scorecardresearch

विश्लेषण : महेंद्रसिंह धोनीने संन्यास घेतला, मग अन्य क्रिकेट लीगमध्ये का खेळत नाही? नेमके कारण काय?

आयपीएलव्यतिरिक्त जगभरात वेगवेगळ्या टी-२० क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.

विश्लेषण : महेंद्रसिंह धोनीने संन्यास घेतला, मग अन्य क्रिकेट लीगमध्ये का खेळत नाही? नेमके कारण काय?
महेंद्रसिंह धोनी (संग्रहित फोटो)

जगभरात टी-२० क्रिकेटचे लाखो चाहते आहेत. सध्या आयपीएलव्यतिरिक्त जगभरात वेगवेगळ्या टी-२० क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. टी-२० क्रिकेट फॉरमॅटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले दिग्गज माजी क्रिकेटपटू परत क्रिकेटच्या मैदानात उतरले आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, सुरैश रैना, ब्रायन लारा यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये कमतरता भासत आहे ती फक्त महेंद्रसिंह धोनीची. धोनीने २०२० सालीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. असे असतानाही तो निवृत्ती घेतलेल्या माजी क्रिकेटपटूंसोबत क्रिकेट खेळताना दिसत नाहीये. याचे नेमके कारण काय? असे विचारले जात आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : रस्त्यावरील खड्ड्यांना आपल्या जादुई हातांनी रंगवणाऱ्या या कलाकाराबद्दल, जाणून घ्या

महेंद्रसिंह धोनी इतर टी-२० क्रिकेट लीगमध्ये खेळू न शकण्याला कारणीभूत आहे बीसीसीआयचा नियम. बीसीसीआयच्या अधिकाराखालील कोणत्याही संघाचे प्रशिक्षणपद भूषवायचे असेल, तसेच कोणत्याही इतर लीगमध्ये क्रिकेट खेळायचे असेल, तर खेळाडूला भारतीय क्रिकेटधून निवृत्ती घ्यावी लागते. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. असे असली तरी तो अजूनही आयपीएलमध्ये खेळतोय. तो २०२३ चा आयपीएल हंगाम खेळणार आहे. धोनीला अन्य लीगमध्ये खेळायचे असेल, तर अगोदर त्याला आयपीएल खेळणे सोडावे लागेल.

हेही वाचा >>> विश्लेषण: मुंबईची जगातील सर्वाधिक श्रीमंत शहराच्या दिशेने वाटचाल, काय आहेत कारणं जाणून घ्या…

धोनी जेव्हा टी-२० लीगमधून निवृत्ती जाहीर करेल, तेव्हा तो चेन्नई सुपर किंग्जच्या अन्यफ्रेंचायझींचे प्रशिक्षकपद भूषवू शकतो. तसेच चेन्नई सुपर किंग्जचा मार्गदर्शक म्हणूनही तो भूमिका पार पाडू शकतो. अलीकडेच सुरेश रैना, रॉबीन उथप्पा या दिग्गजांनी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यानंतर आता ते इतर टी-२० क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळताना दिसत आहेत. हे खेळाडू आता बिग बॅश लीग, द हंड्रेड, व्हिटॅलिटी टी-२० ब्लास्ट किंवा इतर कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळू शकतात. धोनीने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर तोही या स्पर्धांमध्ये खेळू शकतो.

हेही वाचा >>> विश्लेषण : जगभरात चक्रीवादळांचा अचूक अंदाज लावणे कठीण का जात आहे?चक्रीवादळे आणखी विध्वंसक का ठरत आहेत?

दरम्यान, महेंद्रसिहं धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली असली तरी त्याचे लाखोंनी चाहते आहेत. तो आयपीएलच्या २०२३ मधील हंगामात खेळणार आहे. त्याच्याकडे चेन्नई संघाचे कर्णधारपद असेल. भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीने अन्य लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतल्यास तो या क्रिकेट लीग्सनाही प्रसिद्धी मिळून देऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या