FIFA World Cup 2018 : रशियात सुरु असलेल्या फिफा विश्वचषकात गतविजेत्या जर्मनीला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. मेक्सिकोने जर्मनीवर १-० अशी मात करुन स्पर्धेत आपला पहिला विजय मिळवला आहे. सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये दोन्ही संघांनी सावध पवित्रा आजमावला होता. मात्र अर्धा तास उलटल्यानंत मेक्सिकोच्या खेळाडूंनी सामन्यात आक्रमक खेळाला सुरुवात केली. परिणामी, त्यांना ३५व्या मिनीटाला जेवियर हेर्नाडेझच्या पासवर हरविंग लोझानोने गोल करत मेक्सिकोचं खातं उघडलं. पहिल्या सत्रात मेक्सिकोने घेतलेली ही आघाडी जर्मनीसाठी धक्कादायक होती. ती आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत त्यांनी जर्मनीला पराभवाचा धक्का दिला.

या विजयानंतर मेक्सिकोमध्ये तर जोरदार सेलिब्रेशन झालंच. पण त्याबरोबरच विविध ठिकाणी असलेल्या मेक्सिकोच्या चाहत्यांनीदेखील आपापल्या परीने सेलिब्रेशन केले. याचदरम्यान, मेक्सिकोच्या एका चाहत्याने आपल्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज केले. मुलींना आवडणाऱ्या पद्धतीने अतिशय रोमँटिक प्रकारे त्याने आपल्या प्रेयसीला प्रपोज केले.

सहसा, मुलीला प्रपोज केल्यावर मुलगी काय उत्तर देणार? याची वाट पाहावी लागते. मात्र, त्या मुलीने त्या प्रपोजल तितक्याच रोमँटिक पद्धतीने उत्तर दिले. त्या मुलीने त्या चाहत्यांची मागणी स्वीकार करत त्याचे चुंबन घेतले आणि त्याला होकार दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रपोजचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इतकेच नव्हे या व्हिडिओला अनेक लाईक्स आणि शेअर्स मिळत आहेत.