-प्रथमेश गोडबोले
यंदा जूनच्या अखेरपर्यंत पावसाने दिलेल्या ओढीमुळे राज्यात जलसंकट उभे राहिले होते. ३० जिल्ह्यांमध्ये पाऊस उणे होता आणि धरणांनीही तळ गाठला होता. मात्र, जुलैच्या सुरुवातीपासून राज्यात सर्वदूर सुरू झालेल्या पावसामुळे अवघ्या दहा दिवसांत राज्याचे जलचित्र पालटले आणि अनेक छोटी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. विसर्ग म्हणजे काय, तो का करावा लागतो, विसर्ग करण्याचा निर्णय कोण घेतो, विसर्ग करताना काय दक्षता घ्यावी लागते, याबाबत केलेला ऊहापोह.

पाण्याचा विसर्ग म्हणजे काय? आणि तो का करावा लागतो?

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Mahavitaran Jobs
Mahavitaran Jobs : महावितरण मध्ये नोकरीची संधी! ५३४७ रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…

कोणत्याही धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून सर्व मार्गांनी धरणात जमा होणाऱ्या एकूण पाण्याला ‘येवा’ असे म्हणतात. थोडक्यात ‘येवा’ म्हणजे धरणात जमा होणारे पाणी म्हणता येईल. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार ‘येवा’ निश्‍चित केला जातो. याच्याआधारे धरण कधी आणि किती दिवसात किंवा किती वेळेत भरले जाईल, याचा अंदाज बांधला जातो आणि त्यानुसार धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो. संबंधित धरणातून पाण्याचा विसर्ग न केल्यास धरणाला धोका पोहोचू शकतो. तसेच पूरनियमन करण्यात अडचणी येऊ शकतात.

विसर्गाचे प्रारूप कसे ठरते?

जलसंपदा विभागाकडून पुराच्या अनुषंगाने नियोजन करण्यात येते. त्यामध्ये गेल्या ३०-४० वर्षांत नदीला आलेल्या पुराचा अभ्यास केला जातो. प्रत्येक १५ दिवसाला किती पाणी आले, याचे गणितीय प्रारूप तयार केले जाते. दि. १ जून ते १५ जून या कालावधीत किती पाऊस पडला आणि किती पूर आला, याची गेल्या ४० वर्षांची सरासरी काढली जाते. त्यानंतर १६ जून ते ३० जून अशा प्रकारे १५ ऑक्टोबरपर्यंत दर १५ दिवसांचे गणितीय प्रारूप तयार केले जाते. जून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे प्रारूप तयार केले जाते. गेल्या ४० वर्षांच्या अनुभवावरून तयार केलेल्या प्रारूपावरून आपल्याला अंदाज येतो, की या पंधरवड्यामध्ये आपल्या धरणात किती पाणी येऊ शकते. जलसंपदा विभागाचे नियोजन असे असते, की १५ ऑक्टोबरला सर्व धरणे १०० टक्के भरलेली हवीत. या नियोजनाचा प्रारंभ बिंदू १ जून तर शेवटचा बिंदू १५ ऑक्टोबर आहे. या तीन-साडेतीन महिन्यांच्या नियोजनात धरणदेखील १०० टक्के भरले पाहिजे आणि पूर नियमन (पुरामुळे कमीत कमी हानी झाली पाहिजे) अशा पद्धतीने व्यवस्थापन करावे लागते.

नक्की वाचा >> विश्लेषण : १८८ मिमी पाऊस पडला म्हणजे नेमका किती पडला? पाऊस मोजतात कसा माहितीय का?

पूरनियमन कसे केले जाते?

