Paris Olympics 2024
अग्रलेख:जुगाडांच्या पलीकडे…
vinesh phogat loksatta editorial today
अग्रलेख: ‘विनेश’काले…
UWW president Nenad Lalovic Statement on Vinesh Phogat Case
Vinesh Phogat: “तुमचा देश किती…”, विनेश फोगट प्रकरणावरून युनायटेड वर्ल्ड रेसलिंग प्रमुखांनी भारताला दाखवला आरसा? नेमकं काय म्हणाले?
protest bangladesh sheikh hasina
राजकीय आश्रय म्हणजे काय? शेख हसीना लंडनमध्ये आश्रय का मागत आहेत?
Loksatta editorial on Chief Economic Advisor Dr V Anantha Nageswaran talk about financial market and finance 3 0 summit
अग्रलेख: बुडबुडा बुडवे बहुतां…
loksatta editorial on president draupadi murmu
अग्रलेख: अब द्रौपदी प्रश्न न पूछेगी…

हेही वाचा >>> १९७५ साली मुजीब यांच्या हत्येपासून ते २०२४ मध्ये ‘जबाबदारी’ घेण्यापर्यंत: बांगलादेशातील राजकारणात लष्कराची भूमिका कशी महत्त्वाची ठरली?

खेळाच्या विकासाला राजाश्रय…

कोल्हापुरात नानाविध खेळ रुजले याचे श्रेय राजाश्रयास द्यायला हवे. करवीरच्या क्रीडाप्रेमी राजांनी खेळाची आवड केवळ जोपासली नाही तर त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी भरीव आर्थिक योगदान दिले. भीमकाय शरीरयष्टी निसर्गत:च लाभलेल्या शाहू महाराजांना आपल्याप्रमाणे प्रजाही निरोगी शरीराची व्हावी असे वाटत असल्याने अनेक तालमींची निर्मिती करून मल्लांना सर्वतोपरी मदत केली. महाराजांनी रोम येथे भव्य मैदान पाहिले आणि त्यासारखेच ३० हजार प्रेक्षक क्षमतेचे टोलेजंग खासबाग कुस्तीचे मैदान उभारले. राजाश्रयामुळे कोल्हापूरच्या फुटबॉललाही गती मिळाली आहे. 

कुस्ती पंढरीचा लौकिक कसा?

कोल्हापूरच्या तालमीतील लाल मातीत नेमके काय रुजले आहे याची साक्ष देण्यास कुस्तीची परंपरा पुरेशी ठरावी. किंबहुना कोल्हापूर आणि खेळ याची सांगड घालताना पहिल्यांदा आठवते ती कुस्तीच. राजाश्रयामुळे तिची भक्कम पायाभरणी झाली. येथील आरोग्यदायी हवापाणी, सकस खाद्य, योग्य मार्गदर्शन या कारणांनी कुस्तीने येथे चांगले मूळ धरले. खासबाग मैदानातील गाजलेल्या कुस्त्यांचा वेगळाच इतिहास आहे. शाहू महाराजांनी इमामबक्ष ऊर्फ धाकटा गामा याला कुस्ती जिंकल्यावर चांदीची गदा बक्षीस दिली आणि ती एक परंपरा सुरु झाली. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, रुस्तम-ए-हिंद दादू चौगले, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांनी कोल्हापूरच्या कुस्तीचा झेंडा जगभर फडकवला. हल्ली इथल्या कुस्तीला काहीशी ओहोटी लागली असल्याचे शल्य मात्र आहे.

हेही वाचा >>> उच्चविद्याविभूषित डॉक्टर करत आहेत शौचालयाची स्वच्छता!; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मिळणार का त्यांना दिलासा?

विदेशातून उपजलेले फुटबॉल प्रेम कसे आहे?  

कोल्हापूरच्या लाल मातीत जशी कुस्ती रुजली तसाच फुटबॉलचा खेळ घरोघरी रुजला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीच्या हल्ल्यानंतर पोलंडच्या निर्वासितांची तुकडी कोल्हापुरात आली.  त्यांनी कोल्हापूरकरांना हा खेळ कसा खेळायचा हे शिकावल्यापासून ते आजतागायत इथली तरुणाई फुटबॉलच्या मागे धावतेच आहे. १९३६ साली इंग्रज सैनिकांची तुकडी कोल्हापुरात मुक्कामाला आली. तेव्हा इथल्या फुटबॉल संघाने त्यांच्याशी सामना करत लढत १-१ बरोबरीत ठेवली. तेव्हापासून सुरू झालेल्या फुटबॉल खेळाला बऱ्याच पट्टीच्या खेळाडूंनी वैभव मिळवून दिले आहे. येथील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य सिद्ध केले आहे. ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबशी २ कोटी २५ लाख रकमेला करारबद्ध झालेला अनिकेत जाधव याच नगरीतला.

कोल्हापूर खेळांचे माहेरघर…

कोल्हापूरमध्ये अनेक खेळ रुजले, बहरले. त्यातूनच कोल्हापूर हे खेळांचे माहेरघर बनले. येथील खेळाडूंच्या पराक्रमाने राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप उमटली आहे. पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांनी कोल्हापुरातच सराव केला आणि हे शहर जागतिक क्रीडा नकाशावर आले. अर्जुन पुरस्कार विजेते गणपतराव आंधळकर, शैलजा साळुंखे, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत ,वीरधवल खाडे, अनिकेत जाधव, निखिल कदम, स्वप्निल पाटील असे अर्जुन पुरस्कार विजेते याच मातीतले. 

क्रीडा संकुल रेंगाळले…

कोल्हापूर नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या क्रीडा परंपरेला चालना देण्यासाठी शासनाने येथे शासकीय क्रीडा संकुल सुरू करण्याचे ठरवले. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांसाठी परिपूर्ण विभागीय क्रीडा संकुल सुरू करण्यासाठी २००९ साली १७ एकर जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित केली. तात्काळ कामाला सुरुवात झाली. पण सरकारी कामात दिसते ती आरंभशूरता इथेही दिसली. २३ कोटी रुपये खर्च झाले असले तरी संकुल पूर्ण होण्याचे नावच घेत नाही. आर्थिक गैरव्यवहारामुळे संकुल बदनाम होत आहे. ज्या सुविधा झाल्या त्याही खेळाडूंसाठी परिपूर्ण नाहीत. कबड्डी ,फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो-खो, टेनिस, धावपट्टी, शूटिंग रेंज, जलतरण तलाव, इनडोअर मैदान, अपंगांसाठी स्वतंत्र क्रीडा संकुल, हॉकी खेळाडू वसतिगृह अशा अनेक बाबीचा यामध्ये अंतर्भाव असला तरी त्या पूर्णत्वास कधी येणार याकडे खेळाडू, क्रीडा संस्था, क्रीडाप्रेमी नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.