Precautions While Using Geyser In Winter: भारतात यंदा थंडीची लाट चांगलीच पसरली आहे. महाराष्ट्रात मुंबई- पुणे शहरांसहित गावोवागी सुद्धा तापमानाचा पारा घसरला आहे. पहाटेच्या वेळी तर थंडीने अगदी कुडकुडायला होतं. अशावेळी कुणी अंघोळ करायला सांगितली तरी जीवावर येतं. छान कडक तापलेल्या गरम पाण्याने अंघोळ करण्यासाठी गावखेड्यांमध्ये चुलीवर तापवून पाणी मिळतं पण हेच शहरात करायला जाणं म्हणजे महिनाभर चालणारा गॅस सिलेंडर पंधरा दिवसात संपण्याची भीती असते.

अगदी मध्यमवर्गीय कुटुंबापासून सगळ्या घरांमध्ये गिझर सर्रास वापरला जातो. गिझरमुळे बरेच पैसे व वेळ वाचत असल्याने ही गुंतवणूक सोयीची ठरते पण गिझर म्हणजे धोक्याची घंटा हे ही तितकं खरं आहे. पाणी आणि वीज असं कॉम्बिनेशन असलेला गिझर नीट हाताळला नाही तर विजेचा झटका लागून मृत्यूही ओढवू शकतो. गिझर वापरताना काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात..

गिझरची जोडणी करताना काय काळजी घ्याल?

1) बाथरूममध्ये जेव्हा तुम्हाला गिझर लावायचा असेल तेव्हा DIY म्हणजेच स्वतःहून तज्ज्ञ होऊन विजेची जोडणी करायला जाऊ नका. तुम्हाला प्रशिक्षित कामगारांची गरज आहे, त्यांची मदत घ्या!

2)बाथरूममध्ये गिझर लावताना शक्यतो वरच्या बाजूला लावा जिथे पाण्याचा थेट संपर्क येणार नाही. तुमच्याकडे शॉवर असल्यास त्याच्या वर किंवा थोडं दूर बाजूला गिझर लावा.

3) अनेकदा आपण गिझर सुरु केल्यावर बंद करायला मात्र विसरतो यामुळे वीज वाया जातेच पण नंतर अचानक हात लावल्यावर विजेचा झटका लागू शकतो. यावर उपाय म्हणजे आता ऑटोमॅटिक गिझरउपलब्ध आहेत.

गिजर वापरताना काय काळजी घ्याल?

1) आंघोळीला जाण्याआधी १० मिनिट गिझर सुरु करा व मग पाणी भरून झाल्यावर गिझर बंद करून मग आंघोळ करा.

2) शॉवर वापरणार असाल तर अंघोळ झाल्यावर नळ बंद करा व मग हात कोरडे करून मग स्विच बंद करा.

3) शक्य असल्यास प्लॅस्टिक किंवा लाकडाच्या काठीने गिझरचे बटण बंद करा व बाथरूममध्येही फार पाणी साचले नसेल याची काळजी घ्या.

4) वेळोवेळी गिझरची सर्व्हिसिंग करा. गिझरच्या आत असलेला एनोड रॉड दरवर्षी तपासला पाहिजे कारण त्यावर अनेक वेळा घाणीचा थर साचतो आणि नंतर पाणी गरम होण्यास वेळ लागतो.

हे ही वाचा<< विश्लेषण: जीभ स्वच्छ करण्यासाठी चरक संहितेत सांगितली आहे योग्य पद्धत; तुम्ही चुकताय का? जाणून घ्या नियम

5) तुमच्या घरातील गिझर थेट पाण्याच्या टाकीशी जोडलेले असेल आणि टाकी रिकामी झाली तर गिझर जास्त तापतो. पाणी नसताना गिझर चालू असेल तेव्हा जास्त गरम होते. दाब वाढून स्फोटही होऊ शकतो.

हे ही वाचा<< विश्लेषण: मेंदू खाणाऱ्या अमीबाने वाढवली जगाची चिंता; कशी होते लागण? लक्षणं व उपचार काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अलीकडेच जम्मू काश्मीरमध्ये थंडीच्या माऱ्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. खोलीत लावलेल्या हिटरमधील गॅस बाहेर पडून या कुटुंबाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समजत आहे. या मृतांमध्ये ८ व ५ वर्षीय दोन चिमुकल्या, १२ वर्षीय मुलगा व एका ३५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. महाराष्ट्रात अद्याप तरी हिटर हे घरोघरी वापरले जात नाहीत पण आपण इलेक्ट्रिक वॉर्मर्स किंवा तत्सम वस्तू वापरणार असाल तर खबरदारी बाळगा.