Sperm Donation Rules In India: विकी डोनर हा चित्रपट आल्यानंतर स्पर्म डोनेट करण्याविषयीचे कुतुहूल वाढले आहे. अनेकांना हा पैसे कमावण्याचा सोपा मार्गही वाटतो. पण मुळात स्पर्म दान करणे हे इतके सोपे सहज नाही. या प्रक्रियेचा भाग होण्यासाठी अनेक स्टेप्स पार कराव्या लागतात. अजूनही अनेकांना स्पर्म दान करणे म्हणजे काय त्याचा वापर कुठे होतो याविषयी माहिती नाही. भारतात यासंदर्भांत नेमके काय नियम आहेत? ही प्रक्रिया कशी असते? स्पर्म देण्यासाठी उमेदवाराची निवड कशी केली जाते हे आज आपण सविस्तर जाणून घेऊयात.

स्पर्म दान करण्याची गरज काय?

वंध्यत्वाची समस्या असलेल्या जोडप्याला विज्ञानाच्या मदतीने मूल होण्यास मदत करता येते. यासाठी प्रजननक्षम पुरुषाचे वीर्य वापरले जाते. या प्रक्रियेत शुक्राणू दाता निनावी किंवा प्राप्तकर्त्याच्या ओळखीचा असू शकतो.तुम्हाला माहित आहे का की प्रत्येकजण शुक्राणू दान करू शकत नाही. शुक्राणू दात्यांना शुक्राणू दान करण्यापूर्वी शारीरिक व मानसिक वैद्यकीय तपासणी करावी लागते. याची पूर्तता करण्याचे निकष खालीलप्रमाणे आहेत:

१) बहुतांश शुक्राणू बँकेत १८ ते ३९ वयोगटातील दात्याला प्राधान्य दिले जाते. काही शुक्राणू बँक उच्च वयोमर्यादा ३४ वर्षे ठेवतात.

२) स्पर्म दान करण्यापूर्वी मानसोपचारतज्ज्ञ संबंधित व्यक्तीची मानसिक आणि भावनिक स्थिती समजून घेण्यासाठी शुक्राणू दात्याशी संवाद साधतात. यानंतर संभाव्य दात्याच्या मानसिक तंदुरुस्तीचे मूल्यांकन केले जाते. जर शुक्राणू दाता प्राप्तकर्त्याला माहित असेल, तर त्यांच्या नातेसंबंधाविषयी प्रश्न विचारले जातात.

३) मानसिक मूल्यांकनाच्या नंतर संभाव्य स्पर्म दात्यांची संपूर्ण वैद्यकीय आणि कौटुंबिक माहिती जाणून घेतली जाते. संभाव्य दात्याच्या किंवा कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासात कोणताही अनुवांशिक विकार असल्यास, ती व्यक्ती शुक्राणू दाता बनण्यास पात्र होऊ शकत नाही.

४) एम्स पाटणा येथील संशोधकांनी अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की कोविड संसर्गाचा वीर्य गुणवत्तेवर आणि शुक्राणूंच्या डीएनएवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळेच स्पर्म दात्यांच्या वीर्याचे नमुने हे सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (ART) क्लिनिक आणि शुक्राणू बँकिंग सुविधांनी तपासायला हवेत. नुकताच कोविड झालेल्या पुरुषांना काही काळ स्पर्म दात करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

५) शुक्राणू दाता होण्यापूर्वी, व्यक्तीला त्यांच्या वीर्य नमुन्यांद्वारे शुक्राणूंच्या गुणवत्तेच्या अनेक चाचण्या कराव्या लागतात. वीर्यातील शुक्राणूंची गुणवत्ता संख्या व वेग याआधारे तपासली जाते. शुक्राणूंच्या नमुन्याच्या प्रति मिलीलीटरमध्ये १५ दशलक्ष पेक्षा जास्त शुक्राणूंची संख्या असणे आवश्यक आहे.

६) रक्तदात्याने शारीरिक आरोग्य तपासणीसाठी रक्ताचे नमुने आणि लघवीचे नमुने देणे आवश्यक आहे. एड्स, एचआयव्ही, हिपॅटायटीस बी 2 सी आणि सिफिलीस सारख्या कोणत्याही संसर्गजन्य किंवा स्वयंप्रतिकार रोगांची सुद्धा चाचणी केली जाते.

७) संभाव्य दात्यास कोणत्याही प्रकारचा अनुवांशिक विकार नाही हे तपासण्यासाठी रक्ताचा नमुना देखील घेतला जातो.

हे ही वाचा<< विश्लेषण: अंजलीचा मृतदेह १२ किमी फरपटत नेणाऱ्या आरोपींना काय शिक्षा होणार? कायद्यात काय आहे तरतूद?

८) पुरुषाला त्याच्या आजपर्यंतच्या सेक्स लाईफचा संपूर्ण तपशीलवार इतिहास प्रदान करणे आवश्यक आहे.

९) संसर्गजन्य रोग किंवा आजार होण्याचा धोका ओळखण्यासाठी धूम्रपान, मादक पदार्थांचे सेवन, दारू इ. यांसारखे व्यसन असल्यास ते उघड करणे आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१०) छंद, शिक्षण, वैयक्तिक सवयी आणि आवडी हे वैयक्तिक तपशील शेअर करण्यास सांगितले जाते.