१५ ऑक्टोबरला धरण १०० टक्के भरते किंवा भरावे असे नियोजन असते. १ ते १५ ऑक्टोबरचा गेल्या ४० वर्षांचा पाऊस पडल्याचा आणि पावसाचे किती पाणी धरणात आले याचा विदा जलसंपदा विभागाकडे आहे. त्यानुसार १ जून ते १५ जून किती पाणीसाठा धरणांमध्ये ठेवायला पाहिजे. त्यानंतरचे १५ दिवस, त्यानंतरचे १५ दिवस किती पाणीसाठा ठेवायचा याचा ठोकताळा जलसंपदा विभागाकडून बांधण्यात येतो. या ठोकताळ्यानुसार चालू तारखेला संबंधित धरणात किती पाणीसाठा असायला हवा, याचा अंदाज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना असतो. म्हणजेच या ठोकताळ्यानुसार संबंधित धरणात चालू तारखेला ७० टक्के पाणीसाठा होता, तर सध्या येणाऱ्या पावसाचे प्रमाण जास्त असल्यास संबंधित धरण १०० टक्के भरू न देता ७० टक्के भरल्यानंतर त्यातून विसर्ग सुरू केला जातो. कारण आजच्या तारखेचा विचार केल्यास १५ ऑक्टोबरपर्यंत या धरणात आणखी पाऊस होणार आहे. त्यामुळे हे ३० टक्के पाणीसाठा ‘फ्लड पॉकेट’ म्हणून ठेवला जातो. कारण आगामी साडेतीन महिन्यात धरणात येणारे पाणी धरणात साठवायचे आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जातो. अन्यथा आताच धरण १०० टक्के भरू दिल्यास पुढील साडेतीन महिन्यात येणारे सर्व पाणी खाली सोडून द्यावे लागेल आणि पूरनियमन करता येणार नाही.

नक्की वाचा >> विश्लेषण : पावसाळ्यात लोकल सेवा का कोलमडते?

विसर्गाचे प्रमाण कसे ठरते?

राज्यातील प्रत्येक धरणात प्रत्येक दिवशी किती पाणी ठेवायचे हे ठरवले असल्याने, त्यापेक्षा जास्त पाणी आल्यास ते सोडून देण्याचे नियोजन केलेले असते. प्रत्येक धरणाची स्थिती वेगळी असते. गेल्या ४० वर्षांत संबंधित धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस, धरणात आलेले पाणी यावरून धरणातून होणाऱ्या विसर्गाचे प्रमाण ठरविण्यात येते. उदाहरण म्हणून घ्यायचे झाल्यास उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिशय कमी पाऊस पडतो. दरवर्षी या धरणाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या धरणांमध्ये पडणारा पाऊस आणि त्यातून होणाऱ्या विसर्गावर भरले जाते. त्यामुळे उजनी धरण दरवर्षी विलंबाने भरते. त्यामुळे उजनी धरणात पावसाळ्यात एकदम पाणी सोडण्यात येत नाही. टप्प्याटप्प्याने हे धरण भरण्यात येते. उजनी हे सर्वांत टोकाचे धरण असल्याने त्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्यासाठीचे व्यवस्थापन करायला अवघड आहे. त्यामुळे या धरणात टप्प्याटप्प्यानेच पाणी सोडण्यात येते. हे धरण ९० टक्के भरल्यानंतर आणि या धरणाच्या वरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असल्यास उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो.

नक्की वाचा >> विश्लेषण : पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पाणी का साचते?

पाणी सोडण्याचा निर्णय कोण घेते?

धरण सुरक्षा संघटनेने धरणे सुरक्षा नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये संबंधित धरणाच्या गेल्या ४० वर्षातील ठोकताळ्यानुसार पाणी सोडण्याचे वेळापत्रक तयार करण्याचे अधिकार मुख्य अभियंत्याना देण्यात आले आहेत. हे वेळापत्रक एकदा मंजूर केल्यानंतर संबंधित धरणाचा कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता यांच्याकडून हे वेळापत्रकाची अंमलबजावणी करतात. एकूण खोऱ्याची जबाबदारी मात्र मुख्य अभियंता यांच्याकडे असते.