बिहार राज्यात सत्ताबदल झाल्यापासून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. भाजपाशी काडीमोड घेत नितीश कुमार यांनी आरजेडी, काँग्रेस तसेच अन्य पक्षांशी आघाडी करून येथे नव्या सरकारची स्थापना केली आहे. असे असताना आता नितीश कुमार यांनी एक अनोखा निर्णय घेतला आहे. बिहारमधील सरकार येथील सुरजापुरी आणि बज्जिका या स्थानिक बोलीभाषांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष अकॅडमींची स्थापना करणार आहे. नितीश कुमार यांनी हा निर्णय का घेतला? त्यामागे काही राजकीय हेतू आहे का? याबाबत जाणून घेऊया.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ची नियुक्ती कशी केली जाते; जाणून घ्या नेमकी काय असते जबाबदारी

Social workers detained yavatmal
आंदोलनाची दहशत… मोदींच्या सभेपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते स्थानबद्ध
no announcement on old pension scheme in maharashtra interim budget 2024
Maharashtra Budget session 2024: जुन्या निवृत्तिवेतन योजनेची प्रतीक्षाच
Vijay Wadettiwar slams bjp leader chandrashekhar bawankule
‘छोटे पक्ष संपवा’, चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानावर विजय वडेट्टीवारांची टीका; म्हणाले, “खून करण्याचे..”
Sharad Pawar Kolhapur
सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांची नाकेबंदी सुरू; शरद पवार यांची टीका

बिहारमधील स्थानिक संस्कृती आणि बोलीभाषांचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शिक्षण विभागाला दोन विशेष अकॅडमींची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून सुरजापुरी आणि बज्जिका या भाषांच्या संवर्धनावर काम केले जाणार आहे. या आदेशानुसार बिहारमधील शिक्षण विभाग एका मुख्य संस्थेचीही स्थापना करणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून बोलीभाषांसह इतर भाषांच्या विकासावर काम केले जाणार आहे. बिहारमध्ये वेगवेगळ्या भाषांच्या संवर्धन आणि विकासासाठी वेगवेगळ्या आठ अकॅडमी आहेत. या अकॅडमींच्या माध्यमातून बोलीभाषा तसेच स्थानिक संस्कृतींना जपण्याचे काम केले जाते.

हेही वाचा >>> विश्लेषण: महसा अमिनींच्या मृत्यूनंतर चर्चेत असलेल्या संस्कृतीरक्षक पोलिसांचे काम काय? इराणमध्ये हिजाबचे नियम काय आहेत?

सुरजापुरी आणि बज्जिका या बोलीभाषा काय आहेत?

सुरजापुरी ही भाषा हिंदी, उर्दू आणि बांगला या भाषांचे मिश्रण आहे. ही भाषा विशेषत्वाने किशनगंज तसेच ईशान्य बिहारमधील सीमांचल प्रदेशात बोलली जाते. सीमांचलमधील कटिहार, पूर्णिया, अररिया या भागात सुरजापुरी ही भाषा बोलणारे लोक आढळतात. सुरजापुरी ही भाषा सुरजापुरी मुस्लीम समाजामध्ये बोलली जाते. किशनगंज भागात हे सुरजापुरी मुस्लीम आढळतात. किशनगंगजमध्ये साधारण ७० टक्के मुस्लीम समाज आढळतो. असे असले तरी या भाषेचा धर्माशी कोणताही संबंध नाही, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. सुरजापुरी बोलणारे लोक बिहारमधील ठाकूरगंज भागातील पूर्णिया जिल्ह्याला लागून असलेल्या नेपाळमधील झापा जिल्ह्यातही आढळतात.

हेही वाचा >>> विश्लेषण : रशियन चित्रपटसृष्टीने ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला बॉयकॉट करण्यामागचे कारण काय? जाणून घ्या

२०११ मधील जनगणेनुसार बिहारमध्ये १८ लाख ५७ हजार ९३० लोक सुरजापुरी या भाषेत बोलतात. मैथिली भाषेप्रमाणेच बज्जिका ही भाषादेखील बिहारमधील वायव्य भागातील लोक बोलतात. प्रामुख्याने मुझप्परपूर, वैशाली, पश्चिम चंपारम, शेवोहार, समस्तीपूरमधील काही भागात बज्जिका ही भाषा बोलली जाते. या भाषेच्या संवर्धनासाठीही येथे काम केले जाणार आहे. बिहारमध्ये याआधी आठ भाषांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आठ वेगवेगळ्या अकॅडमी आहेत. यामध्ये आता बज्जिका आणि सुरजापुरी या दोन अकॅडमींची भर पडणार आहे. बिहार हिंदी ग्रंथ अकॅडमी, मैथिली अकॅडमी, मागाही अकॅडमी, बांगला अकॅडमी, संस्कृत अकॅडमी, भोजपुरी अकॅडमी, अंगिका अकॅडमी, दक्षिण भारतीय भाषा संस्था, अशा बिहारमधील आठ अकॅडमींची नावे आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण : काँग्रेसचे अंतर्गत कामकाज कसे चालते? निर्णय कसे घेतले जातात? जाणून घ्या

हा निर्णय घेण्याचा बिहार राज्याचा हेतू काय आहे?

सुरजापुरी आणि बज्जिका या दोन भाषांसाठी दोन नव्या अकॅडमींची स्थापना करण्यामागे या भाषांमधील साहित्याला प्रसिद्धी मिळावी तसेच या बोलीभाषांमध्ये आणखी संशोधन व्हावे हा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. बिहारमधील भाषांचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी स्थापन केल्या जाणाऱ्या मुख्य संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, साहित्य, तसेच अन्य क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना एक मंच उपलब्ध करून दिला जाईल. या भाषांचे व्याकरण, शब्दकोश, साहित्यविषयक कामाला प्रोत्साहित करण्याचेही या मुख्य संस्थेच्या माध्यमातून काम केले जाईल.

हेही वाचा >>> विश्लेषण : महेंद्रसिंह धोनीने संन्यास घेतला, मग अन्य क्रिकेट लीगमध्ये का खेळत नाही? नेमके कारण काय?

मात्र बिहार सरकारच्या या निर्णयामागे काही राजकीय हेतूदेखील असू शकतो. तसा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. भाजपासोबत युती तोडलेले नितीश कुमार यांनी सिमांचल भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय. तर उत्तर बिहारमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी बज्जिका या भाषेच्या संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असावा. भाजपाचा प्रभाव असलेल्या शेओलार, पूर्व चंपारण, वैशाली या भागातील जनतेला आकर्षित करण्याचाही नितीश कुमार यांचा उद्देश असावा, असे मत राजकीय जाणकार मांडत आहेत.