अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यातील सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निकाल दिला असून, त्याअंतर्गत कोलोरॅडो राज्यामध्ये रिपब्लिकन उमेदवारीसाठीची प्राथमिक निवडणूकफेरी (प्रायमरीज) लढवण्यास माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अपात्र ठरवण्यात आले. ट्रम्प या निर्णयाविरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. तोपर्यंत म्हणजे चार जानेवारीपर्यंत कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.

कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय?

२०२०मधील अध्यक्षीय निवडणूक हरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या निवडणुकीच्या वैधतेलाच आव्हान दिले. ‘मतदान नव्हे दरोडा’ (स्टील द बॅलट) असे या निवडणुकीचे वर्णन ट्रम्पसमर्थकांमध्ये केले जाऊ लागले. याच अस्वस्थतेमध्ये ६ जानेवारी २०२१ रोजी ट्रम्पसमर्थकांनी कॅपिटॉल या अमेरिकी काँग्रेसच्या वास्तूवर हल्ला चढवला. तेथे प्रतिनिधिगृह आणि सेनेट या सभागृहांमध्ये सत्ताबदलावर शिक्कामोर्तब केले जात होते. काँग्रेस सदस्यांना तेथून तातडीने बाहेर काढण्यात आले. ट्रम्प यांनी या हल्लेखोरांचे समर्थन आणि कौतुकही केले. ही कृती म्हणजे संविधान आणि सांविधानिक प्रतीकांविरोधात उठावच असल्याचा निकाल कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने ४-३ अशा बहुमताने दिला. यासाठी अमेरिकी संविधानाच्या १४व्या घटनादुरुस्तीचा दाखला देण्यात आला. या घटनादुरुस्तीच्या अनुच्छेद – ३ नुसार, संविधान आणि सरकार व सरकारी आस्थापनांना पाठबळ देण्याची शपथ घेतल्यानंतर त्याच बाबींविरोधात उठाव करणारी, उठावास चिथावणी वा समर्थन देणारी व्यक्ती कोणतेही सरकारी वा सांविधानिक पद भूषवण्यास अपात्र ठरते. कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना, त्याच राज्यातील या प्रकरणाचा आधीचा निकाल रद्द ठरवला.

EX Jharkhand CM Hemant Soren Moves sc for bail
हेमंत सोरेन यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; अटकेविरुद्धच्या याचिकेवर उच्च न्यायालय निर्णय देत नसल्याचा आरोप 
arvind kejriwal
उच्च न्यायालयाने अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळताच केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव, दिलासा मिळणार?
navneet rana and congress candidate rashmi barve
एकाच मुद्यावरील न्यायालयाच्या निर्णयाने एक निवडणूक रिंगणात तर दुसरी रिंगणाबाहेर
Ask the Election Commission of the Supreme Court about all the voting receipts in VVPAT
व्हीव्हीपॅटमधील सर्वच मतदान पावत्यांची पडताळणी शक्य आहे काय? सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला विचारणा

हेही वाचा : विश्लेषण: टेस्लाच्या स्वयंचलित मोटारींचा ‘रिव्हर्स गिअर’?

कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणासाठी बंधनकारक?

सध्या तरी केवळ कोलोरॅडो राज्यापुरतेच ट्रम्प कोणतीही निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतात. त्या राज्याच्या मुख्य सचिवांना ट्रम्प यांचे नाव मतदानपत्रिकेत समाविष्ट न करण्याविषयी स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. चार जानेवारीपर्यंत ट्रम्प हे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने काही कारणास्तव निर्णय कायम ठेवला (जी शक्यता अंधूक) तरी कोलोरॅडोमधून प्रायमरीज लढवण्यापासून ट्रम्प यांना प्रतिबंधित केले जाईल.

या निकालामुळे ट्रम्प अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र ठरतात का?

नाही. सध्या तरी अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवलेले नाही. ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेतील विविध न्यायालयांमध्ये खटले सुरू आहेत. त्यांच्यावरील आरोपांपैकी अमेरिकी संविधान आणि आस्थापनांविरोत उठावाचा आरोप (इन्सरेक्शन) सर्वाधिक गंभीर आहे. जवळपास दोन डझनांहून अधिक न्यायालयांमध्ये या विषयी खटले दाखल झाले आहेत. अशा काही राज्यांतील सर्वोच्च न्यायालयांनी कोलोरॅडोप्रमाणे निकाल दिले, तर ते ट्रम्प यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. या निकालांची दखल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयासही घ्यावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात रिपब्लिक नियुक्त न्यायाधीशांचे प्राबल्य आहेत. नऊपैकी सहा न्यायाधीश रिपब्लिकन नियुक्त असून, त्यांपैकी तिघांची नेमणूक ट्रम्प यांनीच केली आहे.

हेही वाचा : ७० लाखांचा खर्च, जंगलातून प्रवास अन् अनेक संकटं; अमेरिकेत जाण्याच्या ‘डाँकी रुट’ची कहाणी, वाचा सविस्तर…

मग या निकालाचे महत्त्व काय?

उठाव या आरोपाखाली देण्यात आलेला हा पहिलाच निकाल ठरतो. ट्रम्प यांचा उठावाला सक्रिय पाठिंबा होता असा आरोप त्यांचे विरोधक वरचेवर करत असतात. पण कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने त्यावर विधिसंमत शिक्कामोर्तब केले. ट्रम्प यांचे डेमोक्रॅटिक पक्षाचे विरोधक या मुद्द्याचा वापर निवडणूक प्रचारादरम्यान करू शकतात.

हेही वाचा : शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटात दाखवलेला अमेरिकेत जाण्याचा खरा ‘डाँकी’ मार्ग जीवघेणा का आहे?

रिपब्लिकन पक्षातून ट्रम्प यांच्या उमेदवारीला धोका पोहोचू शकतो का?

तशी शक्यताही फारशी नाही. एकतर रिपब्लिकन पक्षामध्ये सध्या ट्रम्प यांच्या तोलामोलाचा उमेदवारच नाही. रॉन डेसान्टिस, निकी हाले, विवेक रामस्वामी हे तीन उमेदवार ट्रम्प यांच्याविरोधात प्रमुख मानले जातात. पण तिघांपैकी एकही पक्षाच्या मतदारांच्या पसंतीच्या निकषावर ट्रम्प यांच्या आसपासही नाहीत. निवडून येण्याची शक्यता या निकषावर रिपब्लिकन पक्षातून ट्रम्प यांना आजही मोठा पाठिंबा आहे. ट्रम्प यांची प्रचारयंत्रणा न्यायालयांच्या निकालांकडेही बारीक लक्ष ठेवून आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनाही चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकवून ठेवण्यासाठी रिपब्लिकन बहुमत असलेल्या प्रतिनिधिगृहाने नुकताच एक आदेश जारी केला आहे. बायडेनपुत्र हंटर यांनाही ट्रम्प खटल्यांवरून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी गुंतवले गेल्याची चर्चा आहे